बोर्डाने केला घात पण परत आणला हात

Story Of The Girl

विषय_काळ आला होता पण.....

शीर्षक_बोर्डाने केला घात, पण परत आणला हात

ए नीलू तो लाईट बंद कर ग.. मला झोप लागत नाही या ट्यूबलाईट मुळे... केवढा हा प्रकाश! घड्याळात वाजले बघ किती!! सकाळचे चार वाजले. झोपलेल्या सर्वांनाच त्रास होतो तुझ्या या लाईट लावण्याचा... बंद कर आधी तो!! नीलू ची मोठी बहीण सुषमा रागानेच नेटवर ओरडली.

निलूही सात भावंडांमध्ये मधली.. पण खूपच आज्ञाधारक! नीलू ची आई वसुधा ताईंनी मुलांनी सकाळी उठून अभ्यास करावा हा नियम घालून दिलेला होता....

त्यासाठी त्या सकाळी चार ला च मुलांना उठवायच्या... त्या अभ्यासाच्या बाबतीत खूप क** शिस्तीच्या होत्या. मुलांनी अभ्यास करावा, शिकून मोठं व्हावं, ही स्वतःच्या पायावर उभे राहून मोठेपणी कर्तुत्ववान व्हावे!! परिस्थितीमुळे होणारी ओढाताण मुलांच्या भावी आयुष्याला मारक ठरू नये ही त्यांची धारणा होती.,....

त्यामुळे त्या आपल्या मुलांना अभ्यासाला सकाळीच चारला उठवायच्या., त्यांची मुलं सुद्धा मनापासून अभ्यास करायची. पण कधी कधी कंटाळा हा येतोस ना!!!!

आई खूप दा भावंडांना उठवायची.. पण नीलू शिवाय कोणीच उठायला तयार नसायचं.

असा रोजचा उठण्या उठवण्याचा आवाज, त्यात ट्यूबलाईटच्या प्रकाशाची भर...

त्यामुळे वडिलांची किंबहुना सगळ्यांचीच खूप चिडचिड व्हायची.....

नीलू अभ्यासाला उठली. फ्रेश होऊन विचार करत बसली.. आता काय करावे बरं!! थंडीचे दिवस असल्यामुळे बाहेर अंगणात अभ्यास करण्यालायक वातावरण तर असावे ना!! काय करावे!!

उठून लाईट लावला तर आणखी मोठी बहीण ओरडणार!! सगळ्यांच्या झोपेचं माझ्यामुळे खोबरं होणार!!! काय करावे! तिला काही सुचेना!!

.. तशातच ती थोडी बाहेर गेली. आणि तिला एक कल्पना सुचली.

बाहेर लावलेला छोटा बल्ब घरात लावला तर!!! कारण स्वयंपाक घरातही अभ्यास करण्यासाठी बसायला पुरेशी जागा नव्हती. आणि ट्यूबलाईटच्या प्रकाशाएवढा छोट्या बल्बचा प्रकाश कमी पडतो.. त्यामुळे बाकी सर्व शांत झोपू शकत होते.

नीलू ने थोडा विचार केला...... आणि आपल्यापेक्षा लहान म्हणजे साधारण दहा वर्षाच्या बहिणीला जागं केलं.. आणि तिला तिच्या मागे यायला सांगितलं.

अंगणातला बल्ब फारच उंचावर भिंतीवर लावलेला होता. आणि ज्या ठिकाणी बल्ब लावलेला होता त्याच्या अगदी खाली एक टपरी बोर्ड भिंतीवर लटकवलेला होता..

