अधिक मासासाठी सवाष्णींना देण्यासाठी वाण आयडिया
यावर्षी अधिक मास आलेला आहे. दर तीन वर्षातून एकदा अधिक मास येतो आणि याकाळात केलेले दान श्रेष्ठ मानले जाते म्हणूनच या महिनाभरात सवाष्णींना काय वाण देता येईल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? या लेखात आपण काहीतरी युनिक वाण आयडिया बघूया. त्याआधी अधिक मास म्हणजे काय? याबद्दल जाणून घेऊ.
जागतिक पातळीवर कालगणना करताना सौरवर्षास प्राधान्य दिले असेल तरीही भारतात सौर वर्षासोबत चांद्र वर्षास देखील तितकेच महत्त्व आहे. सौर वर्ष म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालायला लागणारा कालावधी तर चांद्र वर्ष म्हणजे चंद्राला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायला लागणारा कालावधी.
पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी ३६५ दिवसांचा अवधी लागतो तर चंद्र पृथ्वी भोवती ३५४ दिवसातच प्रदक्षिणा पूर्ण करतो. या ११ दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी मराठी वर्षात अधिक मास येतो. दर तीन वर्षांनी हा योग येतो आणि या काळात केलेले दान श्रेष्ठ मानले जाते.
चला तर मग आता जास्त वेळ न घालवता या काळात सवाष्णींना काय वाण देता येईल ते पाहूया. सोबतच जर तुम्हाला कोणती वस्तू आवडली तर ऑर्डर करण्यासाठीचे डिटेल्स पण पाहू.
१. मोत्याची लक्ष्मी पाऊले:- हे एक उत्तम वाण ठरू शकते. घराच्या देव्हाऱ्यात नेहमी आपण लक्ष्मी पाऊले काढतो किंवा गौरी - गणपतीत देखील लक्ष्मी पाऊले काढली जातात. मार्गशीर्ष गुरुवार असो वा कोणती पूजा लक्ष्मीची पाऊले तर रांगोळीचा एक भाग असतोच. घाई गडबडीत रांगोळी काढायला वेळ नसेल आणि घरातल्या लाद्यांवर पांढरी रांगोळी दिसत नसेल तर मोत्याच्या या पावलांचा छान उपयोग होतो. शिवाय वापरून झाली की स्वच्छ साबणाच्या पाण्यात धुवून पुन्हा वापरायला तयार. हे जर तुम्ही वाण म्हणून तुमच्या मैत्रिणींना दिले तर कायम त्यांच्या स्मरणात तर राहीलच शिवाय काहीतरी उपयोगी वस्तू दिल्याचे तुम्हालाही समाधान.
२. खणाची/ ब्रोकेड सिल्कची पर्स:- आजकाल खणाच्या पर्स ट्रेण्ड मध्ये आहेत. कुठेही जाताना सहज कॅरी करण्यासाठी ही पर्स छान दिसते. ही पर्स फक्त वाण म्हणूनच नाही तर घरी येणाऱ्या पाहुण्यांना देखील काहीतरी द्यावे लागते तेव्हाही तुम्ही देऊ शकता. या पर्सला दोन कप्पे आहेत.
३. आर्टिफिशियल मोगऱ्याच्या कळीचा गजरा:- कोणत्या मुलीला किंवा बाईला गजरा घालायला आवडत नाही! पण नेमकं जेव्हा कार्यक्रमाला बाहेर जायचं असतं तेव्हाच गजरा आणायचा राहतो किंवा ऐन कार्यक्रम सुरू होण्याआधी सुकून जातो. म्हणूनच हा आर्टिफिशियल मोगऱ्याच्या कळीचा गजरा याला उत्तम पर्याय आहे. प्लॅस्टिकचा वापर नाही त्यामुळे दिसायला अगदी खरा दिसतो. #one_time_investment देखील म्हणता येईल.
४. मोत्याचे स्वस्तिक:- स्वस्तिक हे देखील एक शुभ चिन्ह मानले जाते. कोणत्याही पूजेच्या रांगोळीत मांडण्यासाठी हे मोत्याचे स्वस्तिक एक चांगला पर्याय आहे.
५. नथ:- पारंपरिक वेशभूषा म्हणली की ती नथीशिवाय अपूर्णच! म्हणूनच या नथी वाणासाठी उत्तम पर्याय ठरतील. प्रेस नथ असल्याने कोणीही सहज वापरू शकते.
वरील सर्व पर्याय बघून तुम्हाला नक्कीच ते आवडेल असतील. तुम्हाला यातील कोणत्याही प्रॉडक्टची खरेदी करायची असेल तर 9561588598 या ANS Crafts च्या या नंबरवर संपर्क साधा.
ANS Crafts चे Instagram पेज फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा