अधिकमास

Adhikmas is very pure month in the traditional thing,in this month daughter and her husband is very important to do some traditional process...

अधिकमास...

काजल आज लवकरच उठून लगबगीने कामे आवरत होती,रोजच्या पेक्षा आज उल्हास जरा जास्त होता...का नसणार आई चा फोन आलेला अन् आई ने काजल व काजलच्या पतीला अधिकमास आहे म्हणून बोलावले...काजल ही माहेरी जायचे म्हणून फारच आनंदी होती...माहेर म्हटलं की कधी जाते अन् कधी नाही असे होते...

काजल ने पतीला चार पाच दिवसा आधीच माहेरी जाण्याची कल्पना दिली होती,काजल चा पती म्हणजेच फारच निकद्री माणूस...तो केव्हाच बायको ला माहेरी जाऊ देत नव्हता..काजल चे माहेर जणू तोडण्याच्या मागे लागला होता...काजल पण पतीचा स्वभाव चांगलीच ओळखून होती...

काजल च्या माहेरी जायचे म्हटले की त्याचा पाराच चढून जायचा...परंतु काजल ला माहेर तोडावे वाटत नव्हते म्हणून तिने काहीही झाले तरी या अधिकमासात माहेरी जाण्याचे ठरविले...

परंतु यावेळी तिने पतीला कसेबसे माहेरी जायला पटवले होते,अन् पती तयार झाला होता पण मध्येच सासूबाईंनी पिन मारली ...

अधिकमास म्हणजे जावयाचा सण... जावयाचे लाड पुरवायची असतात या मासात,गोड धोड करून घालायचे असते जावयांना...त्यांना एखादा दागिना,कपडेलत्ते करायचे असतात सासरच्यांनी..अन् विशेष म्हणजे स्वतः जावयाला फोन करून आमंत्रण द्यायला हवे,मुलीच्या माध्यमातून नव्हे...

अन् तू चालला बायकोच्या सांगण्यावरून...तुला काही मानपान आहे की नाही...तुझे बाबा नव्हते रे बाबा तुझ्यासारखे...माझी आई स्वतः आमंत्रण द्यायला यायची अन् तेव्हा कुठे यायचे तुझे बाबा...

मग काय...आई च आज्ञाधारक लेकरू,...इकडे आईने म्हटले अन् तिकडे लगेच काजल ला माहेरी जायला नकार...

नाही म्हटल्यावर काजल च्या डोळ्यात अश्रू वाहू लागले,किती मन होते तिचे अधिकमासात आईच्या घरी जाण्याचे...काजल आईवडिलांना एकुलतीएक त्यामुळे आईबाबांनना तिचाच आधार...पण तिचा नवरा असा अर्ध डोक्याचा माणूस...काय करावे तिला काहीच सुचत नव्हते...

म्हणून तिने तिच्या आईला फोन केला...

हॅलो आई,

हा बेटा काजल बोल...

अग आई...नाही आलं तर चालणार नाही का...

अरे पण तू तर काल पर्यंत हो म्हटली ना...मग आज कसकाय नाही म्हणतेय ग....जावई बापूंनी नाही म्हटलं का....

अग तसे नव्हे ग.... बरं मग तू एक करते का...तुझ्या जावयाला स्वतः फोन करून सांगतेस का...

बर बर सांगते ग पोरी....

काही वेळातच काजल ची आई जावयाच्या मोबाईल वर फोन करून त्यांना आमंत्रित करते,.. हिरमुसल्या तोंडाने तो हो म्हणतो आणि फोन ठेवतो...त्याला सासू सोबत कसे बोलावे हे देखील कळत नव्हते....लागलीच काजल विचारते कोणाचा फोन होता ...तुझ्या आईचा....अगदी रागाने तो उत्तरतो...

मग काय म्हणालीस आई,

काही नाही,या म्हणतेय

मग जाऊया ना आपण....

आता काय जावेच लागणार....

करू का तयारी मग मी,

तयारी वैगरे काय करायची,तिथे काही महिनाभर राहायचे आहे का...गेले की लगेच वापस....असे बोलून तो काजलवर रागावतो...

