Jan 29, 2022
कथामालिका

अहिल्या.. संघर्ष मातृत्वाचा भाग 23

Read Later
अहिल्या.. संघर्ष मातृत्वाचा भाग 23

अहिल्या...संघर्ष मातृत्वाचा


भाग 23


आधीच्या भागात आपण पाहिले की, 


अहिल्याची मुलाखत  बघून अहिल्याकडे एक तिशीतली बाई आली, शरीराने थकलेली वाटतं होती, अहिल्यानी तिला बसवलं, पाणी दिल आणि विचारपूस करायला  लागली...आधी ती काहीच बोलली नाही...अहिल्या तिच्या बाजूला बसली, तिला धीर दिला, तिला विश्वासात घेतलं...तेव्हा ती ढसाढसा रडायला लागली....


आता पुढे,

“माझे नाव मालती आहे, सहा वर्षांपूर्वी मी बेरोडी या गावी लग्न होऊन आले, इथेच अर्धा-एक तासाच्या अंतरावर आहे....

लग्नानंतरचे काही महिने खूप आनंदात गेले, नवलाईचे नऊ दिवस संपले आणि घरच्यांनी दबाव टाकायला सुरुवात केली..लग्नाला दोन महिने होत नाही तर त्यांना घरात पाळणा हलवायचा होता.. आम्हाला नातू हवाय..गोड बातमी कधी येणार हे अस सासूबाई रोज मला विचारायच्या माझ्या नवऱ्याला कधीच काही बोलायच्या नाही मला मात्र टोचू टोचू बोलायच्या....


एकदा मला राग आला आणि मी पण उलट बोलले...


“आई तुम्ही फक्त मलाच बोलताय, तुमच्या मुलाला पण बोला काहीतरी, टाळी एका हाताने नाही वाजत.....”


“माझा मुलगा...लाच वाटतं नाही तुला अस बोलताना.. अग माझा मुलगा असला तरी नवरा आहे तो तुझा....”


“हो ना मग आमच्यावर सोडा ना सगळं..आम्ही बघू काय करायचं ते..”
त्यांनतर काही दिवस गप्प राहिली ..


लग्नाला सहा महिने झाले.तरी मला दिवस गेले नाहीत..आता आजूबाजूचे पण बोलायला लागले...


शेजारी पाणी भरायला गेले तिथे बायांची कुजबुज सुरू झाली...


काय ही बाई एवढे महिने झाले तरी ह्यांच्या घरी पाळणा हलला नाही पण हिला काहीच वाटतं नसावं...


हो तिच्या चेहऱ्यावरूनच वाटतं
वांझोटी आहे की काय..
अश्या अनेक प्रकाराने ते मला बोलत असत...
एकदा मी माझ्या नवऱ्याजवळ बोलले..


“अहो शेजारच्या बाया नको नको ते बोलतात..तुम्ही काहीतरी विचार करा ना, मला आता सहन होत नाही, आधी आई बोलायच्या आणि आता या बाया...”

“मग मी काय करु?..”


“अहो तुम्ही त्यांना बोला ना..”


“किती जनांची तोंड बंद करणार आहेस तू..”
“अहो मग आपण वैद्य कडे जाऊया,तपासून घेऊया..बघूया काय म्हणतात ते..”


“तुला जायचं असेल तर जा...मी येत नाही...
सासुच पुन्हा बोलणं सुरू झालं, नवरा काहीच ऐकायचा नाही..
मला सगळं नकोस वाटतं होतं..,पण उपाय काहीच नाही म्हणून चुपचाप सगळं सहन करत होते...


बघता बघता दोन वर्षे झाली..आता तर  शेजारच्या बाया वांझोटी शिवाय बोलायच्या नाहीत... 


खुप प्रयत्नानंतर मला दिवस गेले... आता वाटलं सुखाचे दिवस येतील पण त्यातही आम्हाला नातूच हवाय असा हट्ट सासूबाईंचा होता.. माझ्या हातात काय होत सांगा ना... माझ्या पोटात जर मुलगी असेल तर मी यांना मुलगा कुठून देऊ....


हट्ट करून मला वैद्य कडे नेले, तपासणी केली आणि माझ्या पोटात मुलगी आहे हे त्यांना कळले तेव्हा त्यांनी माझा गर्भपात करून घेतला व त्यांनी सांगितलं होतं आता जर गर्भपात केला तर मी कधीच गर्भवती राहू शकणार नाही आणि ते खरंच झाला त्यानंतर मला कधीच गर्भ राहिला नाही...


