त्याचा अहंकार - भाग - 2

ahankaar


त्याचा अहंकार - भाग – २
नीरज आता गीतांजली ला आग्रह करतो कि तुला मला काही तुझ्या पूर्वायुष्यातली एखादी गुपित-गोष्ट सांगायची असेल तर सांग, गीतांजली सुरवातीला लाजते, नाही- नाही म्हणते, नीरज मात्र तिला सांगण्याची गळचं घालतो, कोणालाही न सांगण्याच आणि ऐकून सगळं विसरून जाण्याचं वचन देतो, त्या गोष्टीचा आपल्या वर्तमान आयुष्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याची खात्री देतो, इतका विश्वास दिल्यावर गीतांजली सुद्धा आपल्या लग्नापूर्वीची मनातली एक अतिशय नाजूक गोष्ट म्हणजे तीच ही एका मुलाबरोबर प्रेम होत पण आई ने लग्नाला विरोध केल्यामुळे ती त्याला मुलाबरोबर लग्न करू शकली नाही हे नीरज ला सांगते.
पण ती गोष्ट ऐकल्यावर मात्र नीरज चा पुरुषी अहंकार परत जागा होतो, तो ही गोष्ट पचवूच शकत नाही, त्या दिवसापासून नीरज - गीतांजली च्या नात्यात पुन्हा हळूहळू दुरावा निर्माण होतो, तो तिला टाळू लागतो, स्वतःला पूर्णपणे कामात बुडवून घेतो, रोज ऑफिसमधून उशिरा घरी येतो, सुट्टीच्या दिवशीदेखील घरात गीतांजली किवा मुलीला वेळ न देता सतत बाहेर राहु लागतो, सारखा चिडचिड करतो, अशाच परिस्थितीत चार वर्ष निघून जातात.
नीरज च्या वागण्याने गीतांजली मनातून कोलमडते, त्याचा परिणाम तिच्या तब्येतीवर होतो, निरुत्साह आणी अशक्तपणामुळे ती सतत आजारी पडते, तिच्या सततच्या कुरबुरीना कंटाळून नीरज आता तिला पूर्णपणे टाळू लागतो, सतत पाच-सहा दिवस, बाहेर राहू लागतो, असंच एक दिवस सकाळी लवकर उठून ऑफिसला निघायच्या तयारीत असणाऱ्या असताना गीतांजली नीरज ला हाक मारते, तो तिच्याकडे दुर्लक्षचं करतो.
पण ती पुन्हा निर्वाणीने हाक मारते आणि सांगते की आज मला अगदीच अशक्तपणा मूळे उठायला होत नाहीय, तेव्हा छोटी ला आज तू जाताजाता शाळेत सोड, मग पुढे ऑफिसला जा, नीरज चिडतो , नाही म्हणतो, ऑफिसला उशीर होईल असा बहाणा करतो, शेवटी गीतांजली त्याला विनवणी करते कि तुझा राग माझ्यावर आहे तर मग छोटीला यात कशाला ओढतोस, तिचा यात काय गुन्हा, शेवटी एकदाचा वैतागत नाईलाजाने तो छोटी ला शाळेत सोडायला जातो, शाळेबाहेर मुलांची आणि त्यांना सोडायला आलेल्या पालकांची खूप गर्दी झालेली असते, फक्त मुलांनाच गेटमधून आत सोडलं जातं, पालक मात्र बाहेरच थांबलेले असतात, नीरज छोटी ला घेऊन गर्दीत घुसतो आणि ती गेटमधून आत जाईपर्यंत पाहत राहतो, ती सुखरूप आत गेल्यावर हुश्य करत गर्दीतून वाट काढत बाहेर येतो आणी तेव्हा त्याला त्या पालकांमध्ये ओझरता नेहल सारखा चेहरा दिसतो,
नीरज मुद्दाम तिच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो, नेहल सारख्या दिसणाऱ्या त्या चेहऱ्यामुळे नीरज अस्वस्थ होतो, त्या दिवशी ऑफिसमध्ये देखील त्याच कामात लक्ष लागत नाही, तो पुन्हा एकदा पूर्वीच्या विसरलेल्या नेहल च्या आठवणींनी बेचैन जातो, रात्री नीट झोपत नाही व आता मनाशी ठरवतो की आता काहीही करून उद्या पुन्हा शाळेत जाउन खात्री करून घ्यायची की ती नक्की नेहल चा होती कि दुसरी कोणी.
नीरज सकाळी लवकर उठून तयार होतो आणि स्वतःहून छोटी ला शाळेत सोडायला निघतो, गीतांजली मनातून सुखावते, , नीरज आता शाळेजवळ पोहोचतो, आणि पटकन छोटी ला गेटमधून आत सोडतो आणि तिथेच नेहल च्या जवळ येण्याची वाट पहात राहतो, इतक्यात नेहल आपल्या लहान मुलीला घेऊन गेटकडे येताना त्याला दिसते, तिच्याकडे नीरज पाहताच राहतो.
पुढच्या भागात आपण बघणार आहोत नीरज – नेहल च्या ह्या नात्याचे काय होते ते...
लेखिका – सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
( राहणार- देवरुख – रत्नागीरी )

🎭 Series Post

View all