Login

अधुरी एक कहाणी 4

Marathi katha

आपण मागील भागात पाहिले की, ते चौघेही एन्जॉय करून रूमवर आले.. रूमवर आल्यानंतर ते टीव्ही पाहू लागले.. इतक्यात त्यांना टीव्हीमध्ये काहीतरी दिसले.. ते पाहून सगळेजण एकदम घाबरून गेले.. घाबरून त्यांच्या अंगावर दरदरुण काम सुटला.. आता पुढे..

सकाळी सगळेजण लवकर उठले.. कारण आता त्यांना परत दुसरीकडे फिरायला जायचे होते.. त्यांना चार दिवसात पूर्ण गोवा फिरायचा होता.. ते एन्जॉय करण्यासाठी आले होते.. त्यामुळे कमी झोपायचं आणि जास्त फिरायचं असे त्यांचे ठरलेले होते.. सगळेजण आंघोळ झाल्यावर जाणारच होते.. प्रशांत, आकाश आणि प्रणित आवरून बाहेर उभे होते.. सुजित कपडे वगैरे आवरून भांग पाडण्यासाठी आरशासमोर गेला.. आरशात पाहत असतानाच त्याला आरशात कोणीतरी दिसले.. ते पाहून तो ओरडला..

सुजितचा आवाज ऐकून सगळेजण धावत आत आले.. "अरे सुज्या, काय झालं एवढं ओरडायला?" प्रणित

"अरे, ती मुलगी.... ती मुलगी.." सुजित

"अरे, काय ती मुलगी... ती मुलगी.. बोल की झमझम.." प्रणित

"अरे, ती बीचवरची मुलगी..." सुजित

"काय सुज्या, तू अजूनही त्या मुलीच्याच नादात आहेस.." प्रशांत

"अरे, ती मुलगी मला या आरशात दिसली.." सुजित

"काय??" प्रशांत आणि प्रणित एकदमच म्हणतात..

"मला पण काल दिसली होती आणि आलेल्या दिवशी सुद्धा तीच मुलगी दिसली होती.. पण माझ्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवलं नाही?" आकाश

"अरे हो... काल पण टीव्हीमध्ये तीच होती.." प्रशांत

"बघा माझं म्हणणं तुम्हाला आत्ता पटतंय.. कालपासून मी सांगतो माझ्यावर कोणीच विश्वास ठेवायला तयार नव्हतं.. आता तर पटलं का?" आकाश

"आता काय करायचं?" सुजित

"काही नाही आता परत जायचं.." आकाश

"इथून जाऊन तरी प्रश्न सुटणार आहे का?" प्रणित

"ते काही माहित नाही.. पण आपण आत्ताच्या आत्ता इथून निघायचं हे नक्की.." आकाश

"बर चालतंय आवरा सामानाची बांधाबांध चालू करा.." असे म्हणून सगळे जण आपापल्या बॅगा भरू लागले..

इतक्यात प्रणितला अक्षयचा फोन येतो..
"काय पण्या.. कशी चालली आहे दंगा मस्ती.. एकदम मजेत ना.." अक्षय

"कसलं काय भावा? एक मोठा प्राॅब्लेम झाला आहे.. आम्ही आता परत येतोय.." प्रणित

"काय? जाऊन एक दिवस झालाय फक्त तुम्हाला.. आणि लगेच परत येत आहात.. काय झालंय?" अक्षय

"अरे, काय सांगू तुला भावा? इथे आम्हाला एक मुलगी दिसत आहे.." प्रणित

"अरे, मग काय भारीच की.. कशी आहे? देखणी आहे की काय?" अक्षय

"मुलगी म्हणजे मुलीचा आत्मा.. मुलगी स्पष्ट दिसत नाही.. आरशात टीव्हीमध्ये किंवा आम्ही कुठे जातो? तिथे आम्हाला दिसते.. त्यामुळे आम्ही जाम घाबरलोय आणि आता परत येत आहोत.." प्रणित

"परत येऊन प्रश्न सुटणार आहे काय?" अक्षय

"मग काय? इथे या कचाट्यात सापडून बसू.. इथे आमचे असे कोणीच नाही.. आम्ही चौघेजणच एकमेकांसाठी आहोत.. सगळेच घाबरलोय.. म्हणून तिकडे येत आहोत.." प्रणित

"मग इकडे आल्यानंतरही तो आत्मा जर तुमच्या मागे लागला तर.. तो तुमच्या बरोबर इकडे येणारच की.. तुम्ही इकडे येऊनही तुम्हाला त्रास होणारच.." अक्षय

