Jan 29, 2022
कथामालिका

अहिल्या... संघर्ष मातृत्वाचा भाग 27

Read Later
अहिल्या... संघर्ष मातृत्वाचा भाग 27

अहिल्या... संघर्ष मातृत्वाचा भाग 27


 आधीच्या भागात आपण पाहिले की,


 मालतीची सासू आणि नवरा तिचा खूप छळ करायचे मालतीच्या सासूने तिला दोन दिवस जेवायला दिलेलं नव्हतं. तिला खोलीत डांबून ठेवलं होतं आणि त्याचाच परिणाम की  काय मालती बेशुद्ध झाली.

तिचा नवरा तिला वैद्याकडे घेऊन गेला, त्यांनी सांगितलं मालतीच्या पोटात अन्नाचा एकही कण नाहीये त्यामुळे ती अशक्त झाली आहे,मालतीला आरामाची गरज आहे. प्रकाशला वाईट वाटलं, तो मालती जवळ गेला आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागला.


 आता पुढे,


मालती शुद्धीवर आली तेव्हा तिने बाजूला प्रकाशला बसलेलं बघितलं. तिला थोडं आश्चर्य वाटलं प्रकाश बसल्या बसल्या झोपला होता.त्याचा डोळा लागला होता कदाचित तो रात्रभर माझ्या जवळ बसला असावा असा विचार तिच्या डोक्यात आला.


 मालती हळूच उठून बसली आणि प्रकाशचं डोकं स्वतःच्या मांडीवर घेतलं. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, प्रकाशला जाग आली तो उठून बसला.
“मालती कशी आहेस?”


“मी बरी आहे.तुम्ही रात्रभर असेच बसून होतात का?” 
“हो ग.”


“मी बरी आहे आता, तुम्ही जा घरी आराम करा.”


“नाही नाही, आता तुला घेतल्याशिवाय मी जाणार नाही, वैद्याने रात्रभर इथेच थांबायला सांगितलं होतं, ते सकाळी पुन्हा तुझी पाहणी करणार आहेत आणि मग सांगतील तुला घरी न्यायचं की नाही. तू बस मी तुला काही खायला घेऊन येतो.”
“कशाला? आता आपण घरी जाऊ.”


“हे बघ,तू इथेच पडून रहा.मी घरी जातो आईला सगळं सांगतो आणि आपल्यासाठी काहीतरी घेऊन येतो.”


 प्रकाश घरी गेला त्याने आईला सगळं सांगितलं. आपल्या मुलाच्या मनात सुनेबद्दल काळजी बघून मालतीची सासु आणखीनच चिडली.


“काय रे, आज तुला तिचा खूप पूळका आलाय, तिच्याबद्दल इतकी आपुलकी का दाखवतोयस?”


“असं काही नाही आहे, ती बेशुद्ध झाली होती म्हणून तिला वैद्याकडे नेलं होतं. वैद्यांनी सांगितले की मालतीने काहीही खाल्लेल नव्हतं, तिच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता म्हणून ती अशक्त झाली. तिला आरामाची गरज आहे.


“वा वा वैद्यानी सांगितले आणि तू विश्वास ठेवलास. ती एक नंबरची नाटकी बाई आहे कामाचा कंटाळा आला म्हणून असं नाटक केलं असेल, मेली कुठली.”


“आई ती कामचोर नाही आहे हे  तुलाही माहिती आहे, अगं खरंच तिला अशक्तपणा आला आहे, तिच्या चेहऱ्यावरून दिसतंय ते, आई तू काय बनवलं आहे आज जेवायला?” बनवलं असेल तर डब्यात बांधून दे, मालतीसाठी घेऊन जातो.”
“मालतीसाठी? काही गरज नाही आहे, तुला पुडका आलाय ना तिचा मग तूच बनव आणि घेऊन जा, मी काहीही बनवून देणार नाहीये.”


 असं म्हणत ती निघून गेली.
 प्रकाशने खिचडी बनवली आणि घेऊन गेला, वैद्याकडे पोहोचल्यानंतर 
“मालती उठ, मी जेवण घेऊन आलोय.”
 त्यानी गरम गरम खिचडी डब्यातून प्लेट मध्ये काढली, आणि चमच्याने मालतीसमोर एक घास नेला.


“हे खा.”
मालतीचे डोळे भरून आले.
“काय झालं मालती?”
“काही नाही.”
 मालतीने एक घास खाल्ला, तिचं लक्ष प्रकाशच्या हाताकडे गेलं.


“अहो हे काय झालं तुमच्या हाताला? कसं भाजल?”
“काही नाही, तू खा आरामात.”
मालतीच्या सगळ लक्षात आलं, प्रकाशची आई कशी आहे तिला माहिती होतं, तिने प्रकाशचा हात हातात घेतला त्यावर चुंबन केलं आणि म्हणाली 


“ही खिचडी तुम्ही बनवली ना माझ्यासाठी?”
 प्रकाशने होकारार्थी मान हलवली आणि म्हणाला
“मला माफ कर मालती, मी तुला कधी समजून घेतलं नाही. आई जसं म्हणत गेली तसच मी करत गेलो. खरंच मला माफ कर मी तुला खूप दुःख दिलं, खूप यातना दिल्या. तुझा शारीरिक आणि मानसिक छळ केला पण आता माझ्याकडून तुला कुठलाही त्रास होणार नाही खरंच मला माफ कर.”
“मालतीने रडायला सुरुवात केली ती खूप  भावुक झाली, रडता रडता अचानक थांबली.


