अहिल्या... संघर्ष मातृत्वाचा भाग पाच

Ahilya ani madhav ravanch prem haluhalu bahrayala lagal ekmekanchi odh vadhayala lagli

अहिल्या...संघर्ष मातृत्वाचा भाग पाच


आधीच्या भागात,


शेजारच्या बाईने अहिल्याची स्तुती केली ते येसूबाईला आवडलं नव्हतं...

त्या बाईने अहिल्याची तुलना यमुना शी केली आणि येसूबाईच्या मनाला ठेच लागली...

त्या यमुनेच्या भूतकाळात रममाण झाल्या,  यमुना सोबत जे काही घडलं त्याच पूर्ण चित्र त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं...यमुनानी आवाज दिला तेव्हा त्या भानावर आल्या...


आता पुढे,


अहिल्या आणि माधव रावांच प्रेम हळूहळू बहरायला लागलं,

एकमेकांची ओढ वाढायला लागली..माधवराव दिवस दिवस भर कामा निम्मित बाहेर असायचे... अहिल्याचा ही दिवस कामात जायचा...रात्री एकमेकांच्या सहवासात तासनतास गप्पा मारत बसायचे.... 


एकदा मंडई मध्ये आहिल्याची तिच्या गावची तिच्या जुन्या मैत्रिणीशी भेट झाली...


“अग काशी, कशी आहेस?...किती वर्षांनंतर भेट होत आहे आपली..कशी आहेस ग?....


“मी बरी आहे ग?..तू कशी आहेस?..


“मजेत...
“तू सांग..तुझं सगळं कसं चाललय?...


काशी च्या डोळ्यात पाणी आलं... मन भरून आलं, तशी ती अहिल्याला बिलगली....


“काय ग काशे...अशी काय रडायला लागलीस... ये बस इकडे बाकावर...आणि सांग मला काय झालंय...


“ तुझ्या लग्नाआधीच माझं लग्न झाल होत, माझ्या पहिल्या गरोदर पणानंतर मला मुलगी झाली, घरचे लय चिडले होते, माझ्या लेकीला तर मारायलाच निघाले होते, कसा बसा जीव वाचवून आई कडे ठेऊन घेतलं...आईच सगळं करते तीच...दोन महिन्यात पुन्हा गरोदर राहिले....आणि दुसऱ्यांदा बी पोरगीच झाली, आमच्या दोघींना मारण्याचे नाही नाही प्रयत्न केले...मी पळून आले तिथन...आणि आता दोन्ही लेकीला धरून इथेच राहते... तू इथे राहतेस माहिती नव्हत मला...


“इथे कुणासोबत राहतेस?..


“एकटीच राहते, जेव्हा पळून आले होते तेव्हा एका आजींनी आसरा दिला होता...तिच्यासोबत राहायचे...ती म्हातारी आता नाही या जगात...तिच्याच झोपडीत राहते मी...आणि पोटापाण्यासाठी रोज कामावर बी जाते....

मीच काय माझं सांगत बसले, तू सांग की तू कशी आहेस?..तुझ्या कडे आहे का काई?....


अहिल्या  हसून आणि थोडी लाजून


“नाही ग... ये तू  कधीतरी माझ्याकडे...


“हो, चल मी जाते, पोरी एकट्या आहेत घरी...


“ठीक आहे...


दोघीही आपापल्या रस्त्यानी निघाल्या ....


अहिल्या घरी आली ...तिच्याच विचारात होती....


माधवरावांनी आवाज दिला..


“अहिल्या...अहिल्या...


तिला हात धरून हलवलं..तेव्हा भानावर आली...


“काय ग ,इतक्या काय विचारात गुंतलीस..?..


“ह..नाही, काही नाही...सहजच...


“सहजच...मला तर हे सहज वाटत नाही आहे...


“आज मला माझ्या गावची मैत्रीण भेटली...तिनी जे सांगितलं ते ऐकून मला धक्काच बसला...अस खरच होऊ शकत...माणसं इतकी निर्दयी असू शकतात....


