अहिल्या... संघर्ष मातृत्वाचा भाग सात

Ahilyani thodas khaun ghetal ani thodyawelani punha aajila hak marali

आधीच्या भागात,

अहिल्या स्वतःचा जीव वाचवत पळाली, पण माधवरावांनी तिला शोधून घरी आणून खोलीत कोंढुन ठेवलं....

चार दिवस अहिल्याच्या पोटात अन्नाचा कण ही गेला नव्हता... शेजारच्या आजीने तिला भाकर आणि चटणी आणून दिली..आणि खायला सांगितल....बोलताना आजीचे डोळे डबडबले आणि अहिल्याला पण अश्रू अनावर झाले.

आता पुढे,

अहिल्या नी थोडंस खाऊन घेतलं...
आणि थोड्यावेळानी पुन्हा आजीला हाक मारली..

“आजी तुम्ही मला मदत कराल...मला इथून बाहेर काढाल, जेव्हा घरी कुणी नसेल तेव्हा....
ती समोर काही बोलणार तेवढ्यात दाराचा आवाज झाला 

“आजी तुम्ही जा.....

अहिल्यांनी पटकन खिडकी च पट लावून घेतलं... आणि जमिनिवर बसली...
दार उघडला तशीच प्रकाशाची किरण अहिल्याच्या डोळ्यावर आली....


“अहिल्या.....
“वन्स तुम्ही....?

“कशी आहेस ग...मला माफ कर मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही...

“यमुना वन्स तुम्ही मला मदत कराल?.….


“काय?...


“मला यातून बाहेर काढा,मी हात जोडते हो तुमच्यासमोर. ..
“नाही नाही , आईला कळलं तर...…मला माफ करा, पण मी तुमची मदत करू शकत नाही....


कुणाचा तरी आवाज आला तशीच यमुना बाहेर गेली आणि दार लावून घेतल....

अहिल्या मात्र अश्रू ढासळत बसली....


दुसऱ्या दिवशी माधवराव खोलीत जेवण घेऊन आले...
अहिल्या जमिनीवर पडून होती
माधवराव दुरूनच


“ये चल उठ....खाऊन घे ....


अहिल्या कडून काहीच प्रतिक्रिया आली नाही , माधवरावांनी दोन तीनदा आवाज दिला पण ती काहीच बोलली नाही...

त्यांनी हळूच तिला हलवल ,अहिल्या ची शुद्ध हरपली होती...त्यांनी लगेचच तिला वैद्य कडे घेऊन गेले.. अहिल्याची तब्बेत जास्तच बिघडली...वैद्य नी शहरात न्यायला सांगितले...

माधवरावांनी येसूबाई ला सगळं सांगितलं....त्या काही बोलणार त्याआधीच ते निघून गेले....

माधवरावांनी अहिल्याला शहराच्या दवाखान्यात नेलं....तिथे भरती केलं....  आणि आपली जबाबदारी संपली अस  समझुन निघून गेले....आता ती मरो नाहीतर जगो  आपल्याला काही लेण - देणं नाही...मनातल्या मनात पुटपुटले आणि निघाले....

घरी गेल्यावर त्यांनी सगळा प्रकार येसूबाईना सांगितला
येसूबाई त्यांच्यावर खूप चिडल्या 

“माधव, तुला कळते काय?... तु काय केलस ?.....तू तिला तिथे वाऱ्यावर सोडून आलास, आता ती मोकळी झाली.... आपल्या ताब्यातून तिची सुटका झाली ... असं व्हायला नको होतं..... अरे तिने बाळाला जन्म दिला आणि मुलगी झाली तर तिला    आपलेच नाव लागेल, तू वडील म्हणून ते तुझंच नाव लावेल .....आपल्याला हे नकोय आपल्याला मुलगी नाही वंशाचा दिवा हवाय , तुझ्या डोक्यात कस आल नाही हे..... जा जा तिला घेऊन ये.

 माधवराव तसेच तडक निघाले,  शहराच्या दवाखाना गाठला पण अहिल्या त्यांच्या हाती लागली नाही... दवाखान्याच्या बाहेर आले तेव्हा बाकावर डोक्याला हात लावून बसलेले, अचानक त्यांचे लक्ष बाजूच्या बाकावर गेलं.... बघताच क्षणी ते दचकले... 

अहिल्या बाजूच्या बाकावर बसली होती,  माधवरावांच्या जीवात जीव आला..


 ते अहिल्या जवळ गेले.


“ किती शोधायचं तुला?... कुठे गेली होतीस अहिल्या?..

अहिल्या नम्र आवाजात
“ मी इथेच होते..

