आपण मागील भागात पाहिले की, सगळे मित्र बॅग भरून परत जाणारच होते.. इतक्यात अक्षयने फोन करून त्यांना त्याच्या काकांचा नंबर दिला आणि त्यांना त्या आत्म्याविषयी विचारण्यास सांगितले.. त्याप्रमाणे त्यांनी मिस्टर अमोल यांना फोन केला आणि बोलावून घेतले.. आता पुढे..
मि. अमोल हे त्याविषयी शोधाशोध करत असताना एक व्यक्ती तिथे आली आणि मला याबद्दल थोडी माहिती आहे ते सांगू का? असे म्हणाली.. अमोल त्या व्यक्तीला "तुम्हाला जे काही माहित आहे ते सविस्तर सांगा.." असे म्हणाले.. तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, "इथे हॉटेल होण्याआधी ही बिल्डिंग म्हणजे एक होस्टेल होते.. इथे कॉलेजची मुलं-मुली राहत होते.. पण या आवारामध्ये एका मुलीने आत्महत्या केल्यामुळे हे हॉस्टेल बंद पडले आणि त्यांनी ही बिल्डिंग हॉटेलला विकून टाकली.. तेव्हापासून येथे हॉटेल सुरू आहे.. या गोष्टीला साधारण चार वर्षे झाली.. पण ही गोष्ट आता तुम्ही का विचारत आहात? आत्महत्या केलेल्या मुलीचे कोणी नातेवाईक नाही आले इथे चौकशीला.. मग आता तुम्हाला का त्याची गरज पडली आहे.. मला रहावले नाही म्हणून मी तुम्हाला माहिती सांगितली.." ती व्यक्ती
"ती मुलगी कोण होती? हे तुम्हाला माहित आहे का? कुठे राहत होती किंवा तिच्या घरी कोण कोण होते? कोणत्या वर्षात शिकत होती? आणि काय शिकत होती? याची काही तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे आम्हाला तपास करायला बरे होईल.." मि. अमोल
"नाही सर.. तितकी काही माहिती नाही.. पण जेवढं माहिती होतं तेवढं सांगितलोय मी.. हो पण इथे होस्टेल होते आणि ती मुलगी येथे जवळच असलेल्या कॉलेजमध्ये शिकत असावी असा माझा अंदाज आहे.." ती व्यक्ती
"बरं थँक्यू.. पण गरज लागली तर तुम्हाला बोलावून घेतो.. तुमचा फोन नंबर तेवढ द्या.." असे म्हणून अमोलनी त्या व्यक्तिचा नंबर घेतला..
अमोलनी त्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. या कामासाठी त्यांनी पोलिसांची देखील मदत घेतली.. पण तसे कोणत्याही कॉलेजमध्ये आढळून आले नाही. त्यांना हवी तशी माहिती मिळाली नाही.. अशी कोणती मुलगी त्या होस्टेलमध्ये आत्महत्या केली आहे हे त्यांना समजले नाही.. खूप शोधाशोध केली तरीदेखील पुरेशी माहिती हाती लागली नाही.. त्यामुळे सगळेजणच थोडे नाराज झाले. पोलीस केस मध्ये देखील तसे कुठे रेकॉर्ड नव्हते..
शेवटी त्यांना एक कल्पना सुचली.. त्यांनी त्या चार मुलांच्या मदतीने त्या मुलीचे चित्र काढून घ्यायचे ठरवले.. एका ओळखीच्या आर्टिस्ट कडून त्यांनी त्या मुलीचे चित्र काढायला सुरुवात केली.. ती मुले जसे वर्णन करतील तसे तो चित्र काढू लागला आणि बघता बघता चित्र तयार झाले.. चित्र पाहिले आणि सगळेच थक्क झाले.. कारण इतकी मनमोहक, इतकी सुंदर ती, लावण्यवती, जणू स्वर्गातील अप्सरा, काय सुंदर रूप तिचे! इतके सगळे असून तिचे काय झाले असेल? असा मोठा प्रश्न सर्वांना पडला..
जेव्हा ते चित्र काढून पूर्ण झाले तेव्हा चांदण्या लुकलुकत आहेत तसा थोडासा प्रकाश पडला आणि तेव्हाच ती तिथे असेल असे सर्वांना जाणवले.. सगळेजण थोडे घाबरले पण ती काही करणार नाही असा विश्वासही वाटला.. मग त्यांनी परत तपासाला सुरुवात केली..
