अधुरे प्रेम भाग २

लघुकथा


वृंदा आपल्या लग्नाला आता पाच वर्षं होत आली. आपण पुर्णपणे सेटल झालेले आहोंत. तेव्हा आपण आईबाबा होण्याचा विचार करायला हवा. आपली फॅमिली व्हायला हवी. माझे आईबाबा आणि तुझेही आईबाबा या क्षणाची आतुरतेने वाट बघत आहेत. तुला काय वाटतू. तू त्यासाठी तयार आहेस ना?" आकाश बोलू लागला.

वृंदा थोडीशी लाजली आणि चेहराही आनंदाने फुलला असे भासवत ती खोलीत निघून गेली.

मोठ्या आनंदाने आकाशही तिच्या मागोमाग गेला.

पाहू या पुढे काय होते.

एक अधुरी प्रेम कहानी

भाग/२

मोठ्या आनंदाने आकाशही वृंदाच्या मागोमाग खोलीत गेला आणि तिच्या कमरेत विळखा घातला आणि तिचे चुंबन घेत तिला स्पर्श करू लागला. त्याच्या स्पर्शाने ती मोहरली आणि नकळत का होईना दोघे एकरूप होऊन गेले.

खरंतर तिलाही आई व्हायचे होतेच. पण, अजुनही भुतकाळातून ती पुर्णपणे बाहेर पडली नव्हती. तिने स्वतः चा भुतकाळ आकाशला सांगितला होता. तरीही त्याने तिला मनापासून स्वीकारले होते. सतत काहीतरी विचार डोक्यात घोळत असायचे. पण, आयुष्यात काही गोष्टींचा विसर पडलेलाच बरा असतो आणि दुसऱ्या दिवशी परत पेशंट तपासायचे आहे. याच विचारात ते झोपी गेले.

नेहमीप्रमाणेच दुसऱ्या दिवशी सकाळी ‌उठून आपापल्या कामाला निघून गेले. वृंदा केबिनमध्ये येताच तिच्या केबिनचे दार वाजले.

"मॅडम,आत येऊ का?"

कुठेतरी आवाज ओळखीचा वाटला. कोणाचा आवाज आहे ? असा विचार करत मेंदूवर ताण देऊ लागली की परत दार वाजले.

"मॅडम आत येऊ का?"

हो ,या.

त्याला बघताच ती बुचकळ्यात पडली. हा राघवच आहे ना. दोघांनीही एकमेकांकडे बघीतले.

राघव तू. तू इथे कसा?

"मी बर्फी द्यायला आलो तुम्हांला."

म्हणजे.

"हो शालिनी माझी बायको आणि तुम्ही तिची काळजी घेऊन डिलीव्हरी केली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद."

"अरे, अहो जाहो काय? आपण दोघे तर.!

तिचे बोलणे पूर्ण व्हायच्या आतच तो बोलला, "तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता सर्व बदलले."

"हो, तेही खरेच आहे की!"

पाच वर्षांनंतर ती दोघे एकमेकांसमोर आली होती. तेही अशा प्रकारे.‌ आणखी काय बोलावं दोघांनाही काहीच सुचत नव्हते. पण, दोघांनाही अनेक प्रश्न पडले होते आणि त्यांची उत्तरे त्यांना एकमेकांकडून हवी होती.

दोन वाजता. वृंदा बोलली.

काय ?

*दोन वाजता भेटू यात का? "

"हो चालेल ना? "

राघव सुध्दा अधीर झाला होता तिला भेटण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी.

बरोबर दोन वाजता तो तिच्या केबिनमध्ये आला. तो येताच तिने काॅफी सांगितली. बाहेर कुठे जाऊन बोलण्यापेक्षा ही जागा जरा सेफ वाटली.

दोघांनाही मन मोकळे करायचे होते. बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या. पण, काही क्षण दोघेही निःशब्द हौते.‌

त्यांच्या प्रेमाची अधुरी कहाणी त्यांच्या डोळ्यासमोर दिसू लागली. एकमेकांच्या मिठीत घालवलेले ते सोनेरी क्षण, गप्पा,भांडण, रुसवा सगळं काही ती अनुभवू लागली.

राघव आणि अलका दोघेही एकाच काॅलेजमध्ये शिकत होते. अलका आणि राघव दोघेही मेडिकलचे शिक्षण घेत होते. फक्त राघव तिच्या दोन वर्षे पुढे होता. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांची भेट व्हायचीच. अनेकदा तर कॅन्टीन मध्ये ते भेट असतं. त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात कधी झाले कळलेच नाही. सुट्टीच्या दिवशी तर ते तासनतास एकमेकांसोबत वेळ घालवत असत. एकदा प्रॅक्टिस सुरू झाली की मग दोघांनीही आपापल्या घरी सांगायचे ठरविले होते.

राघवने गावातच एका दवाखान्यात प्रॅक्टिस सुरू केली आणि वृंदाचे शिक्षण होईपर्यंत तिची वाट बघण्याचे ठरविले. बघता बघता दोन वर्षं निघून गेली. प्रेमाच्या सहवासात राहिल्यानंतर ते आता ऋणानुबंधनात अडकणार होते. कायमचे एकरूप होऊन नवीन सहजीवनाची सुरवात करण्यासाठी ते आतुर झाले होते.

पण, अचानक असे काय घडले की ते लग्नच करू शकले नाही.

पाहुया पुढच्या भागात.

©® अश्विनी सुहास मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all