गोष्ट छोटी डोगराएवढी विषय:- अहिंसा अहिंसा हे बलवानांचे शस्त्र आहे....... अहिंसा हे बलवानाचे शस्त्र आहे...गांधीजी हे एक वाक्य जरी वाटलं तरीही त्या वाक्याच्या सखोल अर्थामध्ये विचार करत गुंतून जाण्यासारखे वाक्य आहे. कारण आज पर्यंत शस्त्र म्हटलं की ते हिंसेसाठी संहारा साठी वापरलं जातं परंतु याविरुद्ध अहिंसा म्हटलं की आजही आपल्याला नाव आठवतं ते म्हणजे महात्मा गांधी आणि दुसरं म्हणजे बुद्ध आणि या दोघांना मध्ये अहिंसाला घेऊन त्यांनी जे काम केले आहे ते वाखाण्याजोगा आहे. बुद्धाने अहिंसेला न्याय दिला आणि अहिंसा समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला एक धर्म मांडला तसेच महात्मा गांधीजींच्या आयुष्यात त्यांनी छोट्या छोट्या गोष्टींमधून शिकत शिकत आपल्या चुका मध्ये सुधार करत एक सर्वसामान्य राहणी मधूनही आपण उच्च विचार ठेवून आपल्या आयुष्याला एखाद्या ध्येयाप्रती समर्पित केलं तर आपण आपल्या विषयात कमीत कमी चुका करत एखाद्याला न दुखावता आपण मैत्रीपूर्ण व्यवहार करून आपल्या मार्गाने कष्टाने पुढे जाऊ शकतो हे दाखवून दिले. अहिंसा आणि सत्य या मार्गाने बलाढ्य शत्रूला आणि कठीण. परिस्थितीला सामोरे जाऊन त्यावर विजय मिळवता येतो. करुणा, मैत्री, अहिंसा ही तीन जीवनमूल्य हे आजच्या घडीला अत्यंत महत्त्वाची आहेत. ही तीन वेगवेगळी मूल्ये जरी असली तरी त्यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा संबंध आहे. मानवाचे अंतकरण करुनेणे ओतप्रोत भरलेले असावे. कुणाचाही द्वेष त्याने करता कामा नये. परस्परांमध्ये मैत्री भाव असला पाहिजे. आणि कितीही गरजेचे असले तरी हिंसा होता कामा नये. अलीकडे समाजात जे हिंसाचाराचे प्रकार घडत आहे आणि खास करून मॉब लिंचींग हा एक अमानवीय प्रकार आपल्याकडे सुरू आहे, त्याबद्दल अंतर्मुख होऊन आपण विचार केला पाहिजे. खैरलांजी, दादरी,ओडिसा (ग्राम स्टेन्स)आणि अलीकडे झालेले पालघर अशी कितीतरी शेकडो प्रकरणे आपल्याकडे घडली आहेत. एखाद्या झुंडीने धर्म ,जात किंवा काही संशय याच्या आधारे निष्पाप लोकांचे मुडदे पाडणे किती संयुक्तिक आहे? अगदी कोंबडीचे इवलेसे पिल्लू गाडीच्या चाकाखाली येऊ नये म्हणून धडपडणारा मनुष्य माणसांचे जीव घ्यायला कसा तयार होतो? हे हिंसेचे मानसशास्त्र काय आहे.?त्याच्या मनात करुणा मैत्री आणि अहिंसा त्याच्याऐवजी धर्म द्वेष ,जातीद्वेष आणि मानव द्वेष कोण निर्माण करतो? यातून कोणाचे हित साधले जाणार आहे आणि कोणाचे अहित याचा विचार समाजाने करायला हवा. हिंसेने कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही. करुणा, मैत्री भाव आणि अहिंसा या तत्त्वांची आज आपल्याला गरज आहे. भारतीय संविधानाने दिलेल्या नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे आपण संरक्षण केले पाहिजे. प्रत्येकाला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. आपण तो मान्य करायलाच हवा!