अहिल्या... संघर्ष मातृत्वाचा भाग तेरा

Ahilya ghari aali

आधीच्या भागात आपण पाहिले  की, 


अहिल्या मंदिरातून परतत असताना तिला लहान मुले खेळताना दिसली, शेतामध्ये झोपाळा झुलत होते...

अहिल्या पण गौराई ला घेऊन गेली, तीही त्या मुलांबरोबर लहान होऊन झूला झुलली, काही खेळ खेळली तिलाही तिचे बालपणीचे दिवस आठवले..

अहिल्याच्या चेहर्‍यावर आनंद झळकत होता....


 आता पुढे,


अहिल्या घरी आली तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता....

 विठ्ठलनी विचारलं,


“ काय ग अहिल्ये, चेहरा अगदी चकाकतोय तुझा, इतका आनंद? काय झालं? कुठे गेली होतीस? कुठून आलीस?

“ कुठे नाही रे पणत्या भाऊ, मंदिरातून येत होते ना लहान मुले खेळताना दिसली...

झोपाळा झुलत होती, मी पण थोडा वेळ त्यांच्यासोबत झोपाळा झुलले, खेळले आणि खूप दिवसानंतर मला माझ्या बालपणीची आठवण आली, मला खूप आनंद झाला बघ.... 

 विठ्ठल हसत...


“ दिसतय तुझ्या चेहऱ्यावरून, तुला किती आनंद झाला ते...


 चल तू आलीस ना, मी वाणसामान घेऊन येतो, थांब थोडावेळ घरी....


“ हो जा तू, मी बघते इकडचं...

विठ्ठल वाण सामान आणयला गेला, दुकानदार सामान काढत होता...

विठ्ठल समोर स्टूलवर बसला, त्याला तिथे वर्तमानपत्र दिसलं त्याने ते घेतलं आणि त्याच्यावर नजर फिरवली विठ्ठलला एवढं वाचता येत नव्हतं पण त्याला एक फोटो दिसला, त्यानी कुतुहलाने त्या दुकानदाराला विचारलं,

“ ये भाऊ यावर काय लिहिले जरा वाच की...


 “तुला काय करायचंय विठ्ठला? नसत्या चौकशा कशाला करतोस?

“ वाच ना रे भाऊ, काहीतरी दिसतय चित्रात म्हणून विचारतोय..


“  बर वाचतो, दुकानदारानी माहिती वाचली आणि


“ काही नाही... एक संस्था आहे अनाथाश्रम  चालवतात, तिथे काम करायला मुलगी पाहिजे म्हणतात...


विठ्ठल प्रश्नार्थक चिन्हाने


“ मुलगी पाहिजे?... 


“हो.


भाऊ समोर वाच ना, त्याबदली ते काही पैसे वगैरे देणार आहेत का..?


“हो देणार आहेत की, महिन्याच्या महिन्याला... काम पाहून देऊ असे लिहिले आहे.... रक्कम टाकली नाही आहे..

“ ठीक आहे.. ठीक आहे.. भाऊ तो तेवढा चिटोरा कापून देनारे....


“ आता तुला कशाला हवाय?....


“माझी बहीण.. अहिल्या... तिला देईल ती पाहून खूष होईल, तिला आवडत असं काय काम करायला... तिला देईन तिला काम मिळेल आणि भरपूर पैसा मिळेल...

“ घे घे...घे तुझं सामान झालं... जावा इथून डोका खाऊ नकोस..... विठ्ठल वाणसामान घेऊन घरी आला....

“ अहिल्या... अहिल्या..


“ काय रे ,काय झालं? कशाला ओरडतोस..?

“  तुझ्यासाठी चांगली बातमी घेऊन आलोय ..


“चांगली बातमी?... ती काय?.


“तुझ्यासाठी काम पाहून आलो,नोकरी...नोकरी...

“अहिल्या खळखळून हसली..नोकरी आणि मी.. 

“काय झालं? अशी का हसतेस? अग खरच नोकरीच, कुठेतरी बाहेर जाऊन कोणातरी साठी काम करणं म्हणजे नोकरीच म्हणतात ना त्याला, तुझ्यासाठी नोकरीच घेऊन आलोय मी..

हे बघ, वाचता येत नाही पण संस्थेच्या नाव दिले आहे त्या संस्थेत जाऊन काम करायचय, त्याबदलात ते आपल्याला पैसे देतील....

“ अहिल्या तु जा याठिकाणी तुला आवडतं ना गं, तुझ्या आवडीचं काम आहे .....