कशाचा होता तो बोर्ड? तर तो बोर्ड होता वसुधाताई चालवत असलेल्या बाल मंदिराचा.. रात्री वापरून झालेल्या खोलीमध्ये च सकाळी बाल मंदिर भरायचे.. सर्व तीस-पस्तीस बालके त्या बाल मंदिरात शिकत होती.. परंतु त्या बाल मंदिराच्या बोर्डाने च घात केला... त्या टपरी बोर्डाच्या अगदी जवळून विजेची मुख्य तार गेलेली होती.. आणि त्या तारेवरचं वेष्टन बोर्डाने घासल्यामुळे निघून गेलेलं होतं.. 

नीलू ने बहिणीला पाठीमागून तिला धरून ठेवायला सांगितलं. आणि नीलू घराच्या ओट्यावर उभी राहिली.

वरचा बल्ब काढणार......... तेवढ्यात तिने विजेची तार जिथे वेष्टन निघालेलं होतं, ती पकडली.. आणि जिवंत विजेची तार नीलू च्या मधल्या बोटाला चिकटून पडली. जिवंत विद्युत प्रवाह नीलू च्या शरीरात सरसर प्रवाहित झाला.

नीलू ने एक जोराची किंकाळी दिली.......

तिच्या शरीरात विद्युत प्रवाह वेगाने प्रवाहित होत होता. आणि तो प्रवाह लहान बहिणीच्या शरीरात सुद्धा गेल्यामुळे ती सुद्धा नीलू ला चिकटून पडली..

एका क्षणात नीलू च्या मनात असंख्य विचार सुरू झाले.. कारण आपल्याला माहिती आहे, प्रकाशाच्या वेगापेक्षाही मनाचा वेग किती असतो.. या मनाच्या वेगाची आपण काहीच कल्पना करू शकत नाही..

नीलू ने विचार केला, आपलं शिक्षण आता थांबलं. आपण नोकरी करून वडिलांना आर्थिक बळ देणार होतो... तेही गेलं.... इथपर्यंतच आपल्या जीवनाचा प्रवास होता.... आपण आता जाणार!!?..

पण लगेच तिच्या लक्षात आलं, आपली छोटी बहीण आपल्याला चिटकलेली आहे बहुतेक!!!

तिने जोरात ओरडायचा प्रयत्न केला. आणि म्हणाली तू बाजूला हो! मी आता जात आहे....!!!!! तू बाजूला हो!!!! मी आता जात आहे!!!!!

तिच्या डोळ्यापर्यंत विद्युत प्रवाह गेल्यामुळे तिला दिसतही नव्हते!

परंतु काय आश्चर्य!!!!!

कुणाला काय घडलं हे कळायच्या आत तिच्या वडिलांनी घरातला लाकडी स्टूल आणून जोरात विद्युत तारेवर आदळला....

विद्युत तारेची जोडणी तात्पुरत्या स्वरूपात असल्यामुळे ती खूप दूर तुटून या तिघांसोबत आली आणि नीलू च्या शरीरातला विद्युत प्रवाह लगेच थांबला..

ती उठून उभी राहिली. तिच्या डोळ्यापर्यंत आलेला विद्युत प्रवाह थांबल्यामुळे तिला दिसायला लागलं तिची बहीण तर खूपच कावरी बावरी झाली.. तिलाही कळेना नेमकं काय झालं.....

वडिलांनी दोघींनाही ओढत दूर मागे नेल्यामुळे विद्युत तार तुटून आली. नीलू च्या हाताच्या बोटाला विद्युत तार चिटकल्यामुळे तिला खोल जखम झाली होती..

इथे वडिलांनी जर प्रसंगावधान दाखविले नसते तर.... दोघींचाही विद्युत तारेला चिटकून मृत्यू झालेला असता... वडिलांच्या मायेने दोघींना ही वाचवलं..

नीलू ला दवाखान्यात नेल्या गेलं.. तिच्या शरीरातील त्राण नाहीसा झालेला होता.. तिच्यावर दवाखान्यात उपचार करून ती घरी आली.......

आणि सर्वांच्या तोंडी एकच वाक्य.........

काळ आला होता... पण........

छाया बर्वे राऊत

टीम अमरावती