Jan 29, 2022
कथामालिका

अहिल्या... संघर्ष मातृत्वाचा भाग 22

Read Later
अहिल्या... संघर्ष मातृत्वाचा भाग 22

आधीच्या भागात आपण पाहिले की

अहिल्याची मुलाखत घ्यायला काही पत्रकार आले होते, त्यांनी अहिल्याला काही प्रश्न विचारले, अहिल्यानी पण छान पध्दतीने उत्तर दिली...


आता पुढे,


आता शेवटचा  प्रश्न 


“तुम्हाला समोर समाजासाठी काय काय करायचे आहे?.”


“खूप काही करायचं आहे, जिथे जिथे माझी गरज भासेल तिथे तिथे ही अहिल्या खंबीरपणे उभी असेल...माझ्याने शक्य तेवढं करील मी या समाजासाठी,अनाथ मुलांसाठी किंवा इतर कुठेही गरज पडली तर मी ते नक्की करील...”


“आता एकच शेवटचा प्रश्न..”


“अहो पण..


“एकच शेवटचा प्रश्न..”


“ठीक आहे..”


“तुमचं वय इतकं लहान आहे, तुमचा एकदा विवाह झालेला आहे, दुर्दैवाने तो संसार तुमचा टिकू शकला नाही तर भविष्यात लग्नाचा विचार होईल,  पुनर्विवाह बद्दल तुमचं काय मत आहे?..”


अहिल्यानी प्रश्न ऐकून स्मितहास्य केलं..आणि बोलायला लागली


“तुमच्या एकाच प्रश्नात दोन प्रश्न आलीत...तुमचा पहिला प्रश्न माझं लग्न...

 

खरतर आता मला लग्नाच्या बेडीत अडकायच नाही आहे..मला माझं आयुष्य समाजकार्यात घालवायचं आहे, समाजासाठी झटायचं आहे….तर माझा आता किंवा भविष्यातही लग्न करण्याचा विचार नसेल.. 


आता तुमचा त्यातलाच दुसरा प्रश्न पुनर्विवाह बद्दल माझं मत..
तर माझं मत अस आहे की, कुणाचाही संसार अर्ध्यावरती मोडू नये, पण दुर्दैवाने तस जर घडलं तर त्या स्त्रीने पुनर्विवाह का करू नये, तिनी पुनर्विवाह करावा,स्वतःच आयुष्य सावरायचा तिलाही अधिकार आहे, तिनी का विधवेसारखं जगावं, तिलाही नटण्याचा अधिकार आहे, तिलाही जगण्याचा अधिकार आहे......

 

आई वडिलांनी, सासरच्यांनी पुढाकार घेऊन हा सोहळा पार पाडावा...लोकं काय म्हणतील, समाज काय म्हणेल याचा विचार करू नये, आपल्यासाठी समाज आहे, समाजासाठी आपण नाही... आपल्यामुळे समाज तयार झालाय..प्रत्येक वेळी समाजाचा विचार करत बसलो तर आयुष्य जगताच येणार नाही.”


अहिल्याची बोलणं कापत तिथला एक बोलला..


“म्हणजे आपण समाजाविरुद्ध वागायचं?..”


“नाही, मुळीच नाही... समाजाविरुद्ध वागायचं हा मुद्दाच नाही आहे, समाजाचा विचार करून, समाजाला सोबत घेऊनच आपल्याला चालायचं असत...पण प्रत्येक वेळी समाजाचा विचार केला तर काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात...

चूक काय...बरोबर काय..हा विचार करण्यापेक्षा ज्या व्यक्ती साठी आपण लढतोय त्या व्यक्तीचा मनाचा विचार करावा, तिला काय वाटतं, ती समोरच्या वाटचालीसाठी तयार आहे का, असेल तर आपण तिला मदत करायला हवी..

 

पुनर्विवाह हा खूप नाजूक विषय आहे, तरी तो सगळ्यांनी खुप विचारपूर्वक हाताळावा एवढंच मला म्हणायचं आहे..

 


“मॅडम..मॅडम तुम्ही स्त्रियांना काय संदेश दयाल?...”


“मी शेवटी स्त्रियांना हेच सांगेल की अन्याय सहन करू नका..अन्यायाविरुद्ध लढा....


“म्हणजे घरच्यांशी लढा?.”


