आधी बदल तो डी. पी.

When you choose your picture to set as DP for your social accounts, be alert who can see it. This is for your own safety.

तन्वी लिफ्टच्या दिशेने धावत निघाली, चौथ्या मजल्यावरचे लिफ्टचे बटन कॅल केले,आत शिरताच सतवा मजला सिलेक्ट केला. तीनच मजल्यांचे अंतर पार करे पर्यंत नाही नाही ते विचार तिच्या डोक्यात भुंग्या सारखे घुमत होते....काय झालं असेल....तब्येत तर ठीक असेल ना....कोणाला काही अपघात तर नसेल ना झाला?? कारण,आत्ता रात्री ८ चे सुमारास लीना चा फोन आला होता...."तन्वी, आहेस तशी ये लगेच !!" आणि तन्वी निघाली.

दोघी मैत्रिणी गेली ३-४ वर्ष एकाच इमारतीत राहत होत्या. दोघींच्या मुली देखील शाळेत एकाच वर्गात शिकत असल्याने चांगला घरोबा होता.लीना आणि तिची १३ वर्षांची लेक नुपूर दोघी प्रचंड धस्कावलेल्या स्थितीत सोफ्यावर बसून होत्या! तन्वी घरात येताच लीना ने इतक्या वेळ मनात साठवलेली वाफ अश्रू रूपाने मोकळी केली. ....

" लीना अगं काय झालं....सांगशिल का मला?तुझा फोन आला आणि मी धावत आले....फोन वर पण काही बोलली नाही. बस तू इथे ...ये....आधी शांत हो जरा ...सांग मला काय झाल??

नुपूर ने लीना ला पाणी प्यायला दिले...."आई ,अगं घाबरु नकोस....मला तू इतकं बोल्ड आणि बिनधास्त राहायला शिकवलं...आणि तूच आता अशी नको ना रडू!" मला काही नाही झालं...." I am absolutely fine! "  "नुपूर, मला सांगतेस का काय झाल ते??" तन्वी ने विचारले. "मावशी, अगं नेहेमी प्रमाणे मी शिकवणी ला गेले होते...आणि संध्याकाळी ७.३० ला माझी शिकवणी संपली आणि मी घरी येण्या साठी आपल्या लिफ्ट मध्ये आत शिरले तर माझ्या पाठोपाठ वॉचमन काका सुद्धा लिफ्ट मध्ये आले..."

"मी आमच्या फ्लोअर " ७" चे बटन दाबले आणि एका बाजूला उभी होते....वॉचमन काका एरवी कधी दिसले,भेटले तर चौकशी करतात, कशी आहेस कुठे गेली होतीस वगैरे ! आज ही ते माझ्या शी बोलले, माझी चौकशी केली...मला काही वेगळं वाटलं नाही ...पण नंतर....ते माझ्या जवळ आले आणि माझ्या खांद्यावर हाथ ठेऊन मला म्हणाले...."आपण दोघे चांगले "फ्रेंड्स " होऊया का? आपण खूप छान गप्पा मारुया....मज्जा करूया ...पण आपल्या ह्या मैत्री बद्दल तु कोणाला सांगू नकोस....काही बोलू नकोस ... आपलं हे फ्रेंडशिप गुपित ठेऊया!" आणि हो.... मी असं तुला हे मैत्री च विचारलं आहे, ते सुद्धा तू कोणाला सांगू नकोस ह! " असं ही ते मला बोलले. त्यांचा तो स्पर्श.... शीssssss आणि नजर तर आज खूपच वेगळी होती ....मला खूपच ऑकवर्ड आणि कसं तरीच झाला ग मावशी"

" मी काही न बोलता शांत उभी होते,लिफ्ट कधी माझ्या फ्लोअर ला पोचते आहे ह्याची वाट पाहत! घरी पोचताच, मी लिफ्ट मधला प्रकार आई ला सांगितलाआणि ती रडायलाच लागली.....तिने बाबांना फोन केला आणि तुला पण कॅल करून बोलावल!"

तन्वी ने नुपूर ला जवळ घेतलं...तिच्या पाठी वर शाबासकी ची थाप देत म्हणाली.... "नुपूर तू घरी येऊन आईला नं घाबरता सगळं सांगितलस हे खरंच खूप चंगल केलंस.आई-बाबा आणि आम्ही सगळेच नेहेमीच तुम्हा मुलांच्या पाठीशी खंबीर पणे उभे आहोत, हे कायम लक्षात ठेव आणि कधीही काहीही वाटलं तरी त्यांच्याशी मनमोकळे पणाने बोलायचं, सगळं शेअर करायचं"

" नुपूर , तू जा आत फ्रेश हो .....उद्याची शाळेची तयारी आणि होम वर्क असेल ना तुला?? मी आहे आई जवळ....तू नको टेन्शन घेऊस. ..." तन्वी ने नुपूर ला आत पाठवल आणि ती लीना जवळ आली.

