( हि एक सत्य घटना आहे )
सांगली मधल्या एका दुर्गम गावातला एक हुशार मुलगा नीरज घरच्या बेताच्या परिस्थितीवर मात करत आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर मुंबईत जाउन स्वतःच शिक्षण उत्तमरीत्या पूर्ण करतो, तिथेचं कॉलेजात त्याच्या बरोबरच शिकत असणाऱ्या नेहल बरोबर त्याची मैत्री होते.
नेहल त्याला मनापासून आवडते, तिलाही हि गोष्ट माहित आहे आणी तिची त्याला मूकसंमती सुद्धा आहे, नीरज तिच्यावर अगदी मनापासून प्रेम करतो पण त्यावेळची परिस्थिती पाहता प्रेमापेक्षा शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द आणी गरज ओळखुन नीरज आपलं प्रेम तिच्यापुढे व्यक्त करू शकत नाही आणी तेव्हाच तो मनाशी ठरवतो की शिक्षण पूर्ण झाल्याबरोबर आधी एखादी चांगली नोकरी मिळवायची आणि मग नेहल ला प्रपोज करायचं, थोड्याच दिवसांत नीरज ला एका चांगल्या कंपनीत नोकरी लागते.
नीरज आनंदाने हि बातमी देण्यासाठी आणि मनात ठरवल्याप्रमाणे नेहल ला मागणी घालण्यासाठी म्हणून तिच्या घरी जातो पण त्याला आता फार उशीर झालेला असतो, नेहल चे आजारी वडील अचानक दगावल्यामुळे जवळपासच्या वडिलधाऱ्या नातेवाईक मंडळींकडून तिच्यावर लग्नासाठी दबाव आणून ओळखीतल्याच एका पुण्यात राहणाऱ्या मुलाशी तीच जबरदस्तीने लग्न ठरवल जातं, नाईलाजाने नेहल ला लग्न करणं भाग पडतं, लग्न करून नेहल पुण्याला निघून जाते, यागोष्टी इतक्या अचानकपणे घडतात कि त्याबद्दल नीरज शी काही संपर्क साधण्यासाठी तिला वेळच मिळू शकत नाही.
नीरज निराश मनाने घरी परततो, तो आता नेहल ला विसरण्याचा प्रयत्न करतो, पण काही केल्या तिला विसरू शकत नाही, लग्नाचं वय उलटून चालल्यामुळे घरातून नीरज ला सारखे लग्नासाठी पाठी लागतात, नीरज त्यांना खूप विरोध करतो, पण त्याच्या पाठच्या भावंडांची लग्न व्हायची असल्यामुळे कसाबसा नाईलाजाने लग्नाला तयार होतो,
घरच्यांच्याच पसंतीने नात्यातल्याच गीतांजली नावाच्या एक सुस्वरूप मुलीशी नीरज च लग्न करून देण्यात येतं, नीरज नवीन संसारात फारसा रमत नाही, नुसताच संसारगाडा रेटत असतो, पण आपलं काम मात्र अगदी मन लावून करत असतो, त्याची मेहनत हुशारी पाहून पुढे काही दिवसातच त्याची प्रमोशनवर पुण्याला बदली होते, साहजीकच त्याला आपल्या पत्नीला घेऊन तिथे जाणं भाग पडतं, हळूहळू त्याला जाणीव होते की आपण आपल्या पत्नीशी उगाचच फटकून वागतो, तिला समजूनच घेत नाही, प्रेमात अपयश आल्याचा राग आपण उगाच तिच्यावर काढतोय, तसं पाहिल तर यात तिची काहीच चूक नाहीय, नीरज आता आपलं वागणं सुधारतो आणि गीतांजली बरोबर नॉर्मल वागू लागतो.
थोड्याच दिवसांत त्यांच्यात एक चांगलं पती-पत्नीच नातं निर्माण होतं, त्यातूनच त्यांना एक छान मुलगी होतो.दोघांचाहि संसार व्यवस्थित चाललेला असतो, दोघेही आपली सुख-दुख एकमेकांशी शेअर करतात, नीरज एक दिवस मूडमध्ये येउन आपलं लग्नापूर्वीच जमलेलं प्रेम व काही कारणांनी नेहल सोबत न होऊ शकलेलं लग्न ही सगळी हकीकत गीतांजली ला सांगतो, ती ही सगळं निमूट ऐकून घेते, झालं गेलं विसरून जा, मी आहेना तिची तुम्हाला आठवण सुद्धा होणार नाही इतक मी इतकं मी तुमच्यावर प्रेम करीन असा नीरज ला धीर देते,
गीतांजली असं काय सांगते कि नीरज च तिच्या बरोबऱ च वागणं बदलत ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत.
लेखिका – सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
( राहणार- देवरुख – रत्नागीरी )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा