
अहिल्या... संघर्ष मातृत्वाचा भाग 19
आधीच्या भागात आपण पाहिले की,
पाटणगाव वरून परतताना अहिल्या आणि विठ्ठलची गाठ माधवरावांशी पडली... माधवरावानी अहिल्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण अहिल्या नाही बोलली आणि तिनी त्यांना धुडकावला ...
विठ्ठलनी अहिल्याला प्रताप सोबत पाठवून तो माधवरावांना चोप द्यायला गेला, त्यानी माधवरावला सांगितलं, माझ्या बहिणीच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही, तिच्या आयुष्यात आता परत यायचं नाही...
आता पुढे,
प्रतापनी त्याच्या आईला अहिल्याबद्दल सांगितलं...
“आई आता मी तुला तिच्या बद्दल सगळं सांगितल...आता तुझं मत काय आहे ते सांग, मला तिच्याशी लग्न करायचं...पोरगी चांगली आहे... तिच्या आयुष्यात जे काही घडलं त्यात तिची चूक नाही.. सांग आई काय करायचं ...
मला लगीन करायचं तिच्याशी पण तूझ बी मत महत्त्वाचा आहे म्हणून तुला विचारतोय....
“ अरे पण बाळा.. तिची... त्या दोन दोन पोरी...आई बोलता बोलता थांबली
“ नाही नाही, त्या तिच्या मुली नाहीयेत ...
दत्तक घेतलेल्या आहेत, त्यातली एक मुलगी विठ्ठलला देणार आहे... म्हणजे सगळे एकत्रच राहतात...
“ अरे पण लग्न झाल्यावर तिने त्या मुलीला आपल्याकडे आणलं तर..
“ तर काय?.. आणू दे की .. काय फरक पडतो.. दोन वर्षाची पोर ती, तिच्या जिवाला काय लागतय... येऊ दे की.. आई तयार हो ना.. अग खूप चांगली मुलगी आहे,इतक्या कमी वयात तिने नाव कमावले इतकी चांगली काम करते अजून काय हवं ...
“काही दिवस थांब, आपण विचार करू....
काही दिवस प्रतापने अहिल्याशी काही बोलणं झालं नाही.. प्रतापच्या आईने अहिल्याची कामगिरी आणि तिचा स्वभाव बघून लग्नाला होकार दिला...
“ प्रताप जा सांग तिला...
प्रताप खूप खुश झाला.. धावत धावत अहिल्याकडे गेला...
“ अहिल्या अहिल्या ....
विठ्ठल बाहेर आला..
“ काय र प्रताप, सकाळी सकाळी काय काम काढले आहे....
“अहिल्या कुठं आहे, तिला बोलव ना..
“ अहिल्या.. ये अहिल्ये... प्रताप आलाय....आज अहिल्या कडे काय काम आहे...
“कळेलच..पण आधी तिला सांगतो...
अहिल्या बाहेर आली...
“काय रे प्रताप...काय झालं, सकाळी सकाळी आलास...
“मला थोडं बोलायचं आहे..
“मग बोल की...
प्रताप विठ्ठलकडे बघून..
“थोडं बाजूला येतेस...
“प्रताप बोल, ह्याच्यासमोर बोललास तरी काही फरक पडणार नाही...
“अग पण..
“बोल रे...
“अहिल्या मी तुला बोललो होतो ना, की मला तू आवडतेस..तेव्हा तू बोलली होतीस आधी आईला सांग तीच काय म्हणणं आहे ते जाणून घे..आज तेच सांगायला आलोय...आईनी होकार दिलाय.. अहिल्या आपल्या लग्नाला आईनी होकार दिलाय...मी माझ्या मनातलं बोललो आता तू सांग..तुझं काय मत आहे...
अहिल्या बोलायच्या आधीच विठ्ठल बोलला..
“प्रताप तू खर बोलतोस...
“होय, मी माझ्या मनातल्या भावना तिला सांगितल्या होत्या..
विठ्ठलला खूप आनंद झाला...तो उडया मारायला लागला...पण अहिल्या स्तब्ध झाली...आणि खाली बसली...
तिला कळेना काय बोलाव...
विठ्ठल तिच्या जवळ बसला..
“काय झालं अहिल्ये..अशी स्तब्ध का बसलीस...अग प्रताप चांगला मुलगा आहे...तुला आनंदात ठेवेल...
“माधवराव पण चांगलेच होते, पण काय झालं?....
“तू याची तुलना त्याच्याशी करू नकोस...
“पण पणत्या भाऊ ...समोरच्यावर मी विश्वास तरी कसा ठेऊ... तू सांग ना...
“जस मला भाऊ मानलस आणि विश्वास ठेवलास ना तसच...
“तुझी गोष्ट वेगळी आहे रे...
“का, मी पण तर तुझ्यासाठी नवीन होतो ना..पण आज बघ घट्ट बहीण भाऊ आहोत..हो ना..
“पण माझी गौराई...तीच काय...
प्रताप सगळं ऐकत होता, तो पटकन बोलला..
“अहिल्या तू गौराईची चिंता करू नकोस, ती आपल्यासोबत येईल, मी आईशी बोललोय तस..तिला काहीच अडचण नाही...
“आता अडचण नाही असं सांगितलंय...आणि समोर जाऊन त्या बदलल्या तर..नाही नाही...मी तिला सोडणार नाही....मी माझ्या लेकीला सोडणार नाही ..
प्रताप आणि विठ्ठलनी अहिल्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती..
“प्रताप तू जा आता, मी नंतर बोलतो तिच्याशी...
तिच्यासाठी हे थोडं कठीण आहे, पण सावरेल ती यातून...एकदम कुणावर विश्वास ठेवण तिला जड जातंय, पण तू काळजी करू नकोस...मी बोलतो तिच्याशी... गौराई आणि झाशी तिच्या जीव की प्राण आहेत..त्यांना सोडून राहणं तिच्यासाठी खूप अवघड आहे..
तू पुन्हा एकदा तुझ्या आईशी बोल, पुन्हा एकदा सगळी परिस्थिती समजावून सांग...तू जा आता...
प्रताप निघून गेला..विठ्ठलही त्याच्या कामावर निघून गेला...
पण अहिल्या मात्र तिथे तशीच बसून होती...
जुन्या आठवणी ओरबाडत होती...
सुखल्या जखमांना ओल देत पुन्हा त्या त्रासाला अनुभवत होती....
क्रमशः