अधुरी एक कहाणी 1

Marathi katha

"अरे यार, परीक्षा संपल्या.. आता काय करायचं?" सुजित

"कुठेतरी मस्तपैकी पिकनिकला जाऊया काय?" प्रणित

"हो हो चालतंय की.. कुठे जायचं? नाहीतर रोज रोज कॉलेज, अभ्यास, होस्टेल करून करून जाम कंटाळा आलाय राव.." प्रशांत

"हो, पण मस्त लांब कुठेतरी चार दिवसांची ट्रिप करायची हं.. सकाळी जाऊन संध्याकाळी वगैरे काही नाही.." आकाश

"हो हो चालेल.. मस्त एन्जॉय करू आपण.. पण घरी काय सांगायचं?" प्रणित

"काहीतरी सांग रे.. त्यात काय एवढं?" सुजित

"बरं सांगेन.. पण जायचं कुठे?" प्रणित

"गोवा.." सुजित आणि आकाश एकदम बोलतात..

"आता तुम्ही दोघेजण तेच बोलताय म्हटल्यावर माझी पण काहीच हरकत नाही.." प्रशांत

"हो मला पण चालेल.." प्रणित

"बरं मग कधी निघायचं?" प्रशांत

"मला काय? कधी पण चालेल? आता निघूया काय?" सुजित

"एवढ्या रात्री.... कोकणातून जायचंय.. म्हणजे घाट किती आहेत माहिती आहे का?" आकाश

"मग कधी जायचं?" सुजित

"आपण परवा दिवशी पहाटे निघूया.. म्हणजे दुपार पर्यंत पोहोचतो.. चार दिवस मस्त मस्त एन्जॉय करू.." प्रशांत

"बरं आता फायनल.. आपण परवा दिवशी पहाटे निघायचं.." सुजित

"मग बाकीची अरेंजमेंट कशी करायची? हो आणि गाडी पण ठरवायला हवी.." आकाश

"गाडीच मी बघतो.. माझा एक मित्र आहे त्याची गाडी घेऊन जाऊया.." प्रणित

"हो.. मग जेवायला आपण बाहेर जाऊ आणि हॉटेल तिथे गेल्यानंतर बुक करू राहण्यासाठी.." प्रशांत

"चालतंय.. मग परवा दिवशी पहाटे सहा वाजता आपण इथून निघायचं.." आकाश

"हो.. चालतंय.. आता फायनल झालंय.. यात काहीच बदल होणार नाही.." सुजित

"होय होय.." सगळे एकदम म्हणाले

सुजित, प्रणित, आकाश आणि प्रशांत हे चौघेही इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होते.. ते वेगवेगळ्या गावाहून शिकण्यासाठी मोठ्या शहरात राहायला आले होते.. शिक्षणासाठी ते कॉलेजच्या हॉस्टेलमध्येच रहात होते.. ते चौघेही एकाच रुममध्ये राहत असल्यामुळे त्यांची छान मैत्री जमली होती.. आणि या तीन वर्षात ते एकदम बेस्ट फ्रेंड झाले होते.. कुठेही गेले तरी ते चौघेच जाणार.. दंगा मस्ती तर त्यांचे ठरलेलेच होते.. पण दंगा-मस्ती बरोबरच अभ्यासही तितकाच जोमाने करत होते.. ते चौघेही टॉपर होते.. पहिल्या दहा नंबर मध्ये त्यांचा नंबर ठरलेला असायचा..

त्यांच प्रत्येक वेळी ठरलेलं असायचं.. फायनल एक्झाम झाली की, कुठेतरी फिरायला जायचे.. पहिल्या दोन वर्षात त्यांनी एक दिवसाची ट्रिप केली होती.. पण तिसऱ्या वर्षी त्यांनी चार दिवस कुठेतरी लांब जायचं असा प्लॅन केला होता.. मग त्यांनी गोवा हे ठिकाण ठरवलं आणि त्यांची तयारी लगबग सुरू झाली.. सगळेजण खूप खुश होते.. चार दिवस नुसता दंगामस्ती करायची असे ठरले होते..

