अधूरी एक कहाणी

एक अपूर्ण राहिलेली प्रेम कथा

उन्हाळा संपत आला होता, घरचे सगळे गहन चर्चेत व्यस्त होते!!
या वर्षी दहावी नं??? मग मैथ्स ची कोचिंग आवश्यक आहे!!!
"काही गरज़ नाही" मी नाही या शब्दावर ज़रा जास्तच जोर देत बोलले....
अरे.... नाही कसं???? राणी तुला नाही कळत गं....
आता बोर्डाच्या परिक्षेला बसायचं आहे... आई समझवण्याचा सुरात बोलत होती... पण मी मात्र आपल्या निर्णयावर ठाम होते...
तेवढ्यात बाबा काहीतरी विचार करत उठले... माझ्या जवळ येऊन बोलले "तू एक काम कर... आपल्या कॉर्नर ला त्या दीपक चं सेंटर आहे ना??? तिकडे जाऊन बघ!!! जवळच आहे न?? आणि जर नाही पटलं मनाला तर जाऊ नकोस... त्याचाकडे पैश्याची काही काळजी नाही.. इतके वर्ष आपण एकाच जागी राहतोय....
हा विचार मला पटला.... मी आनंदी होते कि एक दोन दिवस जायचं नाटक करून बंद करेन.... कारण एकच मला असं अजिबात वाटत नव्हतं कि मला बाहेर कुठेही कोचिंग करायची गरज़ आहे , नवव्या वर्गात पण माझे 85% आलेले स्वता अभ्यास करून, मग दहावी ला आई-बाबा इतके कायं घाबरत होते माहित नाही....
असो..... तर झालं असं कि मी छान कोरी-करकरीत वही आणली, एक Reynold jetter पेन घेतला अण बरोबर 5 वाजता त्या सेंटर ला दाखल झाले....
पहिल्यांदा कोचिंग हा शब्द समझायचा प्रयत्न करत होती..... algebra आणि trigonometry  दोन्ही शिकवायला वेगळे-वेगळे टीचर होते..... पहिला दिवस तर आवडला बुवा..... घरी आले आणि लहान बहिणीला सगळं सांगितलं, आई-बाबा खुश झाले.
कायं मैडम??? बरं वाटतयं ना?? सरांना तर नाही शिकवलं न एकाधं गणित???? बाबा मसखरी करत म्हणाले.... मी नुसती हसत होती, मनात ठरवलं "एक आठवडा" बस्स , त्यानंतर घरीच अभ्यास......
एक,दोन,तीन,चार.... करत करत 15 दिवस झाले आणि मला फार-फार मज्जा येत तिथे, वेगळच वातावरण असे, आम्ही मुलं-मुली सगळे सोबत बसायचो आणि क्लास झाल्यावर मस्त गप्पा मारायचो... कोण कुणाला आवडतं, कोण कुणाच्या शेजारी बसायची धडपड करत असतो..... असंच सगळं... मजेत दिवस जात होते, मला गणित या विषयात फार रूची नाही, चांगले मार्क पडायचे कारण मी मेहनत फार करत पण इंटरेस्ट फक्त सायंस मधे होता.....
असं सगळं सुरू असतांना एक दिवस माझं अचानक लक्ष गेलं.... सगळ्यात शेवटच्या बैंचवर एक मुलगा बसला होता... खाली मान घालून... तो कुणाशीही बोलत नव्हता..... शांतपणे बसला होता... मी त्याचाकडे आश्चर्याने बघत होती इतर सगळे गप्पांमधे रमले असतानां हा इतका वेगळा कसा बसू शकतो????
प्रीति ला विचारलं  "काय गं हा कोण"????
अरे हा तुझा समोरच्या घरात भाड्याने राहतोय सध्या, वडील आजारी असतात... आई वकील आहे... एकटाच मुलगा आहे...
ओह्हह.... सो सैड ना.... मी बोलले... अण त्याला बघत बाहेर पडले...
नंतर बरेच दिवस तो मला क्लास ला दिसायचा पण सदैव चुप रहायचा... ना कोणी मित्र... ना मैत्रीण...
पण त्याला पाहिलं कि मला काहीसं वेगळं वाटे, असं वाटे कि एकदा त्याचाशी बोलावं, विचारावं "असं काय झालयं कि तू कोणालाच सांगत नाही"....
दिवस जात होते आम्ही सगळे अभ्यासात आणि त्यानंतर गप्पांमध्ये वेळ घालवत होतो
मी क्लास ला एंटर झाल्यावर सगळ्यात पहिले त्याचाकडे बघत असे... का जणू का पण तो नाही दिसला कि मला करमत नसे...
ही भावना कशी आणि केंव्हा निर्माण झाली कळलंच नाही... याला काय म्हणावं हे ही कळत नव्हतं... तो होता पण तसा.... शांत, सौम्य, निरागस, कमी बोलणारा... एक अनावर ओढ माझा मनात उत्पन्न झालेली होती, वय पण तसंच होतं नं.... या भावनेला काही नाव नसतं हो... "मी पहावे तू दिसावे
पारणे या मनाचे फिटेना"
पण या माझ्या मनातल्या भावना होत्या, असं करत करत 6 महीने गेले, एक परीक्षा आटोपली, रिजल्ट आला, मला 70% पडले, आणि त्याला 95%
आता मात्र मी नर्व्हस झाले... काहीतरी चुकतयं आपलं... या अश्या रोजच्या गप्पा आणि असा वेळ फुकट घालवणं बंद केलं पाहिजे आता, बोर्डाच्या परिक्षेला 6 महीने राहिले होते, मन लावून अभ्यास करणं गरजेचं आहे... या सगळ्या विचारात असतांना मी आजारी पडले.... काविळ झाली होती... मग काय विचारता?? इतकी भयंकर होती ती काविळ कि माझे प्राण वाचले हेच पुरेसे.... क्लास बंद झाला... मी 2 महीने झोपून होते... पुस्तक हातात घ्यायची शक्ती पण अंगात उरली नाही... डॉक्टर काका ओळखीचे म्हणून एडमिट करावं लागलं नाही पण रोज तीन वेळा ग्लूकोज द्यावं लागे... कोचिंग चे सगळे मित्र-मैत्रिणी भेटायला येऊन गेले पण........
तो काही आला नाही... मला रोज एकदा वाटे... तो समोरच राहतो, एकदा बालकनीत जावं आणि त्याला पाहावं.... कधी-कधी त्याचा रागं येई कि असा-कसा मुलगा आहे हा जो एक कर्टसी विजिट पण करू शकत नाही..... वाईट वाटायचे फार.. पण काही इलाज नव्हता !!!! दिवस भराभर जात होते... आता मी अंथरूण सोडलं होतं तरीही बाहेर जात नसे... कधीही गळाठा येण्याची शक्यता होती....
अशातच एक दिवस मी रेडिओ ऐकत असतांना चेंडू बालकनीतून आत आला... समोरून मुलांचा आवाज आला " बॉल दे दो प्लीज" मी उठायचा आत लहान बहिण उठून बॉल देऊन आली... 5 मिनिटाने पुन्हा तो चेंडू आत आला.. आता ती चिडली... बॉल फेकून ओरडली
"अबकी बार आई ना तो वापिस नही मिलेगी"
10 मिनटाला खेल थांबला पण त्यानंतर पुन्हा तेच... बॉल आत आल्याबरोबर मला काहीतरी वेगळं वाटू लागलं, मी संपूर्ण ताकत लावून उठले.. लहानी ओरडली "अरे तय्यु"...... कुठे चालली?? मी ऐकून पण न ऐकल्यासारखं केलं, एक-एक पाऊल टाकत बालकनी पर्यंत पोहचले... समोर पाहले तर तो माझी वाट पाहत उभा होता.... मुलांना सारखा बॉल टाकायला तोच सांगत होता, खरं सांगू त्याला पाहून जे काही मला वाटलं त्याला कोणत्याही भाषेत शब्दंच नाही , तो ही लालबुंद झाला होता, मावळता सूर्य जास्ती प्रखर होता कि तो?? हे ठरवणं कठिण झालं होतं.... दोन मिनटाने मला गरगरायला लागलं, मी पडणार तेवढ्यात बहिणीने मला आधार दिला, पण त्या दिवशी सारखी झोप मागच्या तीन महिन्यात लागली नव्हती....

