अहिंसा एक शक्ती

लघुकथा
अहिंसा

अहिंसा आणि धर्म यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. प्रत्येक धर्माचे सार हेच सांगत की , हिंसा करू नका.
अहिंसा परमो धर्म तथा अहिंसा परम तप:
अहिंसा परम सत्य ततो धर्म प्रवर्तते

अहिंसा हा परमश्रेष्ठ धर्म आहे. अहिंसा हे परम तप आहे. अहिंसा हे परम सत्य आहे . सत्यापासूनच धर्माचे प्रवर्तन व संरक्षण होते.

अहिंसा प्रधान माझा भारत देश महान आहे भारतामध्ये जन्मणारे महावीर आणि राम आहेत महावीर आणि राम आहेत
भारत देश हा जगातील अनेक धर्मपंथसंप्रदाय असलेला एकमेव असा देश आहे. प्राचीन संस्कृतीमध्ये अहिंसेला फार महत्त्वाचे स्थान आहे. प्राचीन काळाचा विचार केला तर असे लक्षात येते की भागवत धर्म,जैन धर्म, बौद्ध धर्मामध्ये अहिंसेलाच महत्त्व आहे. महाराष्ट्रात महानुभाव पंथ, वारकरी संप्रदाय तसेच संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव अशा सर्व महान संतांनी अहिंसेचा पुरस्कार केला आहे.

पण आधुनिक काळात विज्ञानाच्या क्रांतीमुळे मानवाचे जीवन आमुलाग्र बदलून गेले आहे. संगणक युगामुळे संपूर्ण जग जवळ आले आहे. परंतु ,वैयक्तिक स्वार्थ ,स्पर्धा, द्वेष, अशांतता या मानवी वृत्तीमुळे माणूस संकटाच्या खाईत लोटला जातो की काय असे वाटते. माणसाची वैचारिक, सामाजिक, नैतिक, आर्थिक मनोभूमीस बदललेली आहे व दया, क्षमा, शांती, संयम अशा उदात्त विचारांना तिलांजली दिलेली आहे.
मानव आणि राक्षस यामध्ये फरक फक्त अहिंसेचा हिंसक क्रूरवृत्ति दानवाची,
अहिंसा तत्त्वाचे पालन
हीच खरी ओळख मानवाची

अशा अंधकारमय परिस्थितीत विश्व कल्याण साधण्यासाठी समस्त विश्वामध्ये शांती लाभावी यासाठी भगवान महावीर गौतम बुद्ध व परमपूज्य महात्मा गांधी यांनी अहिंसा तत्त्वाचे पालन करण्यास सांगितले आहे. प्रत्येकाला आपला जीव सर्वात प्रिय असतो पण पण आज क्रूर हिंसक वृत्ती बळावत आहे दहशतवादाने संपूर्ण जग पोखरले जात आहे.टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर पडलेला माणूस संध्याकाळी घरी सुखाने परत येतो की नाही याची शाश्वतीच नाही. भगवान महावीरांनी हजारो वर्षांपूर्वी \"जिओ और जीने दो\" या तत्त्वाचे पालन करण्यास आपणास सांगितले आहे. अहिंसा, अर्थातच इतरांच्या प्राणांचे रक्षण करणे, हिंसा, पातक न होऊ देणे. हाच खरा श्रेष्ठ मानव धर्म.

अहिंसेचे अस्त्र देती जीवनदान सर्वांना
काम,क्रोध, मोह, मत्सर तिलांजली या कुभावनांना

असे म्हणतात एखाद्या व्यक्तीने अहिंसा तत्वाचे पालन केले की त्याला सम्यक दृष्टी प्राप्त होते. त्याचे चारित्र्य व शील उत्कृष्ट होते. त्याच्या मनातील हिंसक भावना नष्ट होतात. समाजात बंधुभाव उच्चतम व आदर्शाचे पालन व नैतिकतेची रूजवण होते.
आपल्या मुखातून इतरांविषयी वाईट भावना व्यक्त होणे हे हिंसाच आहे. लोकांचे अकल्याण होईल असे शब्द कदापी वापरू नये हेच खरे अहिंसेचे पालन ज्याप्रमाणे धनुष्यातून निघालेला बाण पुन्हा परत येत नाही. त्याचप्रमाणे मुखातून निघालेल्या एखादा वाईट शब्द घडून गेलेली वाईट कृती ही कित्येक विध्वंसक घडून आणतात.
आज माणूस चंद्रावर वास्तव्यकरणाचे स्वप्न पाहत आहे ज्ञान आणि विज्ञान क्षेत्रात प्रचंड क्रांती घडून येत आहे विकासाच्या अतिउच्च शिखरावर विराजमान होण्यासाठी देशा देशात चढवून लागली. परंतु, ज्ञानाचा स्पोर्ट जर विध्वंसक वृत्ती निर्माण करीत असेल तर प्रगती शून्य आहे. विचारवंत ,संशोधक हे शांत असतील तर शांत प्रवृत्ती निर्माण होतात. त्यातूनच सद्विचारांची हितकारक गंगावाहू लागेल.