 गेली चार वर्षे मी सगळं भोगत आहे.. रोज घरच्यांचे बोलणे, शेजारच्यांचे बोलणे सगळं ऐकावं लागतंय...बर यांच्याशी काही मनातलं बोलाव तर त्यांना कळत नाही, ते त्याच्याच धुंदीत असतात.. माझ्याकडून बोलणारं असं कोणीच नाही.. आपल्या मनातला जर कोणाला सांगायचं तर तसा जवळचा माणूस कोणीच नाही...


 घरचे बोलतात तर बोलतात पण आता शेजारचे पण बोलायला लागलेत...


पाणी भरायला गेले की सगळ्या बाया बाजूला होतात आणि बोलतात ही बघा वांझोटी आली...


“मी वांझोटी नाही आहे,मलाही वाटत मी आई व्हावं, माझ्या कुशीत माझं बाळ झोपावं.... पण यांच्या चुकीची शिक्षा मी भोगत आहे, पण यांना काहीच नाही, ते दुसऱ्या लग्नाच्या तयारीला लागलेत..आता तुम्हीच सांगा मी काय करू, कसा न्याय मिळवून देऊ स्वतःला...


“हे बघ मालती तू काळजी करू नकोस, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी...”


आता तुला काय करायचं आहे?...


“म्हणजे?...


“तुला तिथेच राहायचं आहे की वेगळं राहायचं आहे...हे बघ मालती बाळ नाही...किंवा आपल्याला मुलं नाही ह्या विचारातून बाहेर निघायचं आहे, आपण एखादं अनाथ बाळाला आणून त्याच ही पालन पोषण करू शकतो, यानी काय होईल, तुला बाळ मिळेल आणि एका अनाथ मुलाला आई मिळेल, त्यालाही आईच प्रेम मिळेल..”

 

“तुमचं सगळं बरोबर आहे पण  माझ्या घरचे या गोष्टीला कधीच तयार होणार नाहीत...”


“मालती तुझी काही हरकत नसेल तर मी बोलू तुझ्या घरच्यांशी..”


“नाही..नाही...ती लोक चांगली नाहीत उगाच तुमच्या जीवाचं बर वाईट झालं तर...”


मालतीचा अचानक श्वास वाढायला लागला.. अहिल्यानी तिला लेटवल, तिचे हात पाय चोळले काहीच फायदा झाला नाही, विठ्ठलनी वैद्यला बोलावून आणलं..


वैद्यने चेक केलं आणि सांगितलं


“मालती खूप अशक्त झाली आहे, तिला आरामाची गरज आहे, तिला दमाचा त्रास पण आहे, रक्त कमी, झालय... ह्यांची काळजी घेणं खुप गरजेचं आहे, ह्यांच्या घरच्यांना सांगा काळजी घ्यायला...”
“हो..हो..आम्ही कळवू त्यांना.. धन्यवाद

 

थोडया वेळाने मालतीला जाग आली ती ताडकन उठली आणि जायला निघाली.


“मालती अग सावकाश..कुठे निघालीस?...”


“मला जाऊ द्या..घरी सगळे वाट बघत असतील, मी दिसले नाही ना तर गोंधळ करतील...”
“नाही..नाही तू जायचं नाही...”
“जाऊ द्या,मी हात जोडते..”
“वैद्यनी तुला आराम करायला सांगितलंय”...
“मी बरी आहे..”


“ठीक आहे तुला जायचं आहे ना मग तू एकटी नाही जायचं आम्ही पण येणार तुझ्यासोबत...”


चल पणत्या भाऊ..
तिघेही मालतीच्या घरी जायला निघाले...


अर्धा-एक तासात पाहोचले...
दारावरची कळी वाजवली..


दार एका बाईने उघडला..


समोर मालतीला बघून ती खूप चिडली


“कलमूहिनी...कुठे गेली होतीस किती वेळची तुला शोधतीय...कुठं तोंड काळ करायला गेली होतीस...”


अस म्हणून तिच्यावर हात उगारला पण मधात अहिल्या आली तिनी त्या बाईचा हात पकडला....


क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

ऋतुजा अतुल वैरागडकर

Working woman

I m working woman... i have 2 baby.. I m learning... i like reading and writing