“ नाही, घरच्यांशी लढा अस नाही, नवरा मारहाण करतोय म्हणून नवऱ्याशी लढा अस मी म्हणत नाही आहे, पण तुम्ही त्याला समजावून सांगा तिची चूक नसताना त्याला मारहाण करण्याचा अधिकार नाही आहे.. आणि तिनी उगाच का सहन करत बसायचं... त्याला समजवून त्याच्या कलेण घ्या , काय चूक..काय बरोबर हे त्यालाही कळू द्या..


अहिल्या हात जोडून 


नमस्कार.. मी यापुढे काहीही बोलू शकणार नाही..आणि मी आता जे काही बोललीय, ते फक्त माझं मत आहे यातून मला कुणाला दुखवण्याचा हेतू नव्हता..


धन्यवाद..


अस बोलून अहिल्या उठून आत गेली..


का कुणास ठाऊक  पण आत जाऊन अहिल्या खुप रडली...
मनात खूप काही दडलेलं बाहेर निघत होत... 


हुंदके देऊन..रडून रडून अहिल्यानी अश्रूंना वार मोकळी करून दिली...


रडण्याच थांबलं जेव्हा कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला..
तिनी पदरानी अश्रू पुसले आणि पलटली ,मागे प्रताप उभा होता...


“का वागतेस अस?..”


“काय झालंय?...”


“मनात इतकं सगळं दडवून ठेवलयस... आणि तरी देखील चेहऱ्यावर नेहमी प्रसन्नता असते...”


“कसं आहे ना प्रताप, प्रत्येकाला आपलं दुःख मोठं वाटत, आपण सर्वात जास्त दुःखी आहोत असं वाटतं..पण बाहेरच्या जगात जातो जग बघतो, तिथली माणसं त्यांचं आयुष्य बघतो, त्यांची परिस्थिती, त्याच दुःख कळतं तेव्हा जाणीव होते की यांच्या दुःखासमोर आपलं दुःख काहीच नाही आहे, आपण उगाच आपल्या दुःखाला कुरवाळत बसतोय...”
 
प्रतापला काय बोलाव कळेना तो निशब्द तिथून निघून गेला... 
अहिल्या सावरली, आपल्या पिल्लांना कुशीत घेऊन रात्रभर तशीच बसून राहिली... दुसऱ्या दिवशी जाग आली ती विठ्ठलच्या ओरडण्याने..


“अहिल्ये उठ..उठ लवकर...”


“काय झालं एवढं ओरडायला?..”


“अग  ते ऐक, तुझी कालची मुलाखत आलीय... प्रताप सांगत होता वृत्तपत्रात आणि दूरदर्शनवर पण दाखवत आहेत, अहिल्ये आपल्याकडे यातलं काहीच नाही ग, नाहीतर आपल्याला पण बघता आलं असत...”


“ चेहरा का हिरमुसतोस.. एवढं काही नाही आहे...चेहरा लहान करू नकोस माझ्या सोबत संस्थेत चल, तिथे तुला पाहायला मिळेल..


दोघेही संस्थेत गेले तिथे अहिल्या वर कौतुकाचा वर्षाव झाला, सगळ्यांनी खूप कौतुक केलं, पण अहिल्या हुरडून जाणाऱ्यातली नव्हती तिनी गे सगळं जास्त मनावर नाही घेतलं तिला सगळ्यांकडून कौतुक नाही तर सर्वांसाठी काहीतरी करायचं होतं...


बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली...गावापासून ते शहरापर्यंत सर्वत्र चर्चा सुरू झाली...अनेक स्त्रिया आश्चर्य करू लागल्या इतक्या कमी वयात इतकं सगळं.. अन्याय सहन करणाऱ्या बायकांना  नवी आशा मिळाली.. आपल्या मदतीला कोणीतरी येईल..अशी आशा त्यांना वाटू लागले...


अशातच आठ दहा दिवसानंतर अहिल्याकडे एक तिशीतली बाई आली.. शरीराने  खुप अशक्त वाटतं होती....अहिल्याचा पत्ता शोधत शोधत इथपर्यंत पोहोचली..

 

अहिल्यानी तिला बसवून पाणी दिले... तिला नाव गाव विचारलं , थोड्या धीराने बोलली आणि गप्प झाली, मनात काही तरी खूप साठवून ठेवल्यासारखं वाटतं होतं, बराच वेळ गप्प होती, अहिल्यानी तिला  जेवायला दिलं...

तिला धीर देऊन हळूच विषय काढला तशी ती ढसा ढसा रडायला लागली.


क्रमशः

 

कोण होती ती व्यक्ती?  काय असेल त्यामागचं रहस्य .. जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

ऋतुजा अतुल वैरागडकर

Working woman

I m working woman... i have 2 baby.. I m learning... i like reading and writing