काजल ला खूप आनंद होतो...ती व तिचा नवरा दोघेही तिच्या माहेरी जायला निघतात,..अधिकमासात पहिल्यांदा पतीने होकार दिल्यामुळे ती मनोमन खूप प्रसन्न असते,...माहेरी गेल्यावर आईवडील दोघांचे स्वागत करून त्यांची सरबराई करतात,जे जे यथाशक्ती होईल ते सर्व जवयासाठी करतात,परंतु जावई च्या मनात काहीतरी वेगळेच चालू असते म्हणून तो थोडा नाराज असतो...त्याला अधिकमासात सासूबाईंनी गाडी द्यावी अशी आशा असते,पण नाजूक परिस्थितीत आईवडील जावई साठी एक सोन्याची अंगठी करतात....

सोन्याची अंगठी गुपचूप घेतल्यानंतर जावाईबापू गाडी ची आस लाऊन बसले असतात पण गाडी काही मिळत नाही...गाडी न मिळाल्यामुळे नाराज होऊन तांन ताण निघून येतात...काजल मात्र आईवडिलांना म्हणते तुम्ही खूप केलेत ,,काय गरज होती येवढं खर्च करण्याची...आता काहीच करू नका...अन् तिथून निघून येते . ...

इकडे साहेबांचा पारा जरा जास्तच तापलेला असतो,..साहेबांचे फण फण चालूच असते...काजल काहीच बोलत नाही...फक्त जसा नवरा बोलतो ते ऐकेत असते...

काजल ला जेव्हा अनावर होते तेव्हा ती पतीला म्हणते....आज पर्यंत मी सगळं ऐकल पण इथून पुढे जर तुमचं वर्तन असेच राहील तर मी देखील उत्तर द्यायला मागेपुढे पाहणार नाही...

तुम्हाला जर माझा स्वभाव नसेल आवडत तर तसे सांगा,माझ्यात काही बदल हवे असेल तर ते ही सांगा,पण माझ्या घरापासून ,, माहेरातून मला असे तोडू नका....हवे असेल तर रागवा पण माझे माहेर तोडण्याचे पाप करू नका...

तो काय निकाद्री माणूस...येवढे बोलून देखील त्याला काहीच उपयोग नाही...

एके दिवशी काजल ची नणंद अचानक तिच्या मुला सोबत घरी येते...अन् दारातच बसून ढसा ढसा रडते तेव्हा काजल चा पती बहिणीला विचारतो काय ग ताई....का रडतेस तू,कुणी मारलं की काही बोलले तुला...बहीण रडत रडतच उत्तर देते...अरे भाऊ,..आईने मला अधिकमास आहे म्हणून फोन लावलेला पण आई काही यांच्या सोबत बोलली नाही...तेव्हा त्यांना खूप राग आला..अन् याविष्यावरून आमच्यात वादावादी सुरू झाली...तर मी आले रागाने घर सोडून...

माणसांना काय समजणार माहेर म्हणजे काय असतं...म्हणे मला अजिबात माहेरी जायचे नाही...तर मी आता कायमस्वरूपी इथेच राहायला आली....आता घेऊ देत त्यांना टोले...मग समजणार...

बहिणीचा राग जाईपर्यंत काजल चा पती शांत होता,..दोन तीन दिवस झाले...अन् एक दिवस काजल च्या नणंद बाई करिता फोन आला...समोरून चक्क नणंद बाईचा नवरा बोलत होता,

अग ,, प्लीज तू घरी ये ना...तू घरी नाहीस तर आईची तब्येत बिघडली काम करून करून...तू इथून गेल्यानंतर तुझे महत्त्व कळले...खरंच तुझी नितांत गरज आहे आम्हाला...येतेस ना

हो....अगदी मनात लड्डू फुटल्यासारखी ती लाजत होती...

आता सर्व विसरून ती तिच्या सासरी जायला निघाली,जातांना तिने आईचा म्हणजेच काजल च्या सासुबाईचा आशीर्वाद घेतला...काजल ला बाय म्हणत ती निघाली.....

बहिणी सोबत जे काही घडले ते पाहून काजल च्या पतीमध्ये आपोआप परिवर्तन होत होते....अन् जर का उद्या काजल जर घर सोडून गेली तर आपल्याही घराचा तोच हाल होईल जो की बहिणीच्या घराचा झाला होता....

आता तो देखील अधिकमहिण्याचे महत्त्व इतरांना सांगत होता,स्वतःही जे जे शक्य आहे ते ते करत होते....आणि महत्वाचे म्हणजे काजल ला आनंदी ठेवत होता...आता ती मनात आलं तेव्हा माहेरी जाऊ शकत होती...शेवटी त्याला आता कळलं होत की स्त्री ला समजून घ्यायचे असेल तर स्त्री च्या मनाचा विचार अगोदर करावा लागतो...

                         *   समाप्त *

Ashwini Galwe Pund