दिवस जात राहिले आता मी बरी झाले होते... ठणठणीत नाही पण उठून उभं राहण्याची शक्ती आली होती...
एक दिवस समोरच्या चाचीजी भेटायला आल्या....
इतर सगळ्या पंचायती , विचारपूस, प्रेम-प्रकरणं आईला सांगून झाल्यावर आईने सहज त्यांना विचारलं
क्यूं बहनजी वो आपके किराएदार कहां गये????
ती धाराप्रवाह बोलत होती तरीपण माझा कानांना ते ऐकायची उत्सुकता होती... मी लक्ष तिच्या बोलण्यावर
केंद्रित केलं
" क्या बताऊं भाभी बिचारे अभागे थे, आदमी तो आंख से अंधा था, औरत वकीली करके चार पैसे लाती थी, बेटा होनहार था, अरे...अपनी बिटिया के साथ ही पढता था नं"???
आता मी कान टवकारले... ती पुढे काय सांगतेय हे ऐकायला माझं काळीजंच कानात आलं होतं... ती अखंड बडबडत होती....
"कैंसर हो गया बिचारे आदमी को ,ऑपरेशन करने बडे शहर ले गये पर नही बचा पाये, अब दोनो मां बेटे गांव चले गये है मामा के पास..... बिचारा लडका....
मला धस्स्सस झालं, हे काय होऊन बसलं त्या कोवळ्या जीवाच्या आयुष्यात.... 16 वर्षाचं वय आणि वडील नाही... असह्य होतं हे.....
चाची पुढे बोलत होती..... अरे पिछले 3-4 महीने से तो वो लडका भी अजीब सा हो गया था.... दिन-रात बालकनी से आपके घर में देखता रहता था!!!!!!!!!!!

