अधुरी एक कहाणी 7

Marathi katha

आपण मागील भागात पाहिले की, रोहन अवंतिकाच्या गावातच राहणार होता आणि त्याची बहीण प्रिया ही अवंतिकाची रूम पार्टनर होती.. त्या एकाच रूममध्ये राहत होत्या.. नंतर त्या मैत्रिणींनी अवंतिकाचे सुयशवर प्रेम होते हे सांगितले.. आता पुढे..

"एक दिवस अवंतिका रडत आली.. आम्हाला काही समजलेच नाही.. आम्ही तिला विचारण्याचा खूप प्रयत्न केला.. पण तिने काही सांगितलेच नाही.. मग आम्हीच एकमेकांशी बोलू लागतो.. ती फक्त रडतच होती..

ती नेहमीप्रमाणे सकाळी आवरून सुयशला भेटायला गेली.. त्यादिवशी ती खूप खुश होती.. कारण सुयशचा वाढदिवस होता.. तिने तसे आम्हाला सांगितले होते.. ती दिवसभर सुयश सोबत राहणार होती.. त्यांनी तसे प्लॅनिंग केले होते आणि अवंतिका सुयशला सरप्राईज देणार होती.. त्याप्रमाणे ती आवरून घरातून बाहेर पडली.. तिने सुयशसाठी छान गिफ्ट घेतले आणि ती सुयशला भेटायला गेली..

नंतर त्यांनी दिवसभर खूप एन्जॉय केले.. आता रात्र झाली.. आम्हाला तिची काळजी वाटू लागली म्हणून आम्ही तिला फोन करू लागलो.. तर तिचा फोन बंद होता.. आम्हाला खूपच काळजी वाटू लागली.. तिथे काही झाले असेल काय? असे वाटू लागले.. मग आम्ही सुयशला फोन केला.. तेव्हा मी आज रूमवर येणार नाही तुम्ही निवांत झोपा.. काही काळजी करू नका.. उद्या मी येईल तेव्हा तुम्हाला सारं काही सांगेन असे ती म्हणाली..

असे तिने फोनवर सांगितल्यावर आम्हाला भलतीच काळजी वाटू लागली आणि आमची वाटणारी काळजी ही शेवटी खरी ठरली.. दुसऱ्या दिवशी अवंतिका जेव्हा रूमवर आली तेव्हा ती स्वतःच्या तंद्रीत होती.. आम्ही तिला विचारले तर तिने सांगण्यास टाळाटाळ केली.. मग आम्ही जास्त खोदून खोदून विचारल्यावर तिने सांगितले की, आम्ही फिरायला सुयशच्या फार्महाऊसवर गेलो होतो आणि तिथेच रात्र घालवली.. अगदी मजेत.. आमच्यातील सगळी बंधने आता संपली आहेत.. आम्ही दोनाचे एक झालो आहोत.. आणि आम्ही लवकरच लग्न करणार आहोत..

आम्ही सगळे शाॅक झालो.. कारण आम्हाला हे अपेक्षितच नव्हते.. अवंतिका असे काही करू शकेल याची आम्हाला मुळीच कल्पना नव्हती.. यावर काय बोलावे तेच कळत नव्हते.. आम्ही सगळे शांत झालो.. त्या दिवसापासून अवंतिकाबरोबर आमचे बोलणे कमी झाले.. आम्ही तिच्याशी जास्त बोलत नव्हतो.. कारण आम्हाला तिचा राग येत होता.. तिने सारं काही केलं पण याची पुसटशीही कल्पना सुद्धा तिच्या आईला नव्हती.. तिच्या आईचा तिच्यावर खूप विश्वास होता आणि तिने विश्वासघात केला होता..

त्यादिवशी ती तिच्या तंद्रीतच होती.. तिला कशाचेही भान नव्हते.. सुयश शिवाय तिला दुसरं कोणीच दिसत नव्हते.. त्यादिवशी ती रूम मध्येच होती.. त्या दिवशी कॉलेजला देखील आली नाही.. आम्ही तिघीच कॉलेजला गेलो.. तिचे अभ्यासात देखील लक्ष नव्हते.. टॉपर येणारी मुलगी असे काही वागू शकेल यावर आमचा विश्वास बसत नव्हता.. आम्ही तिला खूप काही समजावून सांगितले पण ती ऐकायला तयार नव्हती..

