अहिल्या... संघर्ष मातृत्वाचा भाग 31

Shariravarche kapde phatlele hote purn angavar nakhanche vran hote

अहिल्या संघर्ष मातृत्वाचा भाग 31


आधीच्या भागात आपण पाहिले की,


विठ्ठलच्या जीवनात दुःखाचे सावट आले, त्याच्या पत्नीचे अकस्मात निधन झाले.


प्रतापचं लग्न झालं, उषा त्याच्या जीवनात त्याची सहचारिणी बनून आली. उषा सगळ्या कामात हुशार होती. स्वयंपाक छान करायची. प्रतापच्या आईला खूप बरं वाटलं ,आता सून आली, आपली चिंता मिटली असे भाव तिच्या मनात यायला लागले.


आता पुढे,


अहिल्याने सकाळी प्रसन्न वातावरणात देवपूजा केली.

छोट्याश्या बाळाला हातात घेतलं. तिला आंघोळ घातली. नवे कपडे घालून दिले. विठ्ठलला आवाज दिला.


“पणत्याभाऊ इकडे ये.” अहिल्याने आवाज दिला.
“काय ग?” विठ्ठल मागेहून बोलला.


“बघ, किती गोड दिसत आहे.”अहिल्या
“हो ग,काळा टिका लाव तिला.” विठ्ठल हसून बोलला.
अहिल्याने तिला काळा टिका लावला.


तिला खाली चटईवर ठेवून तीचं औक्षण केलं.


“किती गोंडस दिसते ना,मला तर खूप लाड करावेसे वाटत आहे. आपण हीचं नावं गोजिरी ठेवूया. तुला कसं वाटतंय भाऊ.” अहिल्या एकदम उत्साहात बोलली.


“खूप छान, खरंच गोजिरी आहे ती.” विठ्ठल
अहिल्याने घरचं सगळं आवरलं. ती गोजिरीला घेऊन संस्थेत निघाली. घरी गायत्री, झाशी आणि विठ्ठल होते.


झाशी आता बऱ्यापैकी चालायला लागली होती. गायत्री अंगणवाडीत जायची. विठ्ठलने गायत्रीला अंगणवाडीत नेऊन सोडलं आणि तो  झाशीला सोबत घेऊन कामावर गेला.

अहिल्या तिच्या कामात रमली. लहान लहान मुलांसोबत तिचा वेळ खूप छान जायचा. दिवसभरात तिला गायत्री आणि झाशीची ही आठवण येत नसे. विठ्ठल आहे म्हणून ती निश्चिंत असायची.


विठ्ठलने झाशीला पाळण्यात टाकलं. तो त्याच्या कामात व्यस्त झाला. थोड्यावेळाने नाम्या आला आणि काही काम आहे असं सांगून विठ्ठलला  बाहेर घेऊन गेला.


विठ्ठल त्याच्यासोबत थोडा दूर गेला. इकडे झाशी पाळण्यात झोपली होती. कामावरच्या एका माणसाचं लक्ष गेलं.

त्याने आधी झाशीकडे बघितलं आणि मग आजूबाजूला नजर फिरवली. त्याला आजूबाजूला कोणीच आढळलं नाही. याच संधीचा फायदा घेत त्याने झाशीला पाळण्यातून बाहेर काढलं. दूर शेतात घेऊन गेला.

झाशी झोपेतून उठली आणि रडायला लागली. तिच्या आवाजाने तो माणूस घाबरला. हिच्या आवाजाने कुणाचतरी लक्ष आपल्याकडे जाईल या भीतीने त्याने झाशीचं तोंड कापडाने दाबलं. आणि तिला कडेवर घेत सपासप चालत राहिला, खुप दूर गेल्यावर सुनसान जागेवर त्याने तिला खाली ठेवलं. झाशी निपचित पडून होती, तिची काहीच हालचाल झाली नव्हती.

त्याने तिच्या नाकाजवळ बोट नेऊन श्वास सुरू आहे की नाही ते तपासलं. श्वास बंद आहे हे लक्षात आल्यावर तो थोडा घाबरला. थोडावेळ शांत उभा राहिला. नंतर त्याने अंगावरचे कपडे काढले. तिच्या निपचित शरीरावर तुटून पडला. शरीराची भूक संपेपर्यंत तिच्या शरिराला ओरबाडलं. उठून उभा झाला तोवर शरीरातून रक्ताच्या धारा लागल्या होत्या. तिला तिथे तसचं ठेऊन तो तिथून पळाला.


विठ्ठल नाम्यासोबत परत आला. त्याला झाशीची आठवण झाली. ती झोपली असेल या अविर्भावात तो तिच्या पाळण्याकडे गेला. पाळणा रिकामा बघून दचकला. तिथे काम करणाऱ्या माणसं-बायांना विचारलं.


“तुम्हाला झाशी दिसली का? झोपली होती पाळण्यात, पण आता नाही आहे तिथे. तिला पाळण्यातून उतरता येत नाही, कुणी तिला पाळण्यातून बाहेर काढलं का.?” विठ्ठल सगळ्यांना काकुळतेने विचारत होता.