मी आश्चर्याने तिच्या कडे बघत होती... तिची बडबड सुरूच होती... पण आता मला काहीच ऐकू येत नव्हतं... "आपके घर में देखता रहता था"........
बस एकच वाक्य माझ्या मनात घुमत होतं, माझ संपूर्ण शरीर रोमांचाने थरथरत होतं, त्याचा भोळा चेहरा आता माझा नजरे समोरून हटत नव्हता... मी हसू कि रडू हेच कळतं नव्हतं....... दुसऱ्या दिवशी......
मी उठले.... ठरवलं कि एकदा त्याचाशी बोलणार....
त्याचा पत्ता लावणार....
संध्याकाळी 5 वाजता बरोबर
मी क्लास मधे शिरले... त्याची जागा रिकामी होती...... काळीज चरचरत होतं... एक मुलगा जो नेहमी त्याचा शेजारी बसायचा... मी त्याला हाक मारली.....
तो लगेच आला मी काही विचारण्याचा आतं त्यानी मला माझी मैथ्स ची नोटबुक दिली...." ये लो आप भूल कर चली गयी थी उस दिन".....
मला आठवलं कि ज्या दिवशी तब्येत बिघडली त्याचा आधल्या दिवशी माझी मैथ्स नोटबुक सेंटर मधे राहून गेली होती.....
अरे पर ये तो गुम हो गयी थी... सर ने बताया था... मी उत्तरले...
"नही... गुम नही हुई थी ये मयंक को मिली थी... और जब उसे पता चला कि आप बीमार हो तो वो रोज आपके लिये नोट्स लिखता था"
"ठीक होने के बाद आपसे मिलने वाला था"... पर अचानक.....
हम्मम.... पता है.. मी त्याला टोकलं....
पुढे काही न बोलता ती मैथ्स नोटबुक घेऊन चुपचाप निघून गेले......  आता माझं मन माझाशी बोलत होतं.....
त्याचं बालकनीत तासनतास उभं राहणं, माझी तब्येत खराब असतांना अभ्यास पूर्ण करून देणं हे सगळं फार-फार वेगळं आहे, मी मनातल्या मनात हसत होती, लाजत होती आणि असं का होत होतं????पण जे काही होतं ते मनाला स्पर्श करणारं होतं..... ते निरागस डोळे तो चेहरा ते स्मितहास्य त्यानी  मलाच माझापासून हिरावून नेलं होतं , ते माझं पहिलं प्रेम होतं......
"ती मैथ्स नोटबुक" नुसतीच वही नसून त्याचं प्रेम आहे त्याचा अव्यक्त भावना आहे हे मला कळलं होतं.... तो पुन्हा कधीही मला भेटणार नव्हता..... मला हे माहित होतं..........

पण..........


आजही त्या वहीत लिहलेली त्याची राइटिंग मला त्याची आठवण करून देते..... तो न झालेला स्पर्श, ती न मारलेली मिठी , ते अबोल संवाद सगळं-सगळं आजही माझं मन मोहरून टाकतं, आणि कुठेतरी कोणत्या कोपऱ्यात तो ही हेच अनुभवत असेल असं वाटतं.........