आहे मी बायकोचा गुलाम भाग १०

Time Is Best Teacher


आजोबा लगबगीने फोन उचलण्यासाठी उठले.हळुहळु पावलं टाकत फोनच्या दिशेने गेले...त्यांना वाटलं भावेशचा फोन असेल ... पाहतात तर महेशचा फोन होतात.त्यांची खूपच निराशा झाली...त्यांनी फोन उचलला .. महेश आजोबांना म्हणाला "आजोबा मी जेवन घेऊन येतो आहे,तुम्ही फ्रेश झाला का???

"हो मी फ्रेश झालो आहे "आजोबा म्हणाले....

आजोबांनी फोन ठेवला .किती आशा होती आजोबांना??? ,भावेश फोन करेल... त्याला माझा नंबर दिसला नाही का..??किती वेळ झाला त्याला फोन करून.अजून त्याने पाहिला नसेल का ??? कामात असेल का??का रागावला असेल?? असे विविध प्रश्न भरभर मनाला पडू लागले.येरझऱ्या मारू लागले..त्यांना अस्वस्थ वाटू लागले.. मन चलबिचल झाले.. त्यांनी विचार केला पुन्हा फोन करावा भावेशला..कदाचीत त्याने पाहिले नसेल .त्यांनी विचार केला पुन्हा एकदा फोन करून बघावाच ,ह्या खेपेला उचलला तर उचलला..डोळे तर खूप काठोकाठ भरून आले होते,..न जाणे छातीत धडधड होत होती..थरथरत्या हाताने त्यांनी मोबाईल घेतला.डोक्यावर चढवलेला चष्मा व्यवस्थित डोळ्यावर लावला.भावशेला फोन लावणार तितक्यात त्यांच्या हातातुन मोबाईल जोरात खाली जमिनीवर पडला... खाली पडल्यामुळे स्क्रिन वर काहीच दिसेनासे झाले..पुन्हा त्यांनी मोबाईल हातात घेतला आणि स्क्रिन पुसू लागले..कसलं काय ??त्यांची खूप खटाटोप चालू होती..त्यांनी power off करून पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न केला पण सगळे प्रयत्न व्यर्थ गेले..तेवढयात फोनची रिंग वाजली ...पण स्क्रिनवर तर काहीच काहीच दिसत न्हवते.आजोबांना पूर्ण खात्री होती ह्यावेळी नक्की भावेशच असणार,त्यानेच केला असणार मला फोन . दहा वेळा त्यांनी प्रयत्न केला फोन उचलण्यासाठी ...पण काही केल्या फोन उचलता आला नाही.फक्त रिंग वाजत होती..आजोबा हतबल झाले.कासावीस झाले...रिंग वाजून वाजून शेवटी फोन बंद झाला...पुन्हा दोन मिनिटाने फोन आला .आता तर नक्कीच हा भावेशच असणार दोन वेळा लागोपाठ फोन आला.. कितीही प्रयत्न केला तरी काही फोन उचलता न्हवता येत..काय ह्या मोबाईलला आताच बंद व्हायचे होते??.. किती दिवसाने मी स्वतःहुन फोन लावत होतो भावेशला आणि आताच असे व्हावे??..शेवटचं कधी त्याच्याशी बोलले होते हे सुद्धा त्यांना आठवत नव्हते...

आपल्यामध्ये किती दुरावा आला ह्या विचाराने ते पुन्हा अस्वस्थ झाले....मनातल्या मनात बोलू लागले"भावेश ,माझ्या पोरा आज तुझ्याशी बोलायला आतुर झालो आहे..कधी तुझा आवाज ऐकतोय असे झाले आहे...कधी एकदाचा तुझ्याशी बोलतो आहे असे झाले आहे बाळा......

आता सरणात जायची वेळ आली माझी तेव्हा माझ्यातल्या वडीलाने जन्म घेतला....माझ्या मुलाला साद घातली ....

अंधारात राहिलो इतकी वर्ष.. काळाकुट्ट अंधार होता...तू,कमल दोघेही माझ्यावर अवलंबून होता आणि मी मात्र जे घडून गेले ,जे अपमानाचे चटके सहन केले त्याचा दाह आयुष्यभर सहन करत राहिलो....ते करत असताना माझ्या बायकोला,मुलाला काही त्रास तर होत नाही ना ??कधीच पाहिले नाही..

