नेहाला आज IPS अधिकारी होताना बघून संगीताला स्वतःच्या निर्णयाचा अभिमान वाट्त होता....तिच्या सत्कार समारंभात नेहाने स्वतःची ओळख करून दिली...मी नेहा संगीता देशमुख..असेच नाव लिहायची ती लहान असल्यापासून...
संगीता मात्र भूतकाळात हरवली,सोनोग्राफी करण्यासाठी नेले आणि लिंगपरिक्षा केली,मुलगी आहे समजल्यावर सुधीरने तिला गर्भ पाडून टाकण्यासाठी जबरदस्तीने दवाखान्यात आणले,पण तीच्या मधल्या आईने त्याला जुगारून पळ काढला....
माहेरच्या लोकांनी पण हात वर केले,पती हाच परमेश्वर मानावा...असा सल्ला घरातल्या मोठ्या बाया देऊ लागल्या...
पण कोणाचाही आधार न घेता तिने माहेरही सोडले...आणि नेहाला जन्म दिला...तिला योग्य तें संस्कार देऊन स्वतःच्या पायावर उभे केले..
संगीताने खऱ्या अर्थाने 'ऐकावे जनाचे करावे मनाचे' ही म्हण सार्थ केली...