 अहिल्याला अजूनही बरं वाटत नव्हतं, बोलतानी दम लागायचा, आवाजात कंपन होत... अजूनही पूर्णपणे दमलेली वाटत होती....

 माधवरावांनी तिचा हात पकडला
“ चल... घरी चल..
“ मला घरी नाही यायचं ....
“तुला चलावच लागेल , आईने घरी बोलवले चल....
 पण माझ्या  पायात त्राण उरलं नाहीये, तुम्ही काही सोय करत असाल तरच मी येते.. तुम्ही काहीतरी सोय करा मी तोपर्यंत  ,इथे बसते...


 “ ठीक आहे,  मी बघून येतो.. काही मिळते का तू बस...
अहिल्यानी माधवरावांना जाऊ दिलं आणि तिथून पळ काढला.... धावत धावत एका घराजवळ आली,  घराचं दार उघड होत अहिल्या आत शिरली आणि आतून दार लावून घेतल....


तेवढ्यात आवाजाने एक बाई बाहेर आली, 


“ ये पोरी... कोण आहेस तू?... कुठे राहतेस ?... आणि घरात कशी घुसली..?.…

“मला पाणी हवय .. थोडे पाणी देता..
“ व्हय...व्हय ...बस...
 त्या बाईने तिला बसवलं आणि पाणी दिलं...
बाई अहिल्याच्या चेहऱ्याकडे बघत
“ये पोरी पोटुशी आहेस ना...मग अशी एकटीच कुठे फिरतेस....
अहिल्या चेहऱ्यावर हास्य आणत,
“ अहो पोटुशी आहे म्हणूनच तर फिरतीय...आपल्या बाळाचा जीव वाचविण्यासाठी धडपड करतीय ....तुमची हरकत नसेल तर मी एक रात्र राहू का इथं?..

“ नाही..नाही... उगाच तुझ्यामुळे माझ्या जीवाला घोर लागायचा..…”
“ बर, पण अंधार पडत पर्यंत तरी राहूद्या .... अंधार पडल्यावर निघून जाईन मी....
 अहिल्यानी तिला हात जोडून विनंती केली आणि म्हणून त्या बाईने तिला राहू दिल...

 इकडे माधवराव शोध शोध करून निघून गेले....


 रात्र झाल्यावर  अहिल्या त्या घरातून बाहेर पडली...
अनवाणी रस्ता कापत कापत एका झोपड वस्ती जवळ येऊन पोहोचली, तिथे डोंबारी लोक ,त्यांचा परिवार रात्रीचे खेळ खेळत बसले होते आणि तिथे गाणं गात होते

तुझ्या पायरीशी कुनी सान
      थोर न्हाई
साद सुन्या काळजाची
   तुझ्या कानी जाई
तरी देवा सर ना ह्यो भोग
       कशापायी
हरवली वाट दिशा अंधारल्या
           दाही
ववाळुनी उधळतो जीव
       मायबापा
वनवा ह्यो उरी पेटला
खेळ मांडला,खेळ मांडला
खेळ मांडला, नवा
खेळ मांडला

सांडली गा रितभात घेतला वसा तुझा
तूच वाट दाखीव गा ,खेळ मांडला
दावी देवा पैलपार पाठीशी तू ऱ्हा हूभा
ह्यो तुझ्याच उंबऱ्यात खेळ मांडला

उसवलं गणगोत सार आधार 
       कुणाचा नाही
भेगाळल्या भुईपरी जिणं अंगार
       जीवाला जाळी
बळ दे झुंझायाला किरपेची ढाल दे
इनविती पंचप्राण जिव्हारात ताल दे
उजविली कोक मायी
तरी न्हाई धीर सांडला, खेळ मांडला
खेळ मांडला, खेळ मांडला
खेळ मांडला देवा....

गाण्याचे एक एक बोल  अहिल्याच्या कानावर पडून काळजात घुसत होते,  हृदयाला एक एक चिरा पडत होता, जणू हे गाणं तिच्याचसाठी गायलेल आहे..... 

तिच्या एकेक आठवणी उजळत होत्या, तिची  कोक कशी उजवली गेली, तिच्यावर झालेले अत्याचार.. हे सगळं डोळ्यासमोर तरळत होत.....

अहिल्यानी कसबस स्वताला सावरल आणि त्या झोपडी जवळ गेली...

 तिथं एका बाईचं अहिल्या कडे लक्ष गेलं तिने तिची विचारपूस केली


“ काय बाई ,  कुठून आलीस?... बाजूच्या  गावची हाय?....
अहिल्यानी होकारार्थी मान हलवत


 “होय.......
“ हिकडे अंधाराची कुठे भरकटते?......
“ मला आसरा हवा होता....
 ती बाई हिच्या पोटाकडे बघून
“   काय ग पोरी पोटुशी हायस?...
अहिल्यानी फक्त मान हलवून हो म्हटलं
“ बस बस बस , काय खाल्लं की नाही?....
 हिनी फक्त नकारार्थी मान हलवली
“ मी खायला आणते तुला....


