अहिल्या... संघर्ष मातृत्वाचा भाग 4

Ahilyachya navin jivanachi suruvat zali madhav ravanch ani ahilyach prem khulayala lagal

अहिल्या...संघर्ष मातृत्वाचा भाग 4


आधीच्या भागात,


अहिल्याचा मासिक पाळी सोहळा साजरा झाला,

सगळ्यांनी तीच खूप कौतुक केलं,,

येसूबाईंनी तिला सगळं समजावून सांगितलं..सहाव्या दिवशी सकाळी अहिल्यानी स्नान करून देवपूजा केली,सासूबाईंच्या खोलीत चहा घेऊन गेली ,येसूबाईला अहिल्याच्या चेहऱ्यावर तेज दिसत होत...

आता पुढे,


 अहिल्याच्या नवीन जीवनाची सुरवात झाली.

 माधवरावांच आणि अहिल्याच प्रेम खुलायला लागलं....

तिच्या शरीरात वेगवेगळे बदल व्हायला लागले,

वयात आल्यानंतर मुली सुंदर दिसायला लागतात तसच अहिल्याच्या बाबतीतही घडलं...

तीची शरीरयष्टी बदलली, तिच्या सुंदरतेत भर पडली, चेहरा सतेज झाला,  मनाची घालमेल वाढली..


आजूबाजूच्या बाया अहिल्याबद्दल थोडं तरी चांगल्या बोलल्या तरी येसूबाईला वाईट वाटायचं...कारण त्यावेळी यमुनाचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर यायचा ..

यमुना सोबत जे काही वाईट घडून गेले होते त्याचे घाव येसूबाईंच्या मनावर ठसलेले होते....

त्यांनी गरजेच्या वेळी अहिल्याला समजून घेतलं,तीच सगळं केलं देखील...पण अहिल्या बाबतीत त्यांच्या मनातली कटुता गेली नव्हती...

खरतर माणूस वाईट नसतो, परिस्थिती त्याला वाईट बनवते...

माणूस परिस्थत्ती नुसार चांगला किंवा वाईट विचार करतो...

येसूबाईंच्या ही बाबतीत तेच झालाय...

यमुने बद्दल ची कीव अहिल्याच्या बाबतीत राग निर्माण करते होती...


एकदा बाजूची बाई बोलता बोलता बोलून गेली, तुमच्या यमुनेपेक्षा अहिल्या छान दिसते हो....

येसूबाई जाम चिडल्या होत्या तिच्यावर...

खोलीत येऊन बसल्या...

आणि यमुनेच्या आठवणींच्या गावी गेल्या...

माधवरावा नंतर दहा वर्षांनी यमुनेचा जन्म झाला, माधवराव घरचा कुलदीपक होते, अंशाचा दिवा होता पण तरी घरात एक लक्ष्मी हवीच ह्या येसूबाईंच्या हट्टापायी खूप नवस बोलून झाले आणि त्यानंतर यमुना झाली... 


यमुना- गोरीपान,  गोडगोजिरी, चेहऱ्यावर तेज, टपोरे डोळे, नाक नक्षी अगदी सुंदर ...पाहताक्षणी कुणाला ही आवडेल अस तीच सौन्दर्य होत... 


एकदा संध्याकाळी बाहेर अंगणात खेळत असताना, तिथून शेजारच्या गावातील सावकाराचा मुलगा आणि त्याचे मित्र चालले होते, अचानक त्यांची नजर यमुना वर गेली, त्याने घरी जाताच त्याच्या वडिलांना सांगितलं,मला ही मुलगी आवडली..…

मुलाच्या वडीलांनी यमुना च्या बाबाकडे निरोप पाठवला, त्यावेळी यमुनाचे वय अकरा वर्ष होते, बोलणी झाली आणि लग्न पक्क झालं, दोन महिन्यात लग्न झालं.

सुरवातीचे काही वर्षे मजेत गेले, तिला कुठल्याच गोष्टीचा त्रास झाला नाही, वयाच्या पंधराव्या वर्षी  गर्भवती झाली...नऊ महिने सगळ्यांनी खूप लाड केले, खूप छान दिवस गेले....

नऊ महिने पाच दिवसानंतर यमुनाला मुलगी झाली, झालं इथेच सगळं बिनसलं...

पहिल्याच दिवशी सासू डोक्याला हात लावून बसली... आणि जोरजोरात ओरडायला लागली,

"आम्हाला वाटलं वंशाचा दिवा येईल या आशेने आम्ही हीच सगळं केलं आणि ही अवदसा मुलगी घेऊन आली ... आता काय करायच आम्ही?

ती आपल्या मुलाकडे बघत,


“ये लेका, काढ हिला घराच्या बाहेर ,  आपण दुसरं लग्न लावू तुझं,   आता या अवदासीला घरात ठेवायचं नाही,  हात धर आणि घरातून बाहेर काढ ... जातील दोघीही माय लेकी जिथे जायचं आहे तिथे....

