Login

अदृश्य : तिची भेट

स्पप्नात तिची भेट
           रोजच हे धावपळीच जीवन आणि त्यात
आपण घड्याळाच्या काट्यावर नुसत धावत असतो.
रोजच्या लाईफचा पण कंटाळा येतो कधी कधी,
तेव्हा वाटत मस्त एक दिवस स्वतःला वाटेल
ते कराव आणि एक दिवस तरी मनासारखा
छान जगाव.... कुठेतरी दुर रानात... एकदम
शांत आणि निसर्गरम्य वातावरणात... मस्त
छान वेळ घालवता येईल.... पण मी एकटीच
कशी जाणार ना... म्हणजे सोबत माझी मैत्रिण
तर हवी ना !  तर मीच देवाला रोज प्रार्थना
करायचे.... एकदा तरी आमची भेट होऊ दे ना !
रोजच मनापासून हेच मागायचे... मग आज देव
प्रसन्न झाला अस समज त्याने मला एक दिवसाच
वरदानच दिल तिला भेटण्यासाठी एक दिवस
त्याने मला अदृश्य केल ... आणि आमची भेट
घडवून आणली... मी कुठे आणि कशी तिच्याजवळ
आले मला काहीच माहीत नाही... तिला बघुन
मला खरच खुप छान वाटल. मी माझ टेन्शन
आणि प्रोब्लेम्स सगळे विसरले कारण तिच माझ
सर्व प्रोब्लेम्सवरच सोल्युशन आहे. मग आधी भेटु
तर दे तिला.... तिलाही मला पाहिल्यावर खुप
आनंद झाला... जो तिचा चेहरा सांगत होता...
मी तर तिला तीन वर्षांतुन भेटत होते...
तिने मला जवळ घेतल... एकमेकींना मिठी
मारली खरच किती छान वाटत होत मला सगळी
काळजीच मिटली होती. सगळ दुःखच माझ
विसरून गेले तिला बघीतल्यावर.... दोघीही थोडा
वेळ शांत होतो... काय बोलाव सुचत नव्हत...
पण दोघींच्या डोळ्यांतील अश्रुंनी मात्र सर्व काही
न बोलताही सांगुन टाकल होत.
तिने मला विचारल  " कशी आहेस ?  मी माझे
डोळ्यांतील पाणी लपवत कशी असणार...
तुझ्याशिवाय ?  हे मनात म्हटल पण तिला मी ठीक
आहे.... तुझ सांग म्हणाले....
ती मात्र बोलताना तिचा स्वर हळू झाला...

" तु भेटीलीस ना आता... मग मी ठीक आहे..."
आणि मला खरच खुप आनंद झाला तुला भेटुन..."
ती माझा हात हातात घेऊन मला एका गार्डन
मध्ये घेऊन जात होती.... मी मात्र माझी बॅग
तिच्याकडे देऊन मस्त तिच्या हातात माझा हात
देउन चालत होते... बोलता बोलता आम्ही त्या
गार्डनमध्ये पोहचलो... एकमेकींना तीन वर्षांनी
भेटत होतो... मला किती आनंद झाला ते अस
शब्दांत व्यक्त करता नाही येणार.... तिने मला
जवळ घेतल.... खरच तिला माझ्याविषयीची
काळजी, प्रेम काहिच बदलल नव्हत... मला
पण तिच्यासोबत खुप छान वाटत होत. आम्ही
मस्त गप्पा मारत होतो... तिने मला विचारल
आज अचानक अशी इथे कशी काय मग तिला
सांगितल....