काही दिवस तिचे आणि सुयशचे प्रेम प्रकरण चालू होते.. कॉलेजमध्ये देखील त्यांचीच चर्चा चालू होती.. काही दिवसांनी अचानक अवंतिकाला उलट्या सुरू झाल्या.. आम्हाला काहीच समजेना.. मग आम्ही तिला दवाखान्यात घेऊन गेलो.. तिथे डॉक्टरांनी चेकअप करून ती प्रेग्नंट असल्याचे सांगितले.. आमची तर पायाखालची जमीन सरकली.. काय करावे? आम्हाला समजेना.. अवंतिका मग हवेतून जमिनीवर आली.. सत्य परिस्थिती समजली आणि ती खूप घाबरली.. ती रडू लागली..

आम्ही तिला खूप समजावून सांगितले.. पण ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती.. ती सारखी सुयशला फोन करत होती.. सुयश काही केल्या तिचा फोन उचलत नव्हता.. ती आणखीन घाबरली आणि घाबरून रडू लागली.. तिला काही करून सुयशला भेटायचे होते आणि सत्य परिस्थिती सांगायचे होते..

अवंतिकाला खात्री वाटत होती की, सुयश बरोबर तिचे लग्न नक्कीच होईल.. पण नियतीचा काही ते मान्य नव्हते.. अवंतिका सुयशला जाऊन भेटली आणि तिने ती प्रेग्नंट असल्याचे सुयशला सांगितले.. सुयशला थोडी भीती वाटली पण त्याचेही मनापासून अवंतिकावर प्रेम होते त्यामुळे त्यांने अवंतिकाशी लग्न करायचे ठरवले.. सुयशला भेटून आल्यानंतर अवंतिका आमच्याकडे आली आणि ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे तिने सांगितले.. आम्हालाही ते ऐकून खूप आनंद झाला.. निदान ती तिच्या आयुष्यात मार्गी लागली इतकंच.. तिच्या आईने तिच्याकडून खूप काही अपेक्षा केल्या होत्या.. पण त्या काही पूर्ण होऊ शकल्या नाहीत..

अवंतिका गावाकडे जाऊन आईला सगळं काही सांगणार होती.. कारण आईपासून तिला काहीही लपवायचं नव्हतं.. परीक्षा संपल्या की ती गावाकडे जाणार होती.. पण त्याआधीच तिने हे सगळं करून घेतले.." हे सगळं सांगताना प्रिया रडू लागली..

"सर, अवंतिका आणि सुयश लग्न करणार होते.. अवंतिका पण खूप खुश होती.. मग तिने आत्महत्या का करावी? हा प्रश्न आम्हाला देखील पडला होता.. मग आम्ही म्हटलं की, सुयश हा श्रीमंत घरचा मुलगा.. त्याच्या आई वडिलांनी कदाचित लग्नाला नकार दिला असेल म्हणून त्यांनी खून केला असेल तर.. म्हणजे अवंतिका प्रेग्नेंट पण होती आणि सारखे लग्नासाठी त्याच्या मागे लागली होती हे देखील कारण असू शकते ना.. अवंतिकाचे असे झाल्यानंतर आम्ही पोलीस कम्प्लेंट करणार होतो.. पण तिच्या आईने आम्हाला अडवले.. कारण त्यांचे म्हणणे होते की, पोलीस केसमध्ये घराची अब्रू जाईल अशी भीती त्यांच्या मनात होती.. म्हणून आम्ही देखील पुढे पाऊल उचलले नाही.. पण काही काळातच अवंतिकाची आई देखील गेली.. त्यांनी अवंतिकाचे खूप काही मनाला लावून घेतले होते.. त्यामुळे त्यांना हार्ट अटॅक आला होता आणि बाकी त्यांच्या पाठीमागे कोणी नसल्याने आम्हालाही काही करता येईना.." जयश्री

"हा सुयश कोठे राहतो? काही माहिती आहे का कुणाला? याचा थांगपत्ता लागायला हवा.. काय झाले असेल? ते आता सुयशच सांगू शकेल.." अमोल
क्रमशः
आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..

🎭 Series Post

View all