“काय झालं सांगशील...


“आपल्या यमुना वन्स सोबत जे काही घडलं होत ना, तसचं..


“तू मला सविस्तर सांगशील का?...


“हो..


अहिल्यानी सगळं सांगितलं...
माधवराव फक्त गप्प होते...
अहिल्या नी माधवरावांच्या चेहऱ्याकडे बघितलं


“काय झालं?.तुम्ही गप्प आहात...तुम्हाला यावर काहीच बोलायचं नाही आहे....


“नाही ग, तस नाही...


“मग कस आहे?....यावर तुमची काहीच प्रतिक्रिया नाही आहे...


“आता काशी बद्दल मी काय बोलू?....


“मी काशी बद्दल बोला अस म्हणतच नाही आहे....काशी बद्दल न बोलताही तुम्ही खुप काही बोलू शकता...


 उद्या माझ्या बाबतीत अस काही घडलं तर काय करणार आहात तुम्ही.... की तेव्हाही असेच गप्प बसाल.....


“अहिल्या, तोंड आवर....


“यात चिडण्यासारखं काय झालंय???.


पण ठीक आहे, तुम्ही न बोलताही मला उत्तर मिळालय...
अहिल्या उठून बाहेर अंगणात जाऊन बसली..
रात्री माधवराव एकीकडे कूस करून झोपले...पण अहिल्याला झोप आली नव्हती...काशीचाच विचार डोक्यात घोळत होता...


काही दिवसानंतर तीनीही हा विषय सोडून दिला, आणि विसरली काशीला...


सहा महिन्यानंतर अहिल्या ला दिवस गेले.... ही बातमी ऐकून सर्वांना खूप आनंद झाला...सुरुवातीचे आठ दिवस सगळ्यांनी खूप कोडकौतुक केले, लाड केले....अहिल्या खूप खुश होती....
पण म्हणतात ना


सुख आलं की मागोमाग दुःख येतच, जसे दिवसामागून रात्र, नियतीचा खेळच आहे हा....


सासूबाईनी अहिल्या ला खोलीत बोलावले, सोबत माधवराव पण आले,


“उद्याच्या उद्या वैद्य कडे चला, तपासणी करू घेऊ, आणि समोरच काय करायचं ते बघू...
माधवराव सगळं समजले पण
अहिल्या चकित होऊन,


“समोरच काय करायचं ते बघू म्हणजे...


“बघू म्हणजे,  तुझी तपासणी केल्यानंतर.. वैद्य तुला काही दिवस थोडंस पथ्यपाणी वैगेरे सांगतील ना ते बोलत होते मी... 
“सासूबाई नक्की....
“हो ग...जा तू आराम कर...
अहिल्या तिथून निघाली....
येसूबाई माधवरावांकडे बघून,


“ तुझ्या बायको ला आवर...उद्या तिथे तिने काही गडबड करायला नको...


“ दुसऱ्या दिवशी तिघेही वैद्य कडे गेले..


“ नमस्ते वैद्यजी...


“नमस्ते...


“वैद्यजी, ही माझी सून अहिल्या...आताच दिवस गेलेत...हाच महिना चुकला.... गरोदर आहे.... तिची तपासणी करायची होती....


“ ठीक आहे, तुम्ही बाहेर बसा... मी तिला तपासतो...
 वैद्य तिला आतल्या खोलीत घेऊन गेले आणि तिच्या हाताची नाळ तपासली... तिला तिथेच थांबवून वैद्य बाहेर निघाले आणि अहिल्या च्या सासु जवळ 
“हे बघा येसूबाई, तिची नाळ मी तपासली , तुमच्या सुनेला मुलगी आहे... आता समोर काय करायचं ते सांगा, मी औषधी देतो..

वैद्य कितपत खर बोलत होता, देवच जाणे...पण येसूबाईंचा त्यांच्यावर जाम विश्वास होता... आता याला विश्वास म्हणायचं की अंधविश्वास ?...

