अधुर प्रेम (भाग १)

प्रेमाचं दुसरं नाव म्हणजे त्याग


शौर्य आणि सिया दोघे कॉलेजपासून मित्र होते. त्यांनतर नोकरी साठी सुद्धा एकाच ठिकाणी इंटरव्यूला गेले आणि दोघं पण सिलेक्ट झाले.

ऑफिस मध्ये त्यांची मैत्री हळूहळू सगळ्यांना माहीत झाली. तिथे त्याचे अजून काही मित्र झाले. असेच एक दिवस जेवणाला बसले असतांना साहिल म्हणाला,

" शौर्य.... अरे, मला काही तुमची मैत्री वाटत नाही."

त्यावर लगेच सिया हाथ पुढे करून म्हणाली,

" कोई शक?"

त्यावर तिची मैत्रीण  प्राजक्ता म्हणाली,
" अगं म्हणजे आम्हाला म्हणायचं आहे तुम्ही मैत्रीच्या पुढे गेलात!"


" कळलं नाही, प्राजक्ता तुला काय म्हणायचं आहे."

त्यावर साहिल हसत म्हणाला,
" शौर्य तू लहान नाहीस ,तुला एवढं फोडून सांगायला."


" अरे पण!"

तेवढ्यात बॉसचा बुलावा आला..

“ शौर्य सर आणि सिया मॅडम तुम्हाला सरांनी  केबिन मध्ये बोलावलं आहे, या प्लिज..."


" गणू काही विशेष का रे?"


" माहीत नाही सर..या तुम्ही."

" हो तू जा आलोच."

साहिल लगेच म्हणाला,
"बहुतेक गोवा ट्रीप आहे तुमची यावेळी."

" काय?"

दोघेही एकदम म्हणाले.


" अरे! जरा हळू. ऑफिस आहे हे."


"हो ...माहीत आहे, शौर्य चल उठ लवकर..तू ना खूप खादाड आहेस."

" हो आहे मी खदाड तुझ्यासारखा नाही मी डायटिंग करत...फक्त सलाड..कधी हे तर कधी ते "

" अरे भांडत काय बसलात, जा पटकन आणि या लवकर बाहेर."


दोघे केबिन मध्ये गेले.

" मे आय कम इन सर?"


" ओह! येस कम इन.. कम इन.. प्लिज."

" थँक्यू सर."

"तुम्हाला सहा महिने झाले असतील दोघांना इथे नाही का?"


शौर्य ....सियाकडे बघत


" हम्म! झाले असतील?"

" झाले असतील म्हणजे? सॅलरी जमा झाली आहे ना बँकेत ?"

सियाने शौर्यकडे रागाने बघितलं आणि सरांकडे हसून म्हणाली,  "सर....आम्हाला आता सहा महिने, तीन दिवस आणि चार तास पस्तीस मिनिटे झाली."


" अरे वा! याच गोष्टीने मी इंप्रेस झालो."


तुम्हाला एक आनंदाची  बातमी सांगायची आहे. गोव्याकडे एक सगळ्या ब्रांच मिळून प्रोग्राम आहे तिकडे आपल्या ऑफिस मधून दोघांना जायचे आहे, तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल , तुमची तयारी असेल तर बिन्धास्त बोला...नो प्रॉब्लेम."

" सर! मी रेडी आहे.."


"सिया तू?"

"सर, मी घरी बोलते आणि मग उद्या सांगते सर."


"ओके नो प्रोब्लेम."

दोघे बाहेर आले.

"ऐ काय झालं सांगा ना? गोवा का?"


" हो... येस!"

"आणि बाय द वे सिया सरांना सेकंड पण सांगायचे ना किती होते!"

" सांगितले असते पण... ते चेंज होतील म्हणून नाही बोलले.."

आणि तिने त्याला डोक्यावर मारलं.

" बरं मग कधी जायचं आहे...करा मस्त दोघे एन्जॉय."

" नाही.... अरे , मी घरी विचारते आधी...मग ठरवते."

" अगं ही संधी परत नाही मिळणार."

" हो ....अरे पण!"

ऑफिसचं काम सुरू झाले. संध्याकाळी सहा वाजले ऑफिस सुटायची वेळ झाली. सियाने पर्स उचलली आणि निघाली मागून शौर्य आला

" सिया सिया...थांब ना गं."


" बोल काय म्हणतोस?"

" अगं चल ना प्लिज गोवा."

ती हसली आणि निघून गेली.

ती घरी गेली तिने सगळं घरी सांगितलं आणि घरून परमिशन सुद्धा मिळाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिस मध्ये ती जरा  उशिरा पोहचली. ती दिसता बरोबर  साहिल, प्राजक्ता आणि शौर्य तिघे तिच्या जवळ येऊन उभे राहिले.


तिने तिघांकडे बघितले त्यांच्या डोळ्यात तिला प्रश्न दिसले....ती हळूच म्हणाली,


"येस"...


ते ऐकल्या बरोबर शौर्यने तिला मिठी मारली.


आणि लगेच बाजूला सरकला, साहिल आणि प्राजक्ता दोघे हसले.

क्रमशः...
©®कल्पना सावळे

🎭 Series Post

View all