"मग काय करू.." प्रणित

"थांब माझ्या एक ओळखीचे काका तिथे राहतात.. त्यांचा आत्म्याविषयीचा अभ्यासही झाला आहे आणि काही पोलीस त्यांच्या ओळखीचे आहेत.. त्यांची तुम्हाला खूप मदत होईल.. मी त्यांचा नंबर तुम्हाला देतो.. तुम्ही तिकडे बोलून घ्या आणि त्यांना याविषयी सगळे सांगा.. ते काय तो शोध लावतील? नाहीतर हा त्रास तुम्हाला पुढे जाऊन काहीतरी अनर्थ घडू शकतो.. जपून राहा.. मी नंबर पाठवतो.. इकडे येण्याची घाई करू नका.." अक्षय

"बरं. त्यांचा नंबर आणि पत्ता मला दे.. आम्ही बघतो काय करायचं ते.." प्रणित

अक्षय प्रणितला काकांचा नंबर आणि पत्ता देतो.. नंतर प्रणित त्याच्या मित्रांशी त्याबद्दल चर्चा करतो.. सगळे मिळून त्यावर चर्चा करतात.. आणि मग शेवटी त्या काकांना बोलायचं ठरवलं.. कारण ते जेथे जातील तेथे तो आत्मा त्यांच्यासोबत येतच राहणार.. त्यापेक्षा काय आहे ते येथेच सोक्षमोक्ष लागू दे? असे ते सगळेजण ठरवतात.. त्यामुळे त्या काकांना बोलून सगळे सांगायचं असे त्यांनी ठरवले होते..

त्यांनी अक्षयच्या काकांना म्हणजे मिस्टर अमोल यांना फोन केला.. फोनवरून त्यांना सगळी परिस्थिती सांगितली.. त्यावर मि. अमोल हे ताबडतोब तिथे येण्यासाठी तयार झाले.. अक्षयची ओळख असल्यामुळे त्यांनी काहीही आढेवेढे न घेता लगेच त्या हॉटेलमध्ये गेले..

हॉटेलमध्ये प्रवेश करताच त्यांना तिथे आत्मा असल्याचे जाणवले.. त्यांनी चारी बाजूने नजर फिरवली.. त्यांना कळाले की तिथे एका स्त्रीचा आत्मा आहे.. त्यांनी पूर्ण हॉटेल फिरून बघितले, नंतर त्या मुलांच्या रूममध्ये ते गेले.. तिथे गेल्यावर त्यांनी त्या चारही मुलांची चौकशी केली.. त्यांच्याकडून सगळी माहिती मिळवली आणि हॉटेलच्या मालकाकडे चौकशीसाठी गेले..

हॉटेलच्या मालकाकडे त्यांनी चौकशी केली की, इथे कोणी आत्महत्या केली आहे का? कुणाचा खून झाला आहे का? पण हॉटेल मालकाने तसे काही नाही असे सांगितले.. इतर ठिकाणीही त्यांनी चौकशी केली पण तसे काही घडले नसल्याचे त्यांना समजले.. नंतर ते चार मुलांकडे गेले व म्हणाले, "बोला काय केला आहात तुम्ही? तुम्हीच काहीतरी केलं असेल.. त्याशिवाय ती मुलगी तुम्हाला दिसणार नाही.. हॉटेलमध्ये तर साठ-सत्तर लोक आहेत.. त्यांच्यापैकी एकालाही तो आत्म दिसला नाही.. फक्त तुम्हाला चौघांना दिसत आहे.. याचा अर्थ काय?" मि. अमोल

"सर आमच्यावर विश्वास ठेवा.. आम्ही तसे काहीच केले नाही.. आम्ही इथे पिकनिकसाठी आलो आहोत.. या भागातील आम्हाला काहीच माहिती नाही आणि इथे तर पहिल्यांदाच आलो आहोत.. मग आम्ही कसे काय करणार?" सुजित

"ते काही माहीत नाही.. पण सगळं सोक्षमोक्ष लागेपर्यंत तुम्ही इथून हालायचे नाही.. आणि यासाठी मी पोलिसांची मदत घेणार आहे.." मि. अमोल

"पण सर.." आकाश

"पण बिन काही नाही.." मि. अमोल

इतक्यात एक व्यक्ती तेथे आली आणि " सर मला काही माहिती आहे याबद्दल.. सांगू का?"

"हो सांगा.. तुम्हाला जे माहित आहे ते.." मि. अमोल

यापुढील भाग आपण पुढच्या लेखात पाहू..
क्रमशः
आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..





🎭 Series Post

View all