मुलगा आईच्या शब्दाबाहेर नव्हता, त्याने लगेच तीच गाठोडं बांधलं, आणि दोघींना दरवाज्याच्या बाहेर हाकलून दिल...

एका दिवसाची गर्भवती बाई हम्म मुलगीच पोटच्या गोळ्याला छातीशी कवटाळून निघाली..


अंधारी रात्र, त्यात भर घालायला मुसळधार पाऊस...त्या कडकडणाऱ्या वीजा, कदाचित निसर्गाला पण यमुनेची साथ द्यायची नव्हती...

यमुना रपरप पाय टाकत रस्ता कापत होती, निसर्गसोबत आज काळानेही तिची साथ दिली नव्हती....रस्त्यावरून चालताना मागेहून येणाऱ्या चारचाकीने यमुनेला धडक दिली. यमुना दहा फुटावर जाऊन पडली आणि त्याच क्षणी तिच्या हातातल बाळ निसटल आणि खोल दरीत जाऊन कोसळलं...


यमुना जोरात  किंचाळली, आणि बेेशुद्धा वस्थेत गेली, 

    जेव्हा शुद्ध आली तेव्हा तिला तीच घर दिसलं, डोळ्यासमोर आई होती , तिनी आईला कवटाळल..काही क्षण रडली आणि जोरात तिला दूर लोटलं...


“आई माझं बाळ कुठे आहे?...


माझी लेक कुठे आहे?...


तू आली नाहीस ना तिकडे, बघ त्यांनी मला घराच्या बाहेर काढलं...


कुठे आहे ग ??माझी लेक कुठे आहे??


आईंनी तिला जवळ घेतलं आणि सांगितलं..


“यमुना, तुझी लेक नाही आहे आता या जगात...तुला सोडून गेली ती....


“ अशी कशी सोडून गेली? तू खोटं बोलतेस ना... तुला पण मुलगी नको होती...म्हणून तू पण खोटं बोलतेस... सांग सांग माझी गुडिया कुठे आहे? माझी परी कुठे आहे? सांग आई, सांग ना... कुठे आहे माझी गुडीया....


“ सांग ना ग आई... त्यांना माझी मुलगी नको होती म्हणून त्यांनी मला घराच्या बाहेर काढलं आणि आता तुला माझी मुलगी नको होती म्हणून तिला घरातून...  तिला मारून टाकलं.....


“ नाही यमुना, असं नाहीये ...काल गावातल्या माणसांनी तुला जेव्हा इकडे आणलं ना तेव्हा तिथे तू एकटीच पडून होतीस तुझी लेक नव्हती बाळा, त्यांनी सगळीकडे शोधलं पण ती कुठेच दिसली नाही... खरंच ग कुठेच दिसली नाही तुझी लेक.... सगळ्यांना वाटते की ती खोल दरीत पडली असावी....

“ नाही... नाही... तुम्ही सगळे खोटे बोलताय, हे सगळं खोटं आहे... तुम्हाला माझी मुलगी या जगात नको होती म्हणून सगळ्यांनी मिळून तिला मारलं... तुम्ही सगळ्यांनी मिळून मारलत माझ्या लेकीला.... असं म्हणत ती खूप रडली.
 देव्हाऱ्यासमोर समोर जाऊन बसली...


     कसा खेळ देवा तुझा
    दिलेलं हिरवून घेतलस
  तिच्यासवे मी जगले असते
पण जगण्याचं कारणच काढून घेतलस
     

यमुनेच्या मनावर परिणाम झाला... खूप दिवस पर्यंत ती कोणाशी बोलत नव्हती,  एकटीच राहायची...स्वतःशीच बळबळायची...


बाहुलीशी खेळायची, सकाळी उठून तिला अंघोळ घालायची, तिला केस पावडर करायची, चिऊचा घास काऊचा घास करत जेवू घालायची....


हळूहळू दिवस सरकत गेले ... यमुना थोडी रुळायला लागली...


पण वरवरून कुणी कितीही आनंदी दिसत असलं, तरी मनातली सल काही जात नाही... यमुना चेहऱ्यावर दाखवत नसली तरी मनात खोलवर जखम होतीच....

"आई...आई...यमुनाने आवाज दिला तेव्हा येसूबाई भूतकाळातून परत आल्या..


“काय ग अशी अंधारात का बसलीस?...


“येसूबाई नी तिला जवळ घेतलं, तिच्या माथ्यावर एक चुंबन घेतल आणि


“कुणी काहीही बोलोत...सुंदर तर माझी यमुना च आहे...


“काय झालं तुला...तुझ्या डोळ्यात पाणी...


“काही नाही ग बाळा..


येसूबाईंच्या ममतेचा पाझर फुटला....


क्रमशः


सदर कथेचा कुठल्याही घटनेशी काहीही संबंध नाही.. आढळल्यास योगायोग समजावा...

धन्यवाद

ऋतुजा वैरागडकर

🎭 Series Post

View all