Login

अधुरे प्रेम अंतिम भाग ३

लघुकथा
एक अधुरी प्रेम कहाणी

भाग/३
अंतिम भाग


राघवने गावातच एका दवाखान्यात प्रॅक्टिस सुरू केली आणि वृंदाचे शिक्षण होईपर्यंत तिची वाट बघण्याचे ठरविले. बघता बघता दोन वर्षं निघून गेली. प्रेमाच्या सहवासात राहिल्यानंतर ते आता ऋणानुबंधनात अडकणार होते. कायमचे एकरूप होऊन नवीन सहजीवनाची सुरवात करण्यासाठी ते आतुर झाले होते.

पण, अचानक असे काय घडले की ते लग्नच करू शकले नाही.



"तू मला काहीही न सांगता कुठे गेला होतास?"

तिचा प्रश्न त्याच्या हृदयाला भिडला.

"मी नाही गेलो. तूच अमेरिकाला गेली ना!

"अरे,पण मी तुझ्यासाठी निरोप ठेवून गेले होते. मी जेव्हा तुला ही गोष्ट सांगण्यासाठी आले होते. तेव्हा तू घरी नव्हता. तुझ्या घरी दुसरच कोणीतरी होते. त्यांनी मला नीट सांगितले देखील नाही. की तू कुठे आहेस? कधी येणार आहे? त्यानंतर तू मला आजपर्यंत भेटला देखील नाहीस किंवा फोन देखील केला नाही आणि मी फोन करत होते तर तू उचलला देखील नाही.

"अगं, मी सुद्धा तुला फोन केला होता. पण, लागलाच नाही."

" हो कारण मी तुला ब्लाॅक केले होते. मला तुझा अतिशय राग आला होता. तू मला काहीही न सांगता कुठे गेला होतास? "

" हो त्यानंतर मी नाही करू शकलो तुला फोन! कारण, ज्यावेळी मी आपल्या प्रेमाविषयी सगळ्यांना सांगणारच की त्याचवेळी माझ्या आईची तब्येत खराब झाली आणि चांगल्या ट्रीटमेंटसाठी तिला शहरात न्यावे लागले आणि आम्हांला तिथे बरेच दिवस राहावे लागले. त्या गडबडीत फोन करायचा राहून गेला. पंधरा दिवसांनी परत सांगायचा प्रयत्न केला. पण, आईची तब्येत म्हणावी तशी ठीक नव्हती. तिला स्वतः ला सूनेच तोंड बघायची घाई झाली होती. त्यामुळे आईनेच नात्यातल्या एका मुलीशी माझे लग्न ठरवले. मला काही बोलायलाच मिळाले नाही. नाईलाजाने मला शालिनीशी लग्न करावेच लागले. साॅरी वृंदा. "
"पण, मी फक्त दोनच वर्षांसाठी गेली होती. तू तेवढा पण थांबू शकत नव्हता का?"

"अगं, तेव्हाची परिस्थिती अत्यंत कठीण होती. मला आईची तब्येत महत्वाची होती. त्यामुळे माझा नाईलाज झाला होता. आपले प्रेम फक्त नावालाच राहिले ग."

" तू सध्या कुठे आहेस?"

"मी गावातच अत्याधुनिक सोयीसुविधा असलेलं मोठं हाॅस्पीटल उभे केले आहे. तिथेच मी नवीन घर देखील बांधले. तू आली की नक्की ये घरी आणि हे शालिनीचे माहेर आहे. योगायोगाने ती तुझ्याच दवाखान्यात ॲडमिट झाली. त्यामुळेच आपली भेट झाली. "

हम्म....

" राघव , मी तुला खूप मिस केले रे ! तू मला इगनोअर केल्यामुळे मला देखील घरी काहीच सांगता आले नाही. शेवटी मला देखील आलेल्या स्थळाला नकार देताच आला नाही आणि मी डॉक्टर आकाश सोबत लग्न केले."

"ही गोष्ट आपल्या दोघांसाठीही सोपी नव्हती.‌ आपले प्रेम एक स्वप्नच राहिले. आपल्या प्रेमाची अधुरी कहाणी नेहमी करीताच अधुरी राहिली. आयुष्य खूप सुंदर असतं न. पण, कोणाच्या आयुष्यात काय आणि केव्हा कलाटणी मिळेल ते सांगताच येत नाही.
त्यामुळे आपले प्रेम आणि आठवणी फक्त आपल्या पुरत्या ठेवू या. आपण पुन्हा एकमेकांसमोर आल्यामुळे मनात फार चलबिचल सुरू झाली आहे.

" राघव, आता आपल्याला सावरायला हवं. आपल्यासाठी आपण फक्त अनोळखी चेहरे म्हणून समोर आले पाहिजे. तू माझा एक चांगला मित्र म्हणून नक्कीच राहू शकतो. आपल्या प्रेमाची आपण केव्हाच तिलांजली दिली आहे. आता आपल्या वाटा वेगळ्या आहेत."

"हो तू बरोबर बोलत आहेस. नक्कीच मी तुझा चांगला मित्र म्हणून राहिलं. कारण, आपलं नेहमी नेहमी भेटणं योग्य नाही. यामुळे आपल्या कुटुंबात वादळ यायला वेळ लागणार नाही. तेव्हा आपण दूर राहिलेलेच बरे. आपण एकमेकांवर जीवापाड प्रेम केले. पण, आपल्या प्रेमाची अधुरी कहाणी आज इथेच समाप्त करू या."

बाय म्हणत तो केबिनच्या बाहेर निघून गेला.

समाप्त......

©®सौ.आश्विनी सुहास मिश्रीकोटकर
0

🎭 Series Post

View all