Jan 27, 2021
विनोदी

अगंबाई सासूबाई

Read Later
अगंबाई सासूबाई

गौरी आणि अमरचे लग्न झाले. गौरीचा गृहप्रवेश झाला. थोडे दिवस घरात पाहुण्यांची गर्दी होती. पण काही दिवसांनी पाहुणे आपल्या घरी गेले. आता घरामध्ये गौरी, अमर आणि गौरीचे सासू सासरे इतकेच होते.

गौरीला बेसिक स्वयंपाक येत होता. भात, भाजी, चपाती, आमटी वगैरे इतकंच येत होत. लग्न झाल्यावर तिला गोड म्हणून शिरा करायला लावला होता इतकेच. लग्न झाल्यावर आज ती सगळा स्वयंपाक करणार होती.

ती स्वयंपाक करत असताना सासूबाई तेथे येतात आणि तिला म्हणतात "हे बघ गौरी उद्या आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. मी जास्तीची काही कपबशी आणि भांडी वरती ठेवली आहे. मग वरची जास्तीची कपबशी आणि काही भांडी नंतर काढून ठेऊ. म्हणजे उद्या गडबड होणार नाही."

गौरी "बरं" म्हणते.

तिचं सगळं काम आवरून झाल्यावर ती एकटीच वरची कपबशी काढू लागते. तो बाॅक्स जड असल्याने तिच्या हातातून निसटून खाली पडतो. तिच्या सासूबाई काय पडले म्हणून लगेच येतात. तर कपबशी फुटलेल्या असतात. गौरी जाम घाबरते. पण तिला सासूबाई काही बोलत नाहीत.

"मला बोलवायच नाही का?" इतकेच म्हणतात.

मग गौरी "साॅरी" म्हणते.

"असू दे ग. होत अस कधी कधी. पण वस्तू जपून वापरायच्या आणि जड काही असेल तर मला बोलवत जा ना. अशी एकटी करत जाऊ नकोस." गौरीच्या सासूबाई.

गौरी "बरं" म्हणते.

संध्याकाळी गौरी सासूबाईंना उद्या काय स्वयंपाक करायचा हे विचारायला जाते. विचारून थोडा वेळ बसते. मग रात्रीचा स्वयंपाक करायला जात असते तोच तिचा धक्का लागून फ्लाॅवरपाॅट खाली पडतो. जो की तिच्या सासूबाईंना खूप आवडत असतो. गौरीला ते बघून रडूच आले.

तो फ्लाॅवरपाॅट फुटल्यावर सासूबाईंनी डोक्याला हात लावला. आता ओरडावे की समजून सांगावे हेच त्यांना समजेना. कारण गौरी एकसारखी रडतच होती.

इतक्यात अमर आला. त्याला समजेना काय झालंय ते. सासूबाईंनी त्याला खुनेनेच शांत राहण्यास सांगितले. अमरला तो फ्लाॅवरपाॅट बघून सगळे समजले. मग अमरने येताना आणलेली दोन कॅडबरी गौरीच्या समोर केली. गौरी रडतच ती कॅडबरी घेऊन त्यातली एक सासूबाईंच्या पुढे केली तेव्हा तिच्या सासूबाई म्हणतात "मला काय सात समुंदर गाण्यावर डान्स करता येत नाही बाई."

गौरीला यावर काय बोलायचे कळेना. पण वातावरण निवळून सगळेच हसू लागतात.

आजकालच्या सासूबाई या अशा आहेत. सूनेला समजून घेऊन तिला लेकीप्रमाणे वागवतात. हो की नाही. तुमचं काय मत आहे?

आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका.*** सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क फक्त लेखीकेकडे राखीव आहेत. आपल्याला ही पोस्ट शेअर करायची झाल्यास नावासह जरूर करावी. आपला अभिप्राय हा सर्वात महत्त्वाचा ! तेव्हा कृपया लाईक सोबतच खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर कळवावे.

©®प्रियांका पाटील.

Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मी काही प्रोफ़ेशनल लेखिका नाही.. मनात जे काही येतं ते लिहिते..