" लीना, अगं आपल्या मुली मोठ्या झाल्यात,त्यांना आपण चांगला वाईट स्परशा बद्दल लहानपणा पासून सांगत आलोय....सध्या काळ वेळ कशी असेल काहीच सांगता येत नाही....."

"नुपूरने, न घाबरता सगळं सांगितलं, ते फार योग्य केलं.आपण दोघी आधी खाली जाऊया, सोसायटी ऑफिस मध्ये जाऊन तक्रार करू त्या वॉचमन विरुद्ध, मला तर वाटतं पोलिसात सुध्दा तक्रार केली पाहिजे ! त्या आधी मी बिल्डिंग चे सेक्रेटरी श्री.सबनीस ह्यांना बोलावू का? नुपूर चे बाबा पण येतीलच ना आता?"

तन्वी ला मानेने "हो "कार देत लीना आणि तन्वी खाली जायला निघाल्या!

वॉचमन तिथेच बसला होता नेहेमीच्या त्याच्या खुर्चीत, लिफ्ट जवळच त्यांची खुर्ची आणि टेबल होत... मध्यम वायचे गृहस्थ,वय वर्ष ४०-४५ चे आसपास. बिल्डिंग मधल्या सगळ्या मुलांचे ते "वॉचमनकाका" होते. मोबाईल वर काही तरी पाहत होते....कुठला तरी व्हिडिओ बघण्यात तल्लीन झाले होते.

लीना आणि तन्वी दोघी त्यांच्या समोर उभ्या राहिल्या तरी वॉचमन मात्र व्हिडिओ पाहण्यात दंग होते. दोघींना समोर पाहून त्याचा चेहेरा पंधरा पडू लागला.... लीना जवळ जवळ त्याच्या अंगावर धाऊन गेली....मोठ मोठ्याने त्यांना ओरडून विचारू लागली, काय म्हणून त्याने नुपूर ला मैत्री करू, मज्जा करू असे विचारलें ! हिंमतच कशी झाली लहान मुलींना हे असले प्रश्न विचारायची! वॉचमन चे हावभाव पाहूनच कळतं होत .....स्वतः ला निर्दोष असल्याचे भासवत होते!

सेक्रेटरी श्री. सबनीस आणि लीना चे मिस्टर सचिन, दोघे पाठोपाठ पोचले. चाललेला प्रकार पाहून सोसायटी मधील अजू बाजू चे लोकही जमा झाले.आपली" चूक "झाली ....हे आता मान्य करण्या शिवाय वॉचमन कडे पर्याय नव्हता.....त्याने खूप प्रयत्न केला स्वतः ला वाचवण्याचा...." मी वडिलकीच्या नात्याने बोललो.... माझ्या मुली सारखी आहे नुपूर ताई " अस तो निर्लज्जपणे सांगत होता! जमलेली पुरुष मंडळी अखेर त्याला घेऊन पोलिसात गेेले.

पोलिसांनी,पोलिसी भाषेत वॉचमन ला समज दिली. लीना ने वॉचमन विरुद्ध फिर्यााद केेली. सोसायटी मध्ये नोटीस लावली गेली,"वॉचमन ला कामावरून कमी केले आहे " बिल्डिंग मध्ये घडलेल्या प्रकाराने सगळे सतर्क झाले होते!

पुढील २-४ दिवस लीना मात्र खूप उदास आणि नर्व्हस होती. "मुली शाळेत गेल्यावर ये माझ्या घरी , कॉफी घेऊया....आणि जरा गप्पा पण होतील...." तन्वी ने लीनाला तिच्या घरी कॉफी साठी बोलावले.

लीना, तन्वी कडे आली, शांतच होती तशी. तन्वी ने "त्या" दिवशीचा विषय काढला .....नुपूर कशी आहे? सगळं ठीके ना??

"त्या दिवशी नुपूर ने स्वतः ला अगदी योग्य रित्या वाचवल! मुलींना आपण सेल्फ डिफेन्स, कराटे प्रशिक्षण दिलं पाहिजे लीना...नहीं का??" तन्वी ने विचारले.

" हो ग तन्वी !...खरं सांगू का....३-४ वर्ष आपण इथे राहतोय त्या वॉचमन ला ओळखत होतो....आणि हा बघ ना कसला निघाला ...नशीब माझ्या लेकीच चांगलं म्हणून ...खरंच ती खूप मोठ्या संकटातून वाचली! " लीना ने हाथ जोडून मनोमन परमेश्वराचे आभार मानले!

"पण लीना, अग, वॉचमन ला आपण ओळखत होतो कसल?? कित्येक वेळा आपण ऐकतो, वाचतो अश्या प्रकारात ओळखीची व्यक्तीच मुलांना त्रास देतात.नुस्तं ते नाही घरातली मोठी माणसं / ओळखीचे काका, मामा सुद्धा काही केसेस मध्ये लैंगिक विकृती च्या केसेस मध्ये पकडले गेलेत." तन्वी जरा चिडूनच बोलली!!

