अहिल्याबाई होळकर-विनम्र अभिवादन

Danshur parakrami karyrutwan dharmparayan v karykshm rajyakarti mhanun ahilyabai holkar he nav marathyanchya itihasat suvarnaksharat lihile gele aahe

अहिल्याबाई होळकर-विनम्र अभिवादन

दानशूर, पराक्रमी कतृत्ववान,धर्मपरायन व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्या बाई होळकर हे नाव मराठयांच्या इतिहासात सुवरणाक्षरात लिहाले गेले आहे..
अहिल्या बाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले.त्याला त्यांची धर्मपरायण आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली..
 बाई काय राज्यकारभार करणार- ही दरबारी मंडळीची अटकळ त्यांनी सरळ खोटी ठरवली..
अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्त्या होत्या. अहिल्याबईच्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना त्यांचा लौकिक वाढवणारी आहे. आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की,जो कोणी चोर ,लुटारू,दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करील,त्या शूर माणसाशी मुक्ताबाई चा विवाह करण्यात येईल... त्यावेळी जातपात बघितली जाणार नाही,हा अलौकिक विचार जाहीर करून त्या थांबल्या नाहीत तर तशी कृती देखील केली.. अश्या महान व्यक्तित्वाला त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम
“ उरी बाळगुनी स्वप्न मराठी सत्तेचे
 बांधूनी हजारो गड किल्ले,मंदिरे
जिने घडविले हिंदुस्थानला
एक च होती ती अहिल्याबाई होळकर”