अहिंसा, कोणत्याही जीवाची हत्या न करणे म्हणजे अहिंसा. हिंसा दोन प्रकारची असते एक शारीरिक व दुसरी मानसिक. शारीरिक हिंसेमध्ये त्या व्यक्तीच्या शरीराला इजा होते . प्रसंगी प्राण सुद्धा जातात. खून करणे, मारहाण करणे हे शारीरिक हिंसेची उदाहरणे. शरीरावर झालेले घाव दिसतात, भरुन सुद्धा येतात. पण मानसिक हिंसेत शब्दा द्वारे केले जाणारे घाव दिसत नाहीत. पण त्यामुळे मनाला खूप मोठी जखम मात्र निश्चित होते. व ती कधीच भरून न निघणारी असते. एखाद्याला टोचून बोलणे, टोमणे मारणे एक प्रकारे वर्मावर घाव ठेवल्यासारखे आहे. ही एक प्रकारची मानसिक हिंसाच आहे. यामुळे होणारी जखम जरी दिसत नसली तरी वारंवार असे घडत असेल तर त्या व्यक्तीच्या डोळ्यातून पडणारे पाणी म्हणजे त्या जखमेतून वाहणारे रक्त असते.
मन वेदनांनी भरलेलं असताना काठोकाठ....
इथे बंद ठेवावेत लागतात ओठ....
मुक्या वेदनांना मग डोळे करतात बोलके....
सारा भार पापणीत घेऊन मनाला करतात हलके.
म्हणून कुणाच्या मनाला घाव पडतील असे बोलणे टाळावे. राग क्षणभराचा असतो पण तो व्यक्त करताना आपल्या भावना आवरता आल्या पाहिजे.
शब्दच तारतात....
शब्दच मारतात....
दुखावलेल्या मनाला....
शब्दचं सावरतात.
कहते है शब्दोंको दात नही होते, लेकिन शब्द जब काटते है तो दर्द बहुत होता है, कभी कभी घाव इतने गहरे हो जाते है कि जीवन समाप्त हो जाता है परंतु घाव नही भरते, इसलिये जीवन मे जब भी बोलो मीठा बोलो, मधुर बोलो.
शब्द शब्द सब कोई कहे...
शब्द के हाथ न पांव...
एक शब्द औषधी करे...
और एक शब्द करे सौ घाव...
Radha kund satsanga
म्हणून बोलतांना विचार करा ,बोलून विचारात पडू नका. अहिंसा एक मानवता धर्म आहे. कोणतीही हिंसा असो मग ती शारीरिक असो वा मानसिक वाईटच म्हणून अहिंसा या गांधीजींच्या तत्वाचे अवलोकन करा. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे म्हणजे मानवता धर्म. परमेश्वर कृपेने आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे. त्याची सार्थक करूया .प्रेमाने प्रेम वाढते आणि द्वेषाने द्वेष. म्हणून प्रेमाने राहूया.