“ सांगायचं काय आहे त्यात, मला मुलगी नकोय ....


त्या दोघांच बोलणं अहिल्याने ऐकले आणि ती बाहेर आली...


“ सासुबाई मला शंका होतीच.... असं काहीतरी होणार असं मला वाटलं होतं, तरी मी तुम्हाला काल विचारले होते तुम्ही सांगितले... मी असं काहीही होऊ देणार नाही, माझ्या पोटात मुलगा असो किंवा मुलगी मला काही फरक पडत नाही मी त्याचा जीव घेणार नाही आणि कुणाला घेऊही देणार नाही...


“ माधव हात पकड तिचा....


“ सोडा.. सोडा मला, मी असं काहीही करणार नाही असं म्हणून आहिल्या तिथून पळाली... माधवराव तिच्यामागे धावले...
 अहिल्या कुठे जायचं या विचारातच घरी पोहोचली, तिला तिचच कळलं नाही की ती घरी पोहोचली, घरी गेल्यावर तिने सगळे गणपतरावांना सांगितलं 


“बाळ काळजी करू नकोस.. मी बोलेन तुझ्या सासूशी..
 मागोमाग माधवराव धावत आले


“ काय रे,असा काय मागेमागे धावत आलास...


“ काही नाही बाबा, हिने वैद्य कडून औषध घ्यायला नकार दिला आणि म्हणून मी तिला न्यायला आलोय...


“नाही बाबा, हे खोटं बोलतायेत ,   माझी तपासणी केली, माझ्या गर्भात मुलगी आहे असं सांगितलं ..


बाबा मला माझ्या मुलीला मारायचं नाहीये तिला या जगात येऊ द्यायचं.... मला तिला मारायचं नाही बाबा....


 थोड्या वेळात सासुबाई पोहोचल्या
 गणपतराव तिच्याकडे बघून 


“हे काय चालले आहे?...
“ हे बघा, तुम्ही यात पडू नका, तिच्या गर्भात मुलगी वाढतीय, मला या घरात मुलगी नको...


“अग पण, यमुना आपली मुलगीच आहे ना...
“ हो पण बघितलं ना , तिच्या बाबतीत काय झाले.....


“ तिच्या बाबतीत ते झाले म्हणून तू अहिल्याच्या बाबतीत तेच करणार आहेस.. हे चुकीच आहे.....
 “ते काहीही असो, मला मुलगी नकोय ....


“ माधव ही अशी ऐकणार नाही, बंद कर तिला खोलीत...अक्कल ठिकाण्यावर येईल तिची..
 माधवरावांनी तिचा हात पकडला आणि तिला खोलीत डांबून ठेवलं...
 दोन दिवस तिला जेवायलाही दीलेले नव्हतं... 
 वैद्यला बोलावण्यात आलं, वैद्यांनी तिला औषध दिले आणि त्याच दिवशी तिचं बाळ गेलं...
 अहिल्या खूप रडली,  आठ दिवस तर ती त्याच घटनेत निपचित पडली होती....


 असेच महीनेे निघून गेले, तीन महिन्या नंतर अहिल्या ला पुन्हा दिवस गेले, यावेळी अहिल्या ने दोन महिने घरी काहीच सांगितले नव्हतं, पण येसूबाई ला अहिल्याचे गर्भवती होण्याचा कळलं....

त्या पुन्हा तिला वैद्य कडे घेऊन गेल्या, तपासणी केली आणि वैद्यांनी आता ही मुलगी आहे असं सांगितलं, अहिल्या सोबत आताही तेच सगळं होणार होत, पण अहिल्या नी मनाशी ठरवलेलं होत,  यावेळी मी अस काही होऊ देणार नाही...

 काहीही झालं तरी मी माझ्या बाळाला या जगात आणणार....


हा तिचा ठाम निश्चय होता....


क्रमशः

🎭 Series Post

View all