“पण पणत्या भाऊ...


 हे तर शहरातील दिसते, मी कशी जाईन शहरात... रोज जाणं येणं कशा न करायचं , राहू दे मी इथेच छोटे-मोठे काम करीन...

“ तू नको चिंता करू ,मी सायकलनी तुला सोडून देत जाईल,तू कामाकडे लक्ष दे

“ अरे हो पण पोरींच ?...पोरींना कोण बघणार ,हे दोघे घरी राहतील...

“ तू त्यांची काळजी नको करूस ग, मी आता वहिनीला घरी  आणणार आहे, ती सांभाळ करेल दोघांचाही... तू कामाचं बघ ना तेवढेच दोन पैसे हाती येतील आपल्या. .


“ ठीक आहे मी उद्या सकाळी जाते विचारपूस करून येते, काय म्हणतात ते, किती पैसे येतात वगैरे विचारते....

 दुसऱ्या दिवशी सकाळी अहिल्या शहराच्या ठिकाणी गेली, ते कागद दाखवत दाखवत पत्ता विचारत विचारत त्या संस्थेत पोहोचली, तिथे तिला एक आजीबाई दिसली ...

 आजी आजी, इथे पाठक साहेब कोणते आहेत... मला त्यांना भेटायचं होतं...

“ का ग पोरी? तुला कशाला भेटायचे?


“ ते पेपर मध्ये बातमी पाहिली मी, त्यांना कामाला मुलगी हवी होती ना त्याच्यासाठी मी विचारायला आले..

“ असं व्हय मी घेऊन चलते तुला, आजी अहिल्याला आत घेऊन गेली, दहा-बारा.. कमी वयाचे मुलं खेळत होती दोन-तीन मुले झुलत होती ,काही झोपली होती, काही बाहेर खेळत होती अशी खूप सारे लहान मुलं पाहून अहिल्याला खूप छान वाटलं...

“ एक मुलगी आली तुम्हाला भेटायला...


“ कोण आहे? काय नाव? 


“ साहेब माझं नाव अहिल्या मी शेजारच्या गावी राहते वर्तमानपत्रात तुमच्या संस्थेचे नाव पाहिलं आणि विचारपूस करायला आले तुम्हाला कामाला मुलगी हवी होती ना हो...

“ बस कुठे राहतेस? कोणकोण आहे घरी तुझ्या?
“म्हणलं तर कुणीच नाही, बालविवाह झाला होता साहेब... सासर सोडून आले आणि माहेरी पण नाही गेले ......

 साहेब मला दोन मुली आहेत, म्हणजे माझ्या नाही, अनाथ.... त्यांना सांभाळते... समोर काही करायची इच्छा होती साहेब, तुमच्या संस्थेचे नाव ऐकलं आणि आपसूकच पाय इकडे आले बघा, असं वाटलं मनातली इच्छा पूर्ण झाली,  साहेब आता तुमच्या हाताखाली मला सर्व शिकवा... या लहान लहान मुलांचं भल होवो हीच इच्छा....

“ तू जा, काम कर.... तुझं काम पाहून ठरवू मग किती पैसे द्यायचे ते... 

 “ठीक आहे साहेब...


 अहिल्या त्या मुलांकडे गेली पाच-सहा वर्षे, दहा-बारा वर्षे काही नुकतीच जन्मलेली मुले होती...

तिने नवजात बाळाला हातात घेतलं, त्याला कुरवाळले त्याला छातीशी कवटाळलं आपसूकच अहिल्याचे डोळे भरून आले आणि डोळ्यातला एक थेंब त्या मुलाच्या गालावर पडला तसेच त्यानी डोळे उघडले आणि तिच्या कडे बघून हळूच हसला... जणू त्याची आणि अहिल्याची जन्मोजन्मीची ओळख होती...

अहिल्या खूप सुखावली ....

दिवसभर तिथे काम करून अहिल्या रात्री घरी आली...


“ अहिल्ये, आलीस का.. मी आलो असतो ना तुला न्यायला...


“ नाही रे कुठे रोज रोज तू मला आणण नेणं करणार, जाईन मी...


“ बरं कसा गेला तुझा दिवस?


“ खूप छान... छोटी छोटी खूप मुलं होती, खूप गोड होती रे.... मला खूप बरं वाटलं, माझा दिवस खूप छान गेला...

आपल्या हातून काहीतरी छान घडत आहे याचं तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं..

 क्रमशः

🎭 Series Post

View all