सर्वात जास्त तर तुम्ही दोघांनी सहन केले..माझा रुक्षपणा, माझी चिडचिड,माझा भयंकर राग ,माझे न पटणारे थोपवलेले निर्णय.... सर्वच सहन करत राहिलात..आज तुझ्याशी बोलावं वाटतंय खूप मन भरून बोलायचे आहे भावेश...


दारावरची बेल वाजली..

आजोबांनी डोळ्यात आलेले अश्रू पटकन पुसले....

महेश जेवन घेऊन आला होता ...त्याने पाहिले आजोबाना फोन येत आहे आणि ते उचलण्यासाठी प्रयत्न करत आहेत... महेशने आजोबांना विचारले .."आजोबा काय झाले???किती वेळ झाला ,मोबाईलच्या स्क्रिनवर टच करत आहात..?? तुम्ही फोन उचलत का नाही?? .....

आजोबा:"महेश, बघ ना फोनच हातातुन खाली पडला... स्क्रिनवर काहीच दिसत नाही...फोन येतोय तो दिसत नाही.. फोन उचलता येत नाही..अगदी रडवलेला चेहरा करून महेशला सांगू लागले.....

महेशने मोबाईल हातात घेतला पाहतो तर काय स्क्रिन खरंच खराब झाली होती...त्याचाच काहीतरी issue होता...

"आजोबा, बहुतेक ह्याला रिपेअर करावे लागणार.."....मी उद्या बघतो माझा मित्र आहे त्याला देतो.करेल तो नीट...


आजोबा"बरं तुझ्याकडे भावेशचा नंबर आहे ना??मला जरा फोन लावून दे ना... मला त्याच्याशी बोलायचे आहे...

महेश:"हो आजोबा माझ्याकडे नंबर आहे पण आता मी मोबाईल आणला नाही..आजोबा आणून देऊ का???."


आजोबा:" नको नको असू दे ..आताच वर चढून आला आहेस...घाम आला आहे तुला ...नको धावपळ करुस...थोड्या वेळाने दे चालेल.. असं काही अर्जंट नाही ... सहजच फोन करायचा होता...

आजोबांनी विचार केला आताच आला आणि लगेच त्याला फोनसाठी पुन्हा घरी पाठवणं बरं दिसत नाही....इच्छा तर खूप होती भावेशशी बोलायची पण त्यांनी स्वतःला सावरलं...तोसुद्धा दिवसभर हॉस्पिटलमध्ये धावपळ करत होता...घरी आल्यावर जेवण बनवले होते...अजून किती पोराला त्रास द्यायचा....



आजोबा म्हणाले ये बस माझ्याजवळ... थोडं बोल माझ्याशी मला बरे वाटेल..जरा जीव घाबरा घुबरा होतोय.. सवय नाही ना एकटं राहायची.नेहमी कमल सोबतीला असतेच...आता पण होती ना भले दिवसभर रुममध्ये असायची तरी बरं वाटायचे.जवळ होती माझ्या..आज वेगळंच वाटतंय मला..छातीवर दगड ठेवल्यागत झालं आहे.... पण काहीही म्हण हा महेश बायकोशिवाय घराला घरपण नाही...तिच्या अस्तित्वाची जाणीव ती नसतानाच प्रकर्षाने होते..कमलच वय जरी झालं असलं ना तरी पण दिवसभर तिचं काही तरी चालूच असायचे.ती असते तेव्हा घराला घरपण येते ,चैतन्य येते....सकाळची कामं आटपली की स्वतःचे छंद जोपासत होती बघ..
कधी पुस्तक वाचायची...
कधी गाणी ऐकायची..विणकाम, बागकाम करायची.....

आजोबा सांगत असताना शांत झाले आणि उठले....

"कुठे चालले आजोबा".महेशने प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारले...


"बघ ना तुझ्याशी बोलताना आठवलं आज मी झाडाला पाणीच टाकलं नाही...सुकली असतील झाडं... थांब मी लगेच येतो झाडांना पाणी देऊन......


महेशच्या गालावर मिश्किल हसू आले..