कलिंगाच्या युद्धातील रक्तपात पाहून भगवान बुद्धांना वैराग्याची प्राप्ती झाली व प्रज्ञाशील करुणा तत्त्वांची जगाला ओळख पटली. चिंचेचा निषेध झाला म्हणून आज अनेक ठिकाणी विपश्यना केंद्रातून मनशांती व अनेक जीवनमूल्य रुजवली जात आहेत.
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे संत तुकारामांनी म्हटले आहे. पण ,आज मानव झाडांची कत्तल करून सिमेंटच्या आलिशान बंगल्यात राहत आहे पण हे किती काळ चालेल झाडांमध्ये सुद्धा जीव असतो आणि म्हणून त्यांची हिंसा करू नये. हे आपल्यासारख्या सुज्ञ माणसाला देखील कळत नाही. म्हणूनच पर्यावरणाचे संवर्धन होत नाही. प्रदूषण वाढून अनेक लोकांचे बळी जात आहे.

अहिंसा हे अमृत आहे. ते मानव जातीस तारणारे आहे. गाय,बैल ,मांजर, कुत्रा हेसर्व प्राणी मानवास उपयोगी आहेत. त्यांच्यावर दया करावी. अहिंसा धर्म पाळण्यास कठीण जरी वाटत असला तरी त्याची फलश्रुती नारळाच्या मधुर जलासारखी गोड आहे.
अहिंसा माणसाच्या स्वाभिमानाचे व आत्म सन्मानाचे पूर्णपणे रक्षण करते . अहिंसा आणि सत्य यांचा मार्ग तलवारीच्या धारेप्रमाणे तीक्ष्ण आहे . त्यामुळे योग्य पद्धतीने अहिंसा अमलात आणल्यास आत्म्याचे रक्षण होते.

ज्याप्रमाणे एखाद्या आंधळ्या व्यक्तीला आपण सुंदर दृश्य पाहण्यासाठी प्रेरित करू शकत नाही. त्याचप्रमाणे भित्र्याला अहिंसेचा पाठ शिकवता येऊ शकत नाही. भित्रेपणावरील पांघरून म्हणजे अहिंसा नव्हे. तो तर वीरांचा सर्वोच्च गुण आहे.हअहिंसा ही दुष्टपणाची आणि सुडाची भावना यांच्या विरुद्ध संघर्ष करणारी अधिक सक्रिय शक्ती आहे. अहिंसा आणि शांतीपूर्ण सहयोग यातच मानवाचे हित आहे. कारण , अहिंसा परमो धर्म , म्हणजेच अहिंसा हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे .
अहिंसेचे शक्तिशाली अस्त्र योग्य प्रकारे चालवून शिवाजी महाराजांनी देखील स्वकीयांची रक्षा केली. तसेच सम्राट अशोक, सम्राट हर्षवर्धन यांची देखील उदाहरणे बघण्यासारखी आहे याकरिता प्रभावी समय सूचकता आणि फार मोठे मनोबल यांची गरज असते. माणसाच्या हातून नकळत का होईना हिंसा घडतेच मग ती कोणत्याही कारणासाठी घडणारी असो. परंतु ,जीवन अर्थ व धर्म कार्यामध्ये घडणारी हिंसा ही क्षमस्व असते.
तराजूच्या एका पारड्यात जितका संयम, अहिंसा टाकत जाऊ तितके दुसरे प्रगतीचे, विश्वासाचे प्रेमाचे पारडे वर जाते.

अहिंसा एक शक्ती आहे
अहिंसा माझा विश्वास आहे
विश्व कल्याण साधावे
हाच आमुचा एकच ध्यास आहे

©®सौ.आश्विनी सुहास मिश्रीकोटकर