 त्या बाईंनी अहिल्याला जेवण दिलं... कितीतरी दिवसानंतर अहिल्याने पोटभर जेवण केलं, त्या बाईने तिला झोपडीच्या आत झोपायला जागा दिली. 

आज आहिल्या खूप शांतपणे झोपली सकाळी तिला जाग आली तेव्हा तिला स्वताला जाणवलं तिला खूप खूप बरं वाटत होतं, डोक्यावरचा ताण हलका झाल्यासारखा वाटत होता.

 तिने ठरवलं आता मागे फिरायचं नाही आता इथून फक्त समोर चालत जायचं,....अहिल्या काही दिवस त्यांच्या सोबतच राहिली त्यानंतर तीनी स्वतःसाठी झोपडी बनवली , त्या झोपडित राहू लागली.. दिवसभर कुठेतरी काम करून दोन वेळचं जेवण  मिळण्या पुरत काम करायची...

 एकदा काम शोधत शोधत एका मोठ्या वाड्याजवळ जाऊन पोहोचली. वाड्याच्या आत दाराला ठकठाक करुन काम मिळेल का असे विचारु लागली दारात माणूस उभा होता त्यानी तिला खालून पायाच्या बोटापासून ते वरती केसा पर्यंत तिच्यावर नजर फिरवली.. 


थोड्या वेळात त्याची पत्नी तिथे आली


“काय नाव ग तुझं...
“अहिल्या..

“सर्व कामे येतात ना, नाहीतर कामाच्या नावाखाली सगळा घोळ घालयाचीस....
“नाही नाही, समद येत मला...


“ठीक आहे, लाग मग कामाला, चल मी तुला सगळ समजावून सांगते... 


त्या माणसाची नजर वाईट वाटली पण नाईलाज म्हणून अहिल्यानी तिथे काम करायला सुरुवात केली, तिचं काम बघून तिथल्या बाईने तिला पूर्ण दिवस कामावर ठेवून घेण्याच ठरवलं...

अहिल्या पूर्ण दिवस तिथे काम करायची.....


 ती बाई पूर्णवेळ तिच्या मुलांसोबत राहायची आणि माणूस दिवसभर घरात लोळत बसायचा, त्या माणसाची नजर वाईट होती अहिल्याच्या लक्षात आलं होतं पण काय करणार बिचारी....

 एक दिवस बाई बाहेर गेलेली बघून त्या माणसाने अहिल्यावर डोळा फिरवला , ती गरोदर आहे हा विचारही त्याच्या मनाला शिवला नाही...

अहिल्या कशीबशी स्वतःला वाचवत तिथून निघाली आणि पुन्हा त्या घराचा उंबरठा ओलांडला नाही....

 दिवस सरत गेले अहिल्याला सातवा महिना लागला ...ज्या वस्तीत ती राहायची तिथल्या बायांनी तिची ओटी भरून तीच डोहाळजेवण केलं होतं....


आता अहिल्या ला चालणे, बसणे, उठणे नकोसं झालं होतं.... तिला खूप त्रास होत होता... जास्त कामही करता येत नव्हते... बरोबर खाणेपिणे नसल्यामुळे अहिल्या ला अशक्तपणा आला होता. कसे तरी तिचे दिवस सरत होते.

आठव्या महिन्याच्या अखेरीस अहिल्याला प्रसूती वेदना सुरू झाल्या, दवाखान्यात नेण्याची सोय नव्हती, म्हणून तिथल्या बायांनी तीची घरीच प्रसूती केली.... खूप संघर्षानंतर    अहिल्याने गोंडस मुलीला जन्म दिला......  आणि कुणाच्या तरी तोंडून निघालं,

लक्ष्मी आली....लक्ष्मी आली.... 

म्हणून तीच नाव लक्ष्मी ठेवलं....   

अहिल्याच्या आनंदाला उधाण आले, पण देवाच्या मनात भलतच काहीतरी होतं.


 इथेही अहिल्या चे दुर्देव जिंकले आणि घात झाला.…..


क्रमशः


काय लिहून ठेवलं असेल अहिल्याच्या नशिबात?....


इथेही तीच दुर्देव्य आडवं येत की काय?....


काय होईल पुढे ,हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा...


कथा कशी वाटली ते ही नक्की सांगा.


धन्यवाद

भाग सहा

https://www.facebook.com/581606972323826/posts/1083143265503525/?sfnsn=wiwspwa 

🎭 Series Post

View all