आजोबांनी पाणी घेतले आणि झाडाला पाणी दिले.....तितक्यात त्यांना आठवलं. कमल रोज रात्री तुळशीपाशी दिवा लावते.. त्यांनी तुळशीपाशी जो दिवा होता तो घेतला आणि लावला ...आजोबांना खूप प्रसन्न वाटलं..जणूकाही त्यांना भास झाला कमल आजी पाठीच उभी आहे की काय....खूप जीव त्या तुळशीवर...


आजोबा पुन्हा येऊन महेशकडे बसले....


"आजोबा आता आजी घरी येईल ना तेव्हा मी सांगणार आहे तुम्ही त्यांच्या झाडाची काळजी नीट घेतली नाही"...

लहान पोरागात आजोबा खळखळून हसले आणि म्हणाले"नको हा महेश असं काही करू नकोस,मी घाबरतो का बरं माझ्या मालकीण बाईला.....


आजोबा पुन्हा उत्साहाने बोलू लागले
"महेश आपण पुरुष कितीही घरातली कामं करू दे पण एक स्त्री जेव्हा घरातली कामं करते ना त्याची अदाच न्यारी.... घराचा कानाकोपरा तिच्या मायेच्या स्पर्शाने मोहरलेला असतो..कोणती वस्तू कशी ठेवायची, कुठे ठेवायची... सगळं तिला माहीत असतं...

एखादी गोष्ट सापडली नाही ना की तीच असते .. ती बरोबर शोधून देते..माझी कमल तर फार कर्तव्यदक्ष...कधीच कंटाळा करत नाही...किचनमध्ये तर जेव्हा भाज्यांना फोडणी देते ना तर पूर्ण घरभर घमघमाट सुटतो... चपात्या तर अगदी मऊ ,लुसलुशीत.. तोंडात चपाती घातली की विरघळीच समज...साक्षात अन्नपूर्णा आहे बरं का??....


मी कामाला जायचो ना तर माझा डबा माझे मित्रच साफ करायचे... म्हणायचे "वहिनीच्या हाताला चव आहे,वाहिनीने एखादे हॉटेल काढले ना तर ती करोडपती होईल"....


कमलमुळे माझी कॉलर टाईट
व्हायची.बरं वाटायचे जेव्हा तिचं कोणी कौतुक करायचे.. हो पण मी कधी तिची तारीफ केली नाही...जरी मी तारीफ केली नाही तरी तिने स्वतःच कौशल्य, कला थांबवली नाही हा...


दुपारचा मोकळा वेळ मिळाला ना की लोकरीच्या वस्तू वीण तर कुठं कपडे शिव..तर कुठे रेशीम धाग्यांनी कपड्यावर कलाकुसर कर..हे पडदे आहे ना ते सुद्धा तिनेच शिवले आहे बरं का??रेडिमेड आणून वस्तू वापरणं तिला पटलं नाही बघ..हल्ली किती बायका बाजारातून काय काय वस्तू विकत घेतात तेवढाच वेळ वाचतो आणि आराम..पण कमल मात्र वर्षभराचा मसाला, लोणचं, पापड करून ठेवायची......

प्रत्येक गोष्टीसाठी तिची जागा ठरलेली असायची बघ..इकडचा डबा तिकडे व्हायचा नाही बघ....भांडी घासताना सुद्धा अलगद हाताने घासत होती बघ,अजिबात आवाज नाही भांड्याचा... मी त्यादिवशी तू दिलेले फक्त डबे घासत होतो तर धाडकन पडले...लहान बाळाला अंघोळ घालावी असे ते भांड्याचे लाड..कशी काम करत असेल काय माहीत..????मी काही करत न्हवतो पण तिची काम करण्याची पध्दत इतकी वेगळी आहे ना की आपोआप लक्ष जायचे....

कलाच आहे म्हण... तुला खरं सांगू का????

कमलच्या हाताचे जेवन जेवलो ना तरच पोट भरत माझं....

"म्हणजे मी चांगला स्वयंपाक करत नाही ना आजोबा "मुद्दामुन महेश म्हणाला...

"अरे बाळा तसं नाही रे,मला तसं म्हणायचं न्हवतं ..उत्तम स्वयंपाक बनवतो .तुझ्याकडून स्वयंपाक शिकायचा आहे... तेसुद्धा कमल घरी येण्याच्याआधी.....कसं ना तिच्या जेवणाची सवय झाली आहे रे....

