Oct 18, 2021
कथामालिका

अहिल्या... संघर्ष मातृत्वाचा भाग बारा

Read Later
अहिल्या... संघर्ष मातृत्वाचा भाग बारा
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

आधीच्या भागात आपण पाहिले की, 


अहिल्यानी नर्मदाबद्दल काही विचार केला होता, नर्मदा लवकर बरी व्हावी म्हणून  तिनी तिला झाशीचा चेहरा दाखवला, थोड्यावेळासाठी का होईना नर्मदाच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं.


अहिल्याची अनावधानाने रस्त्यात माधवराव शी गाठ पडली, सासुबाई आणि माधवराव दोघांनीही प्रश्नोत्तरे आणि टोमणे सुरू झाले, पण अहिल्या  न घाबरता त्या प्रसंगाला सामोरे गेली.
विठ्ठल ला अहिल्याचा आधार वाटायला लागला...

आता पुढे,
झाशी आता पूर्णपणे बरी झाली...अहिल्या तिला घरी घेऊन आली..दारात पाय ठेवत नाही तोच..


“अहिल्ये, थांब जरा...अग लक्ष्मी घरात येतीये..असच आणायचंय व्हय तिला, थांब की माझ्या लेकीला ओवाळू दे....
विठ्ठल घरात गेला आणि पटकन देव्हाऱ्यासमोर ची आरतीची थाळ आणली... विठ्ठल नी झाशील ओवाळले आणि आत आणल.....


“ आता झाशीच्या आईला पण आण की लवकर घरी,झाशीला कधी तिच्या आईचं प्रेम मिळणार.?...

 

नर्मदा वहिनीला लवकर घेऊन ये...तिनी खूप सोसल , आता तिला हिच्या प्रेमात पुरत बुडू दे...आणि मातृत्वाचा आनंद घेऊ दे.... माया, ममता ह्या सगळ्यांचा तिला अनुभव घेऊ दे....


 
“हो, डॉक्टर म्हणले की दोन तीन दिवसात सुट्टी देतो म्हणून.....”
 आता एकदाची नर्मदा आली ना, की बघ... कस सगळ हसतखेळत घर बनतं.... 

 

“पण अहिल्या तू हे घर सोडायच नाही आता... तू ह्याच घरात राहायचं माझ्या संग माझी लहान बहीण बनून....

 

“ बहीण बनून...नाही पणत्या भाऊ..मी कोणतच नात निभावण्याच्या लायकीची नाही....तुझ्याशी नात नाही निभावू शकली तर...

 

“काय बोलतीस तू... तुझा भाऊ खंबीर आहे, तुझ्या पाठीशी उभा राहील.... तशी परिस्थिती आली, कुठली हाल झाले तरी मी तुला सोडणार नाही असा शब्द आहे विठ्ठलचा.....

 

 “पणत्या भाऊ मला माहिती आहे तू माझी साथ देशील.... पण ही माझी लढाई आहे ना, मला एकटीला लढायचे... मी या जगात एकटी आलेना व माझ्या सोबत कुणाला घेऊन थोडे आले.....”

 

हे माझं आयुष्य आहे, माझी लढाई....तू एवढं बोललास ना तरी खूप आहे माझ्यासाठी.... आणि काय रे सोबत आहो सोबत आहो म्हनतोस....वरती गेली तर काय माझ्या सोबत येणार आहेस व्हय.... दोघेही खळखळून हसले...

 

 अहिल्ये, तुझं कौतुक करावं तेवढं कमीच गं... एवढ्या लहान वयात एवढी समजूतदार झालीस बघ...


 “परिस्थिती माणसाला सगळच शिकवते आणि पणत्या भाऊ मला बी शिकवलच की...

 

“ आता माझी गौराई आणि झाशी दोघी माझ्याजवळ आहेत आता मला कोणत्याही गोष्टीची काही चिंता नाही... 

 

आता तुझं बोलून झालं असेल तर मी मंदिरात जाऊन येते....

 

 अहिल्या झाशी आणि गौराई ला घेऊन मंदिरात गेली.. मंदिरात दर्शन घेतले आणि परतत होती तेवढ्यात तिला पंडित जी ने आवाज दिला...


“ ये पोरी इकडे ये...”

“ काय महाराज जी....

“ हे दोन्ही तुझी पोर आहेत....
“ होय....


“वाटत नाही तुझी पोर आहेत....तुझं वय तर खूप लहान दिसते...”

“ महाराजजी ह्या दोन्ही मुली माझ्याच आहेत..


“ मी या पोरीला जन्म दिला नसला तरी माझ्या पोटची पोर आहेत, जिवापेक्षा जास्त प्रेम यांच्यावर करतीये मी...

 

 ज्यांनी जन्म दिला त्यांनी टाकून दिलं...ही निरागस कोवळी मूल ह्यांचा काय दोष... अशी कशी माणसे असतात या जगात कुणास ठाऊक? त्यांना आपल्या लेकराच काहीच वाटत नाही... 

 

पंडितजी, तुम्हाला अशी अनाथ मुले दिसली की तुम्ही मला सांगा मी करीन त्यांचा सांभाळ, मी माझ्या पोटाला चिमटा देईल पण त्यांना पोटभर जेवू घालेना.... शब्द आहे माझा....
 “खरंच ग पोरी खूप मोठी झालीस तू,  एवढ्या लहान वयात खुप काय केलेस तु .....”

 

नाही पंडित जी अजून मी काहीच केलं नाहीये मला खूप काही करायचं आहे आणि करेल मी, माझं ध्येय मला सापडले त्याच्या वाटेवर चालत चालत मी माझे ध्येय पूर्ण करणार, माझा ठाम निश्चय आहे....

 

“ सांभाळून पोरी ,  ही दुनिया लई वाईट आहे स्वतःच्या जीवाची पर्वा करून सगळं कर, केव्हा काय होईल सांगता येत नाही....


अहिल्या पंडितजी चा आशीर्वाद घेऊन निघाली....


मंदिरातून परत येताना , अहिल्या नी बघितल...वडाच्या झाडाला झुले बांधून मुले झोका घेत होती आणि खूप मज्जा करत होते, अहिल्या पण गौराईला घेऊन गेली झोपाळ्यावर बसून झुलु लागली.... किती वर्षानंतर आज अहिल्या झोपाळ्यावर बसली होती, तिला इतका आनंद झाला की ती शब्दात व्यक्त करू शकत नव्हती.... तिच्या चेहऱ्यावर तेज झळकत होतं, तिने गौराईला पण बसवला आणि तिला झुलवलं, त्यानंतर बराच वेळ ती त्या मुलांसोबत खेळली जणू त्या मुलांसोबत खेळून अहिल्या पण लहान झाली होती आणि तिची बालपणीची आठवण जागी झाली...

 

लहान असताना ती अशीच खेळायची पण काही वर्षातच तिचं बालपण तिच्यापासून हिरावून घेतलं गेलं, आज त्या मुलासोबत खेळून तिचं मन अगदी प्रसन्न वाटत होतं नुसती झोपाळाच नाही झुलली तर लगोरी खेळली, गील्ली दांडू खेळली, शेतात लपंडाव खेळली... 

 

अहिल्या च्या चेहर्‍यावर अगदी आनंद पसरला होता... आनंदाच्या छटा चेहऱ्यावर उमलत होत्या...

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

ऋतुजा अतुल वैरागडकर

Working woman

I m working woman... i have 2 baby.. I m learning... i like reading and writing