अध्यात्म काळाची गरज

अध्याम्याच महत्व पटवून दिले आहे
आध्यात्म काळाची गरज

सध्याच युग म्हणजे कलियुग असे म्हणतात.अगदी मॉडर्न जगतात सांगायच तर सध्याच युग म्हणजे वैज्ञानिक युग आहे. ह्या अशा जीवनात अध्यात्मिकता अंगिकारण्याला बुरसटलेल्या विचारांच असेच म्हटले जाते.
पण खरंच अस आहे का? नाही लागत का आता अध्यात्मिकतेचि गरज. मला तर अस अजिबात नाही वाटत. उलट जर का अध्यात्मिकतेचि जोड जर का वैज्ञानिकतेला मिळाली तर अशक्य ही गोष्ट शक्य होऊ शकते.
"देऊळ बंद" हा मराठी चित्रपट अगदी योग्य अस उदाहरण आहे.
जेव्हा खरच आपण खूप अस्वस्थ असतो तेव्हा धार्मिक पुस्तके मनाला शांती प्रदान करतात. ज्यावेळी खरच आपण खूप मोठ्या संकटात असतो तेव्हा नकळत का होईना आपल्या इष्ट देवतेचे नाव आपल्या मुखात येते. किंवा नकळत का होईना सर्व आपली पाऊले एखाद्या मंदिराच्या गाभाऱ्यात येऊन थबकतात. अशा वेळी इतर कोणतीही गोष्ट आपल्या मनास शांतता प्रदान नाही करत,पण आध्यात्म आपल्याला एक नवी उमेद देत.
अध्यात्म म्हणजे केवळ भजन,पूजन,चिंतन, उपवास हेच नाही तर एखाद्या गरजू ला मदत करणे,वडीलधा ऱ्यांची सेवा करणे,वाईट गोष्टी पासून दूर राहणे.....ह्या मधूनही आध्यात्म साधला जातो.
म्हणचे एका अर्थाने आध्यात्म आपणास वाईट प्रवृत्ती पासून दूर ठेवतो. जस जसा काळ पुढे सरकत आहे तसतसा माणसाची धावपळ वाढत आहे. मग अशा वेळी अध्यात्म च मनाची शांतता आपणास मिळवून देतो.
फार प्राचीन काळापासून आपल्या कडे असे म्हटले जाते कि "पुराणातली वांगी पुराणात" परंतु काळाच्या या ओघाप्रमाणे आज त्याच पुराणातल्या कित्तेक वांग्याच्या म्हणजेच कित्तेक गोष्टीचा आपल्याला उपयोग होतो. परंतु त्याच कोणी वापराचं करत नाही,.
आपली भारतीय संस्कृती खूप प्राचीन आहे. वेद ,शास्त्र,पुराणे ह्यांच्या अमृताने भरलेली आहे.सध्या चा मनुष्य "हे कलियुग आहे" असे म्हणून स्वतःच स्वतःच्या पायावर दगड मारून घेतो.
द्वापार युगात श्री कृष्णाने सांगितल्या प्रमाणे कलियुगा मधील मनुष्य मायेच्या जाळ्यात अडकत जात आहे. त्याच मायेला सुंदर गोंडस असे "कॉर्पोरेट जीवन" असे नाव देऊन त्याच्या मागे पळत आहे. शहरातच नाही तर गावात सुद्धा लोक पैसे, ऐषाराम ह्यांच्या आहारी जात आहे.
रामायण, महाभारत आपल्याला खूप काही शिकवण देते. पण मनुष्य केवळ त्याला करमणूक म्हणून पाहतो. त्यातल्या युद्धाचा केवळ आसुरी आनंद घेतो. त्याच रामायणातल्या हनुमानाची भक्ती, सीतेची एकनिष्ठा, भारताचे बंधु प्रेम, रामाची राजा म्हणून मर्यादा, कैकेयी चे रामाला वनवासात पाठविण्याचे खरे उद्दिष्ट, वचनांची पूर्तता, पित्या ची आज्ञा पालन ह्या सर्व गोष्टी मनुष्य दुर्लक्षित करतो. तसेच त्या सर्वांना आपल्या कुबुद्धी प्रमाणे च नावे ठेवून स्वता: च हास्याचा आनंद घेतो.
महाभारतातल्या श्री कृष्णा ला चोर, पळकुट्या, बाईल वेडा अशी आणि अनेक दूषणे देऊन मोकळा होतो. पण त्याच श्री कृष्णाने असे का केले ह्याचा विचार कधी होताच नाही. भगवान श्री कृष्णाच्या सोळा हजार बायका, श्री कृष्णा माखन,वस्त्रे चोर हे सर्वांना माहित पण त्या मागचे उद्दिष्ट कोणालाच नाही माहित,. श्री कृष्णाने दिलेले अमृत (भगवद् गीता ) ह्याच्या बद्दल आजचा मनुष्य फार कमी बोलेल. त्याच श्री कृष्णाने द्रौपदी चे लज्जा रक्षण केले, कंसाचा सौंहार केला हे आजचा समाज सहज विसरून जाईल. श्री कृष्णाने राधे वरील प्रेमा मधून सुद्धा खुप सुंदर उपदेश दिला आहे. हव्यासापोटी प्रेम मिळवणे म्हणजे प्रेम नाही. हे जर आजच्या समाजाने समजले असते तर ह्या काळात ऍसिड हल्ले झालेच नसते.
कलियुगातील समाजाला सवयच जडली आहे, दुसऱ्यांनी केलेले चुकीचे तेच पाहावे. आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर तर संतांन ची महान अशी पाऊले लाभली. सर्व संतांनी माउली होऊन सांभाळ केला. अभंग, भारुडे, ह्या आणि अशा अनेक साहित्या मधून हेच सांगण्याचा प्रयत्न केला कि जात धर्म हा धर्म नसून मनुष्य धर्म आहे खरा धर्म आहे. संतांच्या गोड़ वाणी मधून भगवंत च मनुष्याला उपदेश करतो. हे कोणी कधी जाणलेच नाही.
खरंच जर का मनुष्याने आजच्या युगात रामायणातल्या लक्ष्मण प्रमाणे आणि द्वापार युगातील अर्जुन प्रमाणे एकनिष्ठ पण दाखवला तर आजचा समाज सुद्धा सहज सर्व आव्हान झेलून एक चांगले आदर्श जीवन जगू शकतो. परंतु आजच्या मनुष्याला सर्व काही लगेच हवे असतो म्हणून तो मांत्रिक, काली जादू करणाऱ्याना शरण जातो परंतु भगवंताला नाही.
एकंदरीत काय तर, अध्यात्म ही खरच आजच्या काळाची गरज आहे.
#कृष्णवेडी
सौ.प्राजक्ता हेदे(बोवलेकर)