“अहो पण आई? त्यांना तर मी नाही आवडत ना, त्या माझ्याशी नीट वागतील.?”
“तू आईची चिंता करू नकोस मी समजावेन तिला, चल मी वैद्याशी बोलून घेतो, आता आपल्याला घरी जायचं आहे, तू आवरून घे.”


मालती तयार झाली, दोघेही घरी गेले. प्रकाशने मालतीला कुठल्याही कामाला हात लावू दिला नाही पण मालतीची सासू तिचे टोमणे सुरु होते, तिचं टोचून बोलणं सुरू होतं. दोन-तीन दिवसात मालतीला बरं वाटलं आणि तिने प्रकाशकडे अहिल्याला भेटण्यासाठी हट्ट केला.


 प्रकाश आणि मालती दोघे अहिल्याकडे गेले. अहिल्या समोरच्या अंगणात बसली होती. तिला मालती आणि प्रकाश येताना दिसले. तिला मालतीला बघून खूप आनंद झाला पण बरोबरीने प्रकाशला बघून राग आला.


मालतीला बघून अहिल्याची काळजी वाढली तिने पटापट प्रश्न विचारायला सुरुवात केली.

“मालती तू बरी आहेस ना? असं काय झालं की तू अचानक इकडे आलीस? तुला घरी कुठला त्रास तर झाला नाही ना?कोणी तुला त्रास दिला सांग मला सासूने काही केले का? कशी आहेस तू?”


“ताई ताई थांबा, मी बरी आहे. खरच मी बरी आहे."
 अहिल्याने प्रकाशकडे बघितलं तिला राग राग आला.
“हा माणूस इथे का आला? तू याला इथे का घेऊन आलीस मालती?”


काही मिनिटात विठ्ठल आला.
“एक मिनिट अहिल्या, तिच्या चेहऱ्याकडे बघ ती अशक्त वाटते आधी तिला बसायला तर सांग नंतर तुला काय बोलायचे ते बोल.”
 मालती आणि प्रकाश दोघे अंगणातील बाकावर बसले, मालतीने घडलेला सगळा प्रकार अहिल्याला सांगितला.
“प्रकाश बदलला हे ऐकून बरं वाटलं.”


 पण मालतीच्या सासूचा जाच कमी झाला नव्हता हे ऐकून अहिल्याला राग आला.


आपण यातून काहीतरी मार्ग काढू असे आश्वासन दिल्याने मालतीला बरे वाटले.प्रकाशने अहिल्याला माफी मागितली त्याने अहिल्यासोबत जे कृत्य केलं त्याच्या बद्दल त्याला लाज वाटत होती.


अहिल्यासमोर हात जोडून माफी मागितली आणि "पुन्हा अस होणार नाही ."असा अहिल्याला शब्द दिला.
अहिल्याला बरं वाटलं.


 दोघेही निघून गेले, अहिल्या मात्र विचार करत राहिली. प्रकाश खरच सुधारला असेल की त्याची काही चाल आहे? मालतीच्या सासुचा त्रास बंद झालेला नाही, प्रकाश नाटक तर करत नसेल ना?आईचं आणि  मुलांचं काहीतरी षडयंत्र तर नसेल ना? असे एक ना अनेक प्रश्न अहिल्याच्या मनात वादळासारखी येऊन गेलेत.


 ती हे सगळं विठ्ठल जवळ बोलली.


“पणत्याभाऊ खरच प्रकाश बदलला असेल का रे? इतक्या लवकर माणूस कसा बदलू शकतो? जो व्यक्ती माझ्याशी इतक्या घाणेरड्या वृत्तीने वागला,ज्याने  इतके घाणेरडे कृत्य केले तो व्यक्ती इतक्या सहजपणे कसा बदलू शकतो? मालतीशी प्रेमाने वागून हा तिचा गैरफायदा तर घेणार नाही ना?”

“अहिल्या शांत हो, इतका विचार करु नकोस.”


“मला आता मालतीची आणखीनच काळजी वाटायला लागली.”
“तू काळजी करू नकोस, होईल सगळं नीट. आपण लक्ष ठेऊ प्रकाशवर.”


“असं कसं लक्ष ठेवणार रोज रोज? कोण जाणार तिथे लक्ष ठेवायला?रोज रोज मालतीशी संपर्क नाही करू शकत आपण. आपल्याला कस कळणार सगळं ठीक आहे की नाही, आता दोन दिवसात बघ ना काय काय घडलं, ती उपाशी होती पण आपल्याला कळलं का? नाही कळलं ना.”


विठ्ठलने अहिल्याला शांत करत आत नेलं, अहिल्याच्या मनात वादळ सुरूच होती.


 क्रमश:

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

ऋतुजा अतुल वैरागडकर

Working woman

I m working woman... i have 2 baby.. I m learning... i like reading and writing