Jan 26, 2022
स्पर्धा

अधुरी एक कहाणी 3

Read Later
अधुरी एक कहाणी 3

आपण मागील भागात पाहिले की, चौघेजण गोव्याला जात होते.. मधेच त्यांची कार बंद पडली.. कार दुरुस्त करून गोव्याला पोहोचायला त्यांना रात्र झाली.. थोडा फेरफटका मारून झोपायला खूप उशीर झाला.. सगळे दमले असल्यामुळे पडल्यापडल्या झोप लागली.. पण, आकाशला झोप लागली नाही.. त्यांला आरशामध्ये एक आकृती दिसली.. आता पुढे..

रात्री झोपायला उशीर झाल्यामुळे साहजिकच सगळ्यांना उठायला उशीर झाला.. मग सगळे जण पटापट आवरून बीचवर जाण्यासाठी तयार झाले.. खाली जाऊन ते हॉटेलमध्ये चहा, नाष्टा करून बीचवर फिरायला निघाले.. त्यांची होती त्यामुळे जायला काही वेळ लागला नाही.. बीचवर गेल्यावर त्यांनी मनसोक्त पाण्यात उडी घेतली..

थोडा वेळ पाण्यात पोहून झाल्यावर ते एकमेकांच्या अंगावर पाणी उडवू लागले.. इतक्यात तेथे त्यांना एक सुंदर मुलगी दिसली.. ती इतकी सुंदर होती की हे चौघे तिच्याकडे आकर्षित झाले.. तिचे ते मोकळे सोडलेले केस, गालावर आलेली ती छोटीशी बट, तिचा तो गोरा चेहरा, गालावर एक छोटीशी तीळ अगदी उठून दिसत होती.. काय तिचे अफलातून सौंदर्य?.. त्या सौंदर्यावर ते चौघे जणू फिदाच होते.. चौघे तिच्याकडे टकामका बघू लागले.. त्यांना आजूबाजूचे काहीच दिसेना.. फक्त ती सुंदर मुलगी तेवढीच दिसत होती..

ते चौघेही तिच्याकडे ओढले जात होते.. ती पुढे पुढे जात होती आणि हे तिच्या मागे मागे जात होते.. ती आत समुद्राच्या दिशेने जाऊ लागली आणि हे तिच्याकडे पाहत पाहत समुद्रात जावू लागले.. ती इतकी सुंदर होती की, त्यांना आजूबाजूचे काहीच दिसेना.. आपण कोठे आहोत? हे देखील ते विसरून गेले.. तिच्यापाठोपाठ समुद्रात ते जाऊ लागले.. त्यांना जगाचं भानच राहिलं नाही.. आपण काय करतोय? कुठे जातोय? या सगळ्याचा त्यांना विसर पडला..

पाणी घोट्यापासून गुडघ्यापर्यंत, गुडघ्यापासून कमरेपर्यंत आणि कमरेपासून आता गळ्यापर्यंत येऊन ठेपले तरी ते आतच जात होते.. थोड्या वेळाने पाणी नाकातोंडात जाणार.. इतक्यात त्यांना मोठ्याने आवाज ऐकू येऊ लागले.. कोणीतरी ओरडत होते? आणि आवाज देत होते.. त्या आवाजाने ते चौघेही एकदम भानावर आले आणि पाहतात तर काय ते अगदी गळ्यापर्यंत पाण्यात आपण गेलोय हे त्यांना जाणवले..

ते चौघे भानावर आल्यावर घाबरून गेले.. "आपण असे पाण्यात का आलो?" हा प्रश्न त्यांच्या मनात चालू असतानाच त्यांनी समोर पाहिले तर ती मुलगी समोर नव्हतीच.. "अरे, ती मुलगी कुठे गायब झाली?".. "ती मुलगी कुठे गेली असेल? आणि आपण इतके का तिच्याकडे ओढले गेलो?" असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये चालू होते..

मग ते सगळे पोहत पोहत समुद्रकिनाऱ्यावर आले.. समुद्र किनाऱ्यावर सगळे लोक गोळा झाले होते.. ते त्या चौघांना खूप ओरडत होते.. "अरे, काय मरायचं आहे का? इतक्या आत पोहत जायचं असतं का?" असे एक ना अनेक बोलत होते.. इतके सगळे लोकं बघून ते चौघेही ओशाळले.. काय बोलावे? हेच कळेना..

मग ते कपडे बदलण्यासाठी गेले.. कपडे बदलून आल्यावर ते एकत्र बसले..
"काय यार कसली भारी होती ती?" सुजित

"हो रे.. अगदी अप्सराच.. अहाहा! मी तर तिच्या प्रेमातच पडलो.." प्रणित

"अरे, पण ती मधूनच कुठे गायब झाली? कुठे गेली असेल?" आकाश थोडासा घाबरतच म्हणाला.