ते चित्र घेऊन ते प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन चौकशी करू लागले.. शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले.. एका कॉलेजमध्ये तिला सगळेच ओळखले.. मिस्टर अमोल यांना आश्चर्य वाटले सगळेजण कसे काय तिला ओळखले? चौकशीदरम्यान त्यांना समजले की, ती कॉलेजची एक टॉपर होती.. एक लाघवी, सोज्वळ, सुस्वभावी अशी मुलगी होती.. कोणाच्या अद्यात ना मध्यात.. तिचे काम भले ती भले.. अभ्यास करायचा, थोडीशी दंगामस्ती आणि स्वतःचे काम इतकंच.. मग अशी सोज्वळ मुलगी.. तिचे काय झाले असेल? असा पुन्हा प्रश्न पडला..
मनाली मॅडमनी सांगितले की, "अवंतिका नाव हिचं.. खूप सोज्वळ होती.. अगदी कॉलेजमध्ये टॉपर.. पण तिच्या आयुष्यात असा काय घडले असेल काय माहित? की तिने आत्महत्या करून घेतली.. आम्ही पण किती शोधायचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही.."
"मग पोलिस कंप्लेंट का केली नाही?" मि. अमोल
"तिच्या घरच्यांनी नकार दिला म्हणून.." मनाली मॅडम.
"तिच्या घरी कोण कोण असतं? मला त्यांचा पत्ता द्या.. आम्ही तिथे जाऊन चौकशी करतो.." अमोल
"काही माहीत नाही.. फक्त तिची आई तेवढी होती.. ती पण थोड्या दिवसांनी हे जग सोडून गेली.. आत्ता कोण असते? ते माहीत नाही.." मॅडम
"बर ठीक आहे.. मला सांगा त्यांची बॅच कितव्या वर्षी होती आणि अवंतिकाच्या वर्गात किती आणि कोण कोण मुले होती? याचे डिटेल्स मला द्या.." अमोल
"हो सर देते.." असे म्हणून त्या मॅडम खाली स्टाफरूममध्ये गेल्या.. तेथील एका कर्मचाऱ्याकडून त्यांनी अवंतिका ज्या वर्षात शिकत होती त्या वर्षातील तिच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट प्रिंट मारून अमोल यांच्याकडे दिले..
"तिच्या ग्रुपमध्ये कोण कोण होते? याची तुम्हाला काही माहिती आहे का?" अमोल
"तेवढे काही माहित नाही सर.. पण हा राज नावाचा मुलगा कायम तिच्या सोबत असायचा.. त्याचा पत्ता आणि फोन नंबर इथे आहे.. तुम्ही त्याच्याशी संपर्क साधू शकता.." मॅडम
"बरं.. धन्यवाद.." असे म्हणून तो तिथून निघून गेला..
अमोल यांनी राज नावाच्या मुलाला फोन करून संपर्क साधला.. त्याचा फोन लागला मग त्यांनी त्याला भेटण्यासाठी बोलावून घेतले.. राज हा अमोल यांच्या ऑफिसमध्ये आला..
"तू अवंतिकाला ओळखतोस का?" अमोल
"होय सर.. ती तर माझी खूप जवळची मैत्रीण होती.." राज
"मग मला सांग तिने आत्महत्या का केली?" अमोल
"ते मला माहित नाही सर.." अमोल
"ती तुझ्या जवळची मैत्रीण होती ना.. मग तुला कसे माहीत नाही? की तूच काही केलेस नाही.." अमोल
"सर मी काहीच नाही केलं.. आणि मी का असे करेन? आम्ही फक्त चांगले मित्र होतो.. पण एक दिवस काय झाले काय माहित? अचानक तिने आत्महत्या करून घेतली.. आम्ही सगळेच शाॅक होतो.. इतकी हुशार आणि सुंदर मुलगी आत्महत्या का बरं करेल?" राज
"तुझा कोणावर संशय आहे?" अमोल
"कोणावरच नाही.. कारण ती सगळ्यांशी चांगलं बोलायची.. संशय घेण्यासारखं कोणीच नाही.." राज
"मग तिच्या जवळच आणखी कोण?" अमोल
"हो सर.. रोहन तिच्या गावातच राहत होता.. त्याला कदाचित माहिती असेल.." राज
क्रमशः
आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा