अहिल्या संघर्ष मातृत्वाचा... भाग 39

Hallyat ajay gambhir jakhami zala

अहिल्या संघर्ष मातृत्वाचा... भाग 39


आधीच्या भागात आपण पाहिले की,


गायत्री संस्थेमध्ये लहान मुलींसोबत छान उपक्रम राबवायची. त्यांना नवीन नवीन खेळ खेळवायची. बाहेर जाऊन छान त्यांना फिरवायची.


एक दिवस अजय घरी आला. त्याने अहिल्यासमोर गायत्रीसाठी लग्नाचा प्रस्ताव मांडला.

गायत्रीला हे ऐकून धक्का बसला. गायत्रीने अजयबद्दल कधी असा विचारही केलेला नव्हता. अहिल्याने अजयला विचारून कळवते अस सांगून घरी पाठवलं. नंतर अहिल्याने गायत्रीला समजावून सांगितलं की अजय खूप चांगला मुलगा आहे. तुझं त्याच्याशी लग्न झालं तर तो तुला सुखात ठेवेल.


आता पुढे,


अहिल्याने गायत्रीला अजय बद्दल सगळ समजावलं. त्यामुळे गायत्री आता अजयशी लग्न करायला तयार झाली.


दुसऱ्या दिवशी गायत्री अजयला भेटायला गेली.


“अजय मला तुझा प्रस्ताव मंजूर आहे. मी लग्न करायला तयार आहे. असं म्हटल्यावर अजय एकदम आनंदीत झाला. त्याने लगेच तिचा हात हातात घेतला आणि


“खरच तू खूप मोठा आनंद दिलास मला. मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. तुझे कितीही आभार मानले तरी कमीच आहेत. मी उद्याच माझ्या आई-बाबांना घेऊन तुझ्या घरी येतो. आपण लग्नाची बोलणी करूया.”


“ठीक आहे,मी निघते.” अस बोलून गायत्री तिथून निघाली.

दुसऱ्या दिवशी अजय त्याच्या आई-वडिलांना घेऊन अहिल्याकडे गेला. तिथे लग्नाची बोलणी झाली. लग्न पक्क झालं आणि सुपारीचा कार्यक्रम पण करून टाकला.

सदानंदच्या कानावर लग्नाच्या गोष्टी  पडल्या आणि पुन्हा त्याचं डोकं ठणकलं. कट कारस्थानांना सुरुवात झाली.

त्याला अहिल्याचं आणि गायत्रीचं काही चांगलं बघवत नव्हतं. त्यांने अजयबद्दल सगळी माहिती काढली.

अजय कधी बाहेर असतो कधी घरी असतो कुणाबरोबर भेटतो दिवसभर काय काय करतो.? सगळी माहिती गोळा केली आणि एक दिवस त्याचा पाठलाग करून त्याच्यावर हल्ला केला.


त्या हल्ल्यात अजय गंभीर जखमी झाला. महिनाभर अजयवरवर उपचार सुरू होते पण अजय अजूनही शुद्धीवर आलेला नव्हता. सगळ्यांना खूप काळजी लागून होती. गायत्रीच्या डोळ्यातलं तर पाणी थांबत नव्हतं. रात्रंदिवस ती अजयजवळ बसली असायची.


आता डॉक्टरांनी हार मानली. सगळे उपचार करून देखील अजयला शुद्धीवर येत नव्हता. त्यानंतर निष्कर्ष निघाला की अजय कोमात गेला हे ऐकून गायत्रीच्या पायाखालची जमीनच सरकली.


 अहिल्याही रडायला लागली,


“आता कुठे माझ्या पोरीचं चांगलं व्हायला लागलं होतं. कोणाची नजर लागली कुणास ठाऊक माझ्या पोरीला? आयुष्य बरबाद झाले तिचे.


अहिल्या आणि गायत्री दोघ्याही हादरून गेल्या. अहिल्याने गायत्री आणि गोजिरी दोघींनाही घरी घेऊन आली.

दुसऱ्या दिवशी सकाळी गायत्रीने स्नान करून देवासमोर बसून मंत्र म्हणणे सुरु केले. देवाचे स्मरण सुरू केले.

अजयची तब्येत खालावली आणि तो मरण पावला. त्या धक्क्यातून सावरायला गायत्रीला बरेच महिने लागले. अहिल्या आणि गोजिरी ने तिला सावरण्याचा खूप प्रयत्न केला.