बघ आज किती दिवसाने गप्पा मारल्या आहेत...भरभरून बोललो बघ..मन हलकं झालं....

आजोबा:माझंच पुराण चालू आहे ..माझं जाऊ दे "महेश मधू कशी आहे ??ह्या घाईगडबडीत काही विचारले नाही तुला....माफ कर हा...

महेश:"आजोबा माफी कसली मागत आहात?..असं काही बोलू नका..तुम्हीच किती टेंशनमध्ये आहात ,दिसतंय की मला सर्व.... आणि मधुचं म्हणाल तर आहे ती आता व्यवस्थित....उद्या रिपोर्ट काढायचे आहेत... आशा करतो reoprt negative आला म्हणजे tention निघून जाईल....

आजोबा:"नक्की येईल रिपोर्ट negative..... माझा आशिर्वाद आहे...तू माझ्यासाठी ,कमलसाठी किती धडपड करतो आहेस..दुसऱ्याला मदत करणाऱ्याला देव स्वतः मदत करतो,सुखी ठेवतो..बघ तू उद्या मधूचा रिपोर्ट चांगलाच येणार...असे म्हणत त्यांनी महेशच्या डोक्यावर हात ठेवला तसे महेशच्या डोळ्यात टचकन पाणी आले....किती वर्षांनंतर कोणी तरी मोठं आपल्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत आहे ह्याने जितका सुखावला तितकाच तो भावुक झाला.....

आजोबांच्या नजरेतुन ते काही सुटले नाही....पुन्हा महेशच्या डोक्यावरून हात फिरवला...

आजोबा:"काय झाले महेश? " डोळ्यात पाणी आले,मधूची काळजी वाटते का??

महेश:"काही नाही आजोबा असंच ,भरून आले"......

आजोबा:"महेश, मी असाच म्हातारा झालो नाही...तुझं हे असे भावुक होणे सहजच नाही हा...सांग बर आता काय झाले??? तू माझ्या रवीसारखाच आहेस ......बोल आता...

महेश:"आजोबा,आज किती वर्षांनंतर आई ,बाबानंतर कोणी तरी मायेने डोक्यावर हात ठेवला..त्यामुळे आधीचे दिवस आठवले...आता मात्र मी मुकलो आहे ह्या प्रेमाला ,ह्या स्पर्शाला .....

आजोबा:"म्हणजे??

महेश:"आजोबा आधी मी माझ्या आई वडिलांसोबत रहात होतो....नंतर आई आणि मधू ह्यांच्यात वाद होऊ लागले,एकही दिवस असा गेला नाही की भांडण झाले नाही..मधू कामाला जायची.आईला मधुने जीन्स ,वैगेरे घालणे आवडत न्हवते...म्हणून मधूने ते बंद केले..कधी कधी उशीर झाला की आई रागराग करत होती.मधुची धावपळ होत होती म्हणून तिने घरी भांड्याला आणि फरशीला बाई लावली..आईला काही त्या कामवाल्या मावशीची कामं आवडत न्हवती..आईने ती कामवाली मावशी काढून टाकली....

आईचं म्हणणं होतं की मधूला काम करायचे असेल तर तिने घराकडे लक्ष द्यायलाच हवे....मधूला सर्वच करणं जमत न्हवते... मधू तरी प्रयत्न करत राहिली.....


थोड्या दिवसाने गोड बातमी मिळाली... मला वाटलं आई आणि मधू दोघी जवळ येतील..पण झाले उलटेच.दोन महीने झाले आणि मधुचं मिसकेरेज झाले... मधु खूप डिप्रेशनमध्ये गेली..त्या वातावरणात अस्वस्थ होऊ लागली...मग माझ्या बाबांनी आम्हाला वेगळं राहा म्हणून सल्ला दिला..

जवळ राहून दूर राहण्यापेक्षा दूर राहून जवळ राहणे कधीही उत्तम.....म्हणून मी वेगळा राहिलो.मन तर मानत न्हवते पण मधूची अवस्था पाहून एका क्षणाला असे वाटले बाबा योग्य आहे..आम्ही घरातून निघालो.