सगळे नकारार्थी मान हलवत होते, सगळ्यांची कुजबुज सुरू झाली.
“कुठं गेली असेल इवलीशी पोरं? आपल्याला तर दिसलीच नाही.” त्यातली एक बाई बोलली.


“अरे एक मिनिटं, मला मगाशी सदया एका लहान मुलीला घेऊन जाताना दिसला.” त्यातल्याच एका माणसाने सांगितले.
“आपल्या कामावरचा माणूस सदानंद?.” विठ्ठलने पुन्हा विचारलं.


“हो हो तोच मला दिसला तिकडे शेताकडे  जाताना.” पुन्हा त्याने सांगितले.


विठ्ठलने ऐकताच शेताकडे धाव घेतली. पूर्ण परिसर पिंजून काढला पण झाशी दिसली नाही.


शेवटी परतीला निघाला तोच एक लहान मुलगा आला.
“विठ्ठलकाका विठ्ठलकाका .”
“काय रे बंटी.” विठ्ठल 
“काका काका तिकडे.” बंटीला बोलता बोलता दम लागला.
“अरे बोल की रे काय झालं?” विठ्ठलने त्रासून विचारलं.
“काका तिकडे झाशी.”


तो पुढे काही बोलणार तोच विठ्ठलने
“कुठे? कुठे दिसली तुला झाशी.? विठ्ठलने विचारलं.


“काका मी माझ्या शेतावर गिल्ली दांडू खेळत होतो ना तेव्हा मला तिकडे काही कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आला. मी थोडं जवळ जाऊन बघितलं तर एक लहानशी मुलगी दिसली. चेहरा ओळखायला नाही आला पण आता इथे तुम्हाला पाहिलं आणि थोडा विचारात पडलो ती झाशी तर नसेल ना?.”  बंटी पटापट सगळं बोलून गेला.


विठ्ठलने त्या दिशेने धाव घेतली. तो त्या स्थळी पोहोचला. एक मिनिटं गुडघे टेकून उभा राहीला. त्याने एक श्वास टाकला. वर बघितलं त्याला दोन कुत्रे दिसली. त्याने त्या कुत्र्यांना हाकललं. एक नजर बघितलं तर ती झाशी होती. रक्ताच्या थारोळ्यात ती निपचित पडून होती.

शरीरावरचे कपडे फाटलेले होते. पूर्ण अंगावर नखांचे व्रण होते. शरीर लाल हिरवं झालं होतं. 


विठ्ठलने तिला पटकन उचललं. छातीशी कवटाळलं आणि ढसाढसा रडायला लागला.


त्याने अहिल्याकडे धाव घेतली. तिच्या संस्थेत गेला.
“अहिल्या अहिल्या.” विठ्ठल रडत रडत हाक मारली.
विठ्ठलचा आवाज ऐकून अहिल्या बाहेर आली. आल्या आल्या तीच लक्ष विठ्ठलच्या खांद्याकडे गेलं.


“पणत्याभाऊ हे काय आहे?” कोण आहे ही?” अहिल्या
“आपली झाशी.” विठ्ठलने रडतच सांगितलं.


अहिल्याने झाशी ऐकताच तिला धक्का बसला ती तशीच खाली पडली. ती सुन्न झाली होती. मागेहून संजय आला त्याने विठ्ठलच्या खांद्यावरून झाशीला घेतलं आणि खाली ठेवलं.
तिचा चेहरा बघताच अहिल्याने हंबरडा फोडला.


“काय झालं माझ्या लेकीला? बोल पणत्याभाऊ काय झालं माझ्या लेकीला? तू तिला सोबत घेऊन गेला होतास ना? मग तुझं लक्ष कुठे होतं? कुणी केलं हे सगळं? का नाही सांभाळलंस माझ्या लेकीला?”


अहिल्या विठ्ठलच्या छातीला ठोकून त्याला विचारत होती. विठ्ठल निशब्द उभा होता. त्याच्याकडे कुठल्याच प्रश्नांची उत्तरं नव्हती. त्याने अहिल्याला दूर लोटलं आणि  सुसाट धावत गेला. त्याने सदानंदचं घर गाठलं. दुर्देवाने त्याच्याशी गाठ पडली नाही. घरात त्याची पत्नी होती.


“सदानंद कुठे आहे?” विठ्ठलने त्याच्या पत्नीला विचारलं.
“तो आज घरला आलाच नाही. कुठे दारू ढोसत बसला आहे कुणास ठाऊक?”  सदानंदच्या पत्नीने सांगितले.
विठ्ठल रागात तिथून बाहेर पडला.


त्याचे डोळे लालबुंद झाले होते. हात रवरव करत होते. आता सदानंद समोर आला तर त्याच्या जीवाचं काही खरं नाही असंच त्याच्या दिसण्यावरून वाटतं होतं. विठ्ठल पुन्हा संस्थेत गेला. अहिल्या तशीच बसून होती.

त्याने झाशीला उचललं आणि चालायला लागला. तशीच अहिल्या उठली.
“कुठे  घेऊन  चाललास माझ्या लेकीला? सोड तिला.”
अहिल्याने झाशीला घेतलं आणि छातीशी कवटाळलं आणि ढसाढसा रडायला लागली.


क्रमशः

🎭 Series Post

View all