आता गायत्री हळू हळू त्यातून बाहेर यायला लागली. आता थोडं सगळ्यांशी बोलायला सुरुवात केली. आयुष्यात जरी तिने पहिल्यांदा कुणावर तरी प्रेम केलं होतं पण तिचं पहिलं प्रेम तिला मिळू शकल नसल्याचे दुःख तिच्या मनात घर करून गेले आणि म्हणून तिने निर्णय घेतला की आपण आता लग्न करायचं नाही. तसं तिने तिच्या घरी सांगितलं.


“पोरी काय बोलतेस तू? असा काही निर्णय घेऊ नकोस? एकटया बाईने जीवन काढणं काही सोपं नाही. हे जग खूप वाईट आहे त्यात स्त्रीने एकटीने राहणं सोपं नाही.”अहिल्याने गायत्रीला समजावलं.


“पण माई, तू राहिलीस न एकटी. मग सांग मी का नाही राहू शकत?.” गायत्री


माझी गोष्ट वेगळी होती बेटा. माझं नशीबच फुटक होत,त्यावर काही पर्याय नव्हता. पण तू असं काही करू नकोस. माझा नाईलाज होता मला सर्वांचा घरच्यांचा नवऱ्याचा त्रास होता. मला ते घर नाईलाजाने सोडावं लागलं पण तुझा कोणता नाईलाज नाही. का तुझ आयुष्य पणाला लावतेस? तुला एक चांगला जोडीदार मिळेल जो तुझ्यावर प्रेम करणारा तुला सांभाळणारह असेल.”अहिल्या


 “नाही नकोय मला या जगात नाही राहायचं. आता मला दुसर कुणीही नको.गायत्री


“जे नशिबात असते तेच घडते. तुझ्या नशिबात अजय पेक्षा चांगला जोडीदार असेल म्हणून हे सगळं घडलं. तू जास्त विचार करू नकोस आणि अस किती दिवस बसून राहणार आहेस. आश्रमात जाऊन तिथल्या मुलींशी खेळ. त्यांच्यासोबत वेळ घालवं. अशी एकटी बसून राहू नकोस. किती महिने झाले तू बाहेर निघाली नाही. 

गोजिरीकडे बघ, कसा चेहरा लहान झाला. लहानसा चेहरा करून बसलेली असते. किती काळजी करते तुझी.


हे बघ तू स्वतःला सावर. यातून तू बाहेर पड. एकटी नाही आहेस तुझ्या मागे आम्ही सगळे आहोत आमचा विचार करा की अशी उदास बसली असलीस तर आम्हाला चांगलं वाटतं नाही. किती दिवस झाले गोजिरी  जेवली नाहीये.  माझी ताई कधी बरी होईल कधी यातून बाहेर पडण्याची वाट बघत असते.


गायत्री उठ सावर स्वतःला , सांभाळा स्वतःला, अस एका जागी बसून काही होत नाही. आयुष्यात या सगळ्या गोष्टी घडणार म्हणून काय आपण फक्त बसून राहायचे. तर नाही आपण उठायचं लढायचं हिमतीने सामोरे जायचं. काही प्रसंग आयुष्यात आली म्हणून आयुष्य सोडून द्यायचं नसतं. तर त्या वाईट गोष्टीतूनही काहीतरी चांगलं घडतं. असा देवाचा संकेत असतो आणि त्यानुसारच आपल्याला चालावे लागते.”


आईचं बोलण ऐकून गायत्री थोडी भावुक झाली. उठली, गोजिरीजवळ गेली, तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला 
“का इतका विचार करतेस माझा? तु माझ्यापेक्षा लहान आहेस तरी किती करतेस माझ्यासाठी?” गायत्री गोजिरीजवळ जाऊन बसली.

“ताई तू माझ्यासाठी एकटीच आहेस ग. मी कुणासाठी करणार तुझ्यासाठीच करणार ना. तू अशी रडत बस जाऊ नकोस ग. मला ती  हसरी गायत्री ताई हवी आहे. मला माझी हसरी ताई परत करशील?


हे ऐकताच गायत्रीच्या चेहऱ्यावर गोड हसू आणलं आणि तिने गोजिरीला जवळ ठेवून घट्ट मिठीत घेतली.


क्रमश:


 

🎭 Series Post

View all