पण नंतर असे वाटले की ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती...दोन महिन्यांत आई अटेक येऊन गेली....मी आणि मधु पुन्हा बाबाकडे गेलो.. बाबा एकटे पडले होते.... आईच्या आठवणीत ते झुरत राहिले... बाबासुद्धा खंगुण गेले..खाणं सोडले.. सर्व सोडले.... तेसुद्धा सहा महिन्यात दगावले..गेले माझे आई बाबा दोघेही मला सोडून गेले..पोरका झालो मी..आई बाबांच्या सहवासाला तरसतो आहे मी..

कधी कधी खूप आठवण येते..आठवण आली की खूप रडून घेतो ...खूप रडून घेतो....

महेशने दोन्ही हाताने चेहरा झाकला आणि खूप रडु लागला..

त्याला रडताना पाहून आजोबाच्या डोळ्यात पाणी आले..

आजोबा महेशच्या बाजूला बसले आणि त्याच्या पाठीवर हात ठेवला ..

"शांत हो महेश,शांत हो..सांभाळ स्वतःला...

"मी समजू शकतो तुला काय त्रास होत असेल.."मीसुद्धा माझे आई वडील असेच गमावले होते..खूप लवकर त्यांनी माझी साथ सोडली होती....हा त्रास शब्दात सांगता येत नाही महेश ..खरंच शब्द अपुरे आहे..डोक्यावरून आई वडिलांच छत्र जेव्हा नसते ना तेव्हा मन व्याकूळ होते.त्यांच्या आठवणी मनावर वार करतात...

नेहमी आपण त्यांना सुख दुःख सांगतो. कधी त्यांची शाबासकी, त्यांचं कौतुक सर्व जीवनाला उभारी देते.त्यांचं अस्तित्व मोलाचे असते...त्यांचं निघून जाणं म्हणजे घरातलं छत वाऱ्याने उडून जाण्यासारखे आहे .मग आयुष्यभर फक्त स्वतःला लढावं लागतं... कितिही दुःख आली तरी त्यांना विसरावे लागते...ते असतात तेव्हा कितीही मोठं संकट येऊ दे त्या संकटांना भुईसपाट करण्याची शक्ती येते..त्यांचा आशीर्वाद असतो आपल्यापाठी.आपल्यासाठी सतत प्रार्थना करतात.....ते असतात तेव्हा आपलं यश पाहून त्यांचे डोळे आपसूकच पाणावतात.... त्यांच्या डोळ्यातील चमक, चेहऱ्यावरच तेज ,त्यांचा आंनद पाहण्याचं भाग्य ज्यांना मिळतं ते नशीबवान असतात महेश नशीबवान असतात.......

महेश मी आहे ना तुझ्या आजोबा सारखा..ह्यापुढे तू तुझं सुख दुःख माझ्यासोबत व्यक्त करायचं.. वचन दे मला ..आजपासून तू माझा नातू....


महेशने आजोबांकडे पाणावलेल्या डोळ्यांनी पाहिले ..आणि मिठी मारली..आता तर आजोबा आणि महेशच्या अश्रूंचा बांध सुटला होता..आजोबांनी महेशचे डोळे पुसले ...त्याला पाणी आणून दिले...

दोघेही शांत झाले होते...

महेश:"आजोबा जेवून घ्या तुम्ही.."खूप उशीर झाला...

आजोबा:"बरं जेवतो"म्हणत आजोबा जेवायला बसले...



दारावरची बेल वाजली....महेश म्हणाला आजोबा तुम्ही जेवा मी बघतो कोण आहे...
महेशने दरवाजा उघडला पाहतो तर काय भावेश ,राधा आणि रवी दारावर उभे होते..


क्रमशः

भावेशही फोनवर बोलण्यासाठी व्याकूळ झालेले आजोबा जेव्हा भावेशला पाहतील तेव्हा काय reaction असेल त्यांची...पाहू पुढच्या भागात...

कसा वाटला आजचा भाग ?कंमेंट नक्की करा.. तुमचे कंमेंट मला लिखाण करण्यास अजून बळ देतात. पुढील भाग वाचण्यासाठी मला जरूर फॉलो करा.धन्यवाद..

©®अश्विनी पाखरे ओगले



🎭 Series Post

View all