चौघांनीही आपापल्या घरी तसे कळवले होते.. आकाश हा थोडासा घाबरट, प्रशांत आणि सुजित एकदम बिंधास्त आणि प्रणित चेष्टामस्करी करणारा.. असे हे चौघे मित्र वेगवेगळ्या स्वभावाचे असूनही एकत्र राहत होते.. शेवटचा पेपर देऊन आल्यानंतर ते रूमवर येऊन सगळी आवराआवर करू लागले.. कारण पिकनिक वरून आल्यानंतर त्यांना लगेच गावी जायचे होते.. पेपर सगळे सोपे गेल्यामुळे चौघेही खूश होते.. त्यांनी सामानाची आवराआवर केली, बांधाबांध केली आणि जेवण करून झोपी गेले..

दुसऱ्या दिवशी सगळेच थोडे उशिरा उठले.. कारण आज काही कॉलेज नाही, अभ्यास नाही, परीक्षा तर संपली होती.. त्यामुळे निवांत झोपून राहिले होते.. नंतर उठल्यावर आंघोळ करून आवरून नाष्टा वगैरे करून प्रणित मित्राकडे गाडीचा बंदोबस्त करण्यासाठी गेला.. त्याच्या मित्राने अक्षयने त्याला त्याची कार चार दिवसांसाठी दिली.. प्रणितने त्याच्या मित्रांना सांगितले गाडीचा बंदोबस्त झाला.. सगळे खूप खूश झाले.. पिकनिकला जाण्यासाठी बॅग भरू लागले.. कपडे, बाकीचे सामान सगळे बॅगेत भरत होते.. फायनली ते पहाटे सहा वाजता गोव्याला जाण्यासाठी सज्ज झाले..

प्रणितने रात्रीच मित्राची गाडी आणून ठेवली होती.. पहाटे लवकर उठून सगळेजण आवरून तयार झाले.. आता गाडीत बसले आणि गाडी निघाली गोव्याला.. गाडीत बसल्याबरोबर दंगा आणि मस्ती चालू झाली.. लांबचा प्रवास होता त्यामुळे एकेक जण करून थोड्या थोड्या वेळाने गाडी चालवायचे असे ठरवले होते. त्यामुळे ड्रायव्हिंगचे त्यांना काही टेन्शन नव्हते.. सगळे खूप आनंदात होते.. घरातूनही परवानगी मिळाल्यामुळे त्यांच्या आनंदात आणखीनच भर पडली होती.. ते सगळे सुशिक्षित कुटुंबातील होते.. पैशाची काही कमतरता नव्हती.. त्यामुळे मजा मस्ती सारं काही घरच्यांना चालायचं..

दोन-अडीच तासांच्या प्रवासानंतर चहा आणि नाश्त्यासाठी एका धाब्यावर थांबले.. धाब्यावर चौघांनी मिळून नाष्टा केला आणि चहा पिऊन परत पुढच्या प्रवासासाठी निघाले.. हायवेने जात असल्यामुळे लवकरच पोहोचू असा त्यांनी अंदाज बांधला होता.. त्याप्रमाणे त्यांचे ड्रायव्हिंग सुद्धा चालू होते..

पण त्यांच्या वाटेत एक मोठी अडचण आली.. त्यांची गाडी मध्येच बंद पडली.. त्यामुळे ते सगळे खाली उतरले.. गाडी बंद पडली म्हणून सगळ्यांचाच मूड ऑफ झाला..

"अरे यार याला पण आत्ताच बंद पडायचं होतं.." प्रणित

"काय पण्या कसली गाडी आणला आहेस.. चेक करून तर आणायचे.." सुजित

"मी व्यवस्थित चेक करूनच आणली होती.. आत्ता बंद पडली आहे.. मी काय करणार.." प्रणित

"आता या सुनसान जागी कुठे गॅरेज मिळेल? आता काय करायचं आपण?" आकाश

"बघू रे थांब जरा.. घाबरू नकोस.." प्रशांत

क्रमशः
आवडल्यास कमेंट आणि लाईक करायला विसरू नका..




🎭 Series Post

View all