"काय माहित रे? आणि आपणही तिच्याकडे ओढलो जात होतो.." प्रशांत.

"नाही रे, ती गेली असेल.. आपणच ती तिथे आहे असे समजून थांबलो.." सुजित

"हो.. तसेच असेल.. चला आता आपण जेवायला जाऊया.." प्रणित

असे म्हणून ते चौघेही जेवण करून परत फिरायला गेले.. त्यांची दंगामस्ती परत सुरू झाली.. त्या दंगामस्तीत ते सगळे विसरुन गेले.. त्यांची दिवसभर मजा-मस्ती करून झाली.. सगळेच खूप आनंदात होते.. खूप दिवसांपासून त्यांना चार पाच दिवस कुठेतरी बाहेर जायचे होते.. ते आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाले होते.. तिथे घरचे कोणी नव्हते, फक्त मित्र मित्र.. खूप छान वाटत होते त्यांना.. जणू स्वर्गसुखच..

एका दिवसातच भरपूर ठिकाणे फिरून झाली होती.. त्यांचे आता अजून तीन दिवस उरलेले होते.. तीन दिवस उरलेले बघू म्हणून सगळेजण रात्री दहा वाजता घरी आले.. रूमवर येऊन चेंज करून ते सगळे बसले होते.. जेवण करूनच आल्यामुळे त्यांना परत बाहेर जावे लागणार नव्हते, त्यामुळे ते चौघेही थोडा वेळ तसेच बसून राहिले.. नंतर टीव्ही पाहण्यासाठी त्यानी टीव्ही लावला.. तर तर काय? पुढे एकदम सगळेच घाबरले..

आकाशच्या हातातून रिमोट खाली पडले आणि ते चौघेही एकमेकांना बिलगून बसले.. ते इतके घाबरले होते त्यांचे अंग घामाने भिजून गेले आणि पाय थरथरत होते.. हे आणखी काय नवीन? हे काय चालले आहे? असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये चालू झाला होता.. आपण जे पाहिले ते खरे तर आहे का? आपल्याला स्वप्न तर पडले नाही ना! असे म्हणत त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि सुजितने लगेच टीव्ही बंद केला..

आकाश घाबरत घाबरतच, "हे काय चालले आहे? भूत तर नाही ना! मी असे ऐकले आहे की इकडे गोव्यात आणि कोकणामध्ये खूप भूत असतात.. हा कुणाचा आत्मा तर नाही ना.. आपल्यालाच का दिसत आहे?"

"छे रे, तसे काही नसते. टीव्ही मध्ये काहीतरी कार्यक्रम लागला असेल. आपण घाबरून बंद केलो.." सुजित.

"अजिबात नाही. हा कोणताही कार्यक्रम नाहीये. मला पक्की खात्री आहे." आकाश.

"मग काय आहे?" प्रशांत

"मला वाटतं कोणाचा तरी आत्मसात आहे तो?" आकाश.

"कशावरून?" सुजित

"माझ मन सांगतय मला तसं.." आकाश

"तुझं मन काहीही सांगेल रे. पण आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचा का?" प्रणित.

"मग इतक का घाबरलात तुम्ही सगळेजण? तुम्हालाही भीती वाटलीच ना!" आकाश

"असे अचानक बघितल्यानंतर कोणीही घाबरेलच.. तो कितीही मोठा माणूस असला तरी.." सुजित.

"काय पण हं? पण तुम्हाला आता पटणार नाही.. एक दिवस तुम्हाला नक्की पटेल.. माझी खिल्ली उडवताय आत्ता. पण जेव्हा तुम्हाला दिसेल तेव्हा कळेल मी काय बोलतोय ते? मला असे वाटते की आपण इथून निघायला हवे.. इथे नको थांबायला.." आकाश

"ए आक्या.. उगीच काय तर बडबडू नको.. गप राहा. मजा करायला आलोय तर मजा करूया.. झोप आता.." सुजित ओरडला.

"जशी तुमची इच्छा. पण अनर्थ काही घडायला नको म्हणून बोललो.. झोपा आता.." आकाश

"काही अनर्थ घडणार नाही.. तू असे बोलणार असलास तर तुझं तू जा.." सगळे त्याला ओरडतात.

"बरं बोलत नाही.. झोपा आता.." असे म्हणून सगळे झोपतात..

टि. व्ही. मध्ये त्यांना कोण दिसत? हे आपण पुढच्या लेखात पाहू..
क्रमशः
आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Priyanka Abhinandan Patil

मनात जे काही येतं ते लिहिते.. मनापासून लिहायला आवडते..