      मला ना रोजच काम आणि धावपळीच जीवन
याचा कंटाळा नाही येत. पण ना कधी कधी
माहीत नाही ग तुझ्याशिवाय खुप एकट वाटत.
मला तुला खुप काही सांगायच होत... तुला माहीत
आहे, या तीन वर्षांत खुप चांगल्या - वाईट, सुख
दुःख आणि आनंदाचे प्रसंग हे सगळच मला
तुला सांगायच होत... पण तु नव्हतीस ना तिथे
हे सगळ सांगायला.... मला तुला बोलायच होत
आणि खुप काही मनातल सांगायच होत...
म्हणुन मी रोज देवाला एकच मागायचे की
" एकदा तरी आमची अशी भेट होऊ दे आणि
बघ आज आपण त्याच्यामुळे भेटलो..."
मला ना तुझी खुप आठवण यायची पण काय
करणार ना , तुलाही माहीत आहे ना.... आपण
एकमेकींशिवाय एक दिवसही राहत नव्हतो
आणि तीन वर्षे झाली ना तु मला सोडून आलीस
आणि काही सांगीतलही नाही... आणि एकतर
आपण एकमेकींना काॅल, मेसेज ही नाही करू
शकत कधीच... निदान एखाद पत्र तेही नाही
मग काय करणार होते ग मी.... देवालाच रोज
मनातल सांगायचे.... मला अस बोलताना पाहून
तिला खुप रडायला आल... मलाही खुप भरून
आल.... दोघीपण एकमेकींना सगळ मनातल
सांगत होतो....
तिलाही मला खुप काही सांगायच होत. ती पण
खुप बोलत होती. इतक्या दिवसांपासून तिच्या
मनात साचलेल सगळ मोकळ करत होती.
आम्ही बराच वेळ खुप गप्पा मारल्या. तिने मला
विचारल.... "  आईबाबा बरे आहेत ना ग  ?
मी काय उत्तर देणार होते... किती आठवण काढतात
बिचारे !   पण मी  स्वतःला सावरत हो म्हटले.
आणि माझे दोन्ही भाऊ.... कस सांगु शकत
होते मी तिला की , ते अजुनही  ' रक्षाबंधन '
आणि  ' भाऊबीजेला ' तुझी आठवण आली की
रडतात म्हणुन.... तीच म्हटली काय झाल ?
अशी शांत का ?  मग मी सांगितल की हो ते
दोघेपण छान आहेत.... मी जात असते त्यांना
भेटायला.... मेत्रिणींविषयी विचारल तर मी
सगळ्या छान आहेत म्हणुन सांगितल आणि
माझ्याबद्दल पण तिने खुप विचारल... गप्पांमध्ये
खुप वेळ  गेल्यावर तिने मला माझ्या आवडीचे
पदार्थ जेवण म्हणुन वाढले आणि तिच्या हाताने
मला खाऊ घातल.... खरच मला खुप छान वाटत
होत... मी पण तिला माझ्या हाताने भरवल...
नंतर खुप मज्जा केली आम्ही... फिरायला गेलो...
पुन्हा दमुन येऊन बसलो.... सोबत चहा घेतला...

       दिवस संपत आला होता. सकाळपासुन आम्ही
एकत्र दिवस घालवला. मी तिला मन भरुन
पाहत होते. तिही मला जवळ घेउन समजावत
होती.... तिने सांगितल की जा तु आता घरी
सगळे तुझी वाट बघत असतील, तुझ्या मैत्रिणी
आणि घरचे टेन्शनमध्ये आले असतील....
आईबाबांना नको ग अस शोधायला लावू तु
वेळेत जा बर घरी.... मला तिच म्हणण पटत होत.
घरी शोधतील, फोन करतील हे तर मला माहीत
होत.... तिच्या हातातला माझा हात सोडवताना
आणि तिला सोडुन येताना... निरोप देताना
मला खुप वाईट वाटत होत. तिला सोडुन यावच
वाटत नव्हत.... खुप रडायला येत होत. आणि
मग तिने मला सांगितल की
" वेडे, अस कधीही एकट नको वाटुन देऊ...
मी नेहमी आहे तुझ्यासोबत अदृश्य रूपात अस
समज..... आणि तुझी ही जी स्माईल आहे ना
मला खुप आवडते.... ती कधीच हरवू देऊ नकोस.
सगळ्यांशी छान राहशील.... काळजी घे स्वतःची.
तिने माझा हात सोडला...  आणि मी ही स्वतःला
मी कुठे आहे अस बघत होते आजुबाजुला...
तर आईच्या आवाजाने मला जाग आली....
अशी स्वप्नात अदृश्य आमची भेट झाली होती.
मला तर खरच तिला भेटुन खुप मनाला छान
वाटल....
    "  देवा, अशी का होईना आमची अदुृश्य रूपात
भेट करत जाशील ना.... हवतर आता जशी तीन
वर्षांतुन झाली तशी का होईना.... तेवढच भेटता
येईल आणि मनातल ही सांगता येईल.... आणि
मला कधीच एकटही नाही वाटणार....!!