"तन्वी ,मी तुला बोलले नाही कधी पण, एक दोन वेळा ह्या वॉचमन ने मला वॉट्स अप वर " छान आहे फोटो तुमचा" असा मेसेज केला होता ... मी बावळट सारखा थँक्यू असा रिप्लाय ही केला ग!"

"आणि तेव्हढ्च नाही......मागच्या आठवड्यात मी जेव्हा साडी नेसून बाहेर जायला खाली गेले होते....तेव्हा पण मला चक्क त्याने "साडीत छान दिसता तुम्ही" असं तोंडावर म्हटला....मला त्याची नजर वाईट असेल अशी शंका पण आली नाही ग....! मी भोळसट पणे त्याचे आभार मानले आणि निघून गेले!"

"माझ्या असल्या वेडे पणा मुळे त्याची हिम्मत वाढली असेल आणि त्याने नुपूर वर पण अशीच वाईट नजर टाकली !! " "लीना मी खरं सांगू का?? ह्याचां अर्थ हा परवा झालेला प्रकाराला आपल्याला कदाचित टाळता आला असता! बऱ्याच वेळा आपण नकळत आपल्यावर वाईट प्रसंग ओढवून घेतो"

लीना ला कळेना...तन्वी नक्की काय सुचवू पाहत होती. "काय म्हणायचं आहे तुला? "मी समजले नाही...."लीना गोंधळलेल्या स्वरात म्हणाली.

"लीना ,मला सांग तुझा मोबाईल नंबर कोणा कोणाकडे आहे? "

" अ...नंबर ना....मोबाईल नंबर माझे नातेवाईक , मित्रमंडळी आणि...... असेल इतर. .... बऱ्याच जणांकडे नंबर असेल ग... पण का, असं का विचारतेस?"

"इतर बऱ्याच जणांकडे म्हणजे नक्की कुणाकडे??" तन्वी ने विचारलं .... बर मी स्पष्टच सांगते आता.....आपला मोबाईल नंबर आपण ओळखीच्या माणसांच्या व्यतिरिक्त काही बऱ्याच अनोळखी .....म्हणजे पुसट शी ओळख किंवा कामा निमित्त ओळख असलेल्या लोकांना सुद्धा दिलेला असतो उदाहरणार्थ पेपरवाले ,दूधवाले, वाणी ,इलेक्ट्रिशियन ,प्लंबर आणि अगदी आपल्या बिल्डिंगच्या खालचा वॉचमन त्याला देखील आपला नंबर माहित असतो. म्हणजे आपणच कामासाठी त्यांना कधी फोन केला असतो किंवा आपण त्यांचा नंबर आहे आपल्याकडे मोबाईल वर सेव केलेला असतो."

"आता जेव्हा आपण एखाद्या चा नंबर सेव्ह करतो आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये,त्याला व्हाट्सअप वरचा आपला डीपी आणि आपलं स्टेटस हे सहज बघायला मिळतात." "हो बरोबर...." लीना ने मान डोलावली!

"आता विचार कर,तुझे पर्सनल फोटोज असलेली डीपी किंवा व्हाट्सअप वरचे स्टेटस हे तू नेहमी अपडेट करत असतेस आणि हे सगळं तुझ्या कॉन्टॅक्टस लिस्ट मधल्या लोकांना दिसत असतं"

"येस, यु आर राइट"

"म्हणजे तुझे किंवा नुपूर चे फोटज जिथे तुम्ही कधी ड्रेस घातलाय ,कधी साडी नसलीस, कधी शॉर्ट ड्रेस,कधी वेस्टन औटफिट मधले पिक्चर हे सगळ्या दुनियेला बघायला मिळतात"

"म्हणजे आपणच तशी त्यांना परवानगी दिली आहे हे फोटो पाहायची, कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये असतात ना त्यांचे नंबर सेव्ह केलेले."

"आणि कोण लोक, हे आपले फोटो कुठल्या नजरेने पाहतात किंवा आपल्या फोटोचा कसा उपयोग करतात ह्याची आपल्याला पुसटशी सुद्धा कल्पना नसते!"

"आजकल काय "सेव पिक्चर " क्लिक केलं की "तो फोटो "त्यांच्या मोबाईल मध्ये जातो आणि नाही तर स्क्रीन शॉट काढून ठेवला तरी आपले सगळे पर्सनल फोटोज हे त्या लोकांकडे त्यांच्या मोबाईल वर सेव्ह होतात"

लीनाचे हााथ पाय गार पडले हे सगळं ऐकून,विचार करून!

"लीना ,जेवढी टेक्नॉलॉजी ,इंटरनेट, गॅजेट्स वगैरे सगळं नवीन-नवीन गोष्टी येत असल्या आणि खूप आकर्षक वाटल्या ना तरी त्यांचे तेवढेच अनेक धोके पण आहेत, ज्याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही! बऱ्याच वेळा आपण ह्या कडे दुर्लक्ष करतो पण त्या खरंच खूप महत्त्वाच्या असतात!"

"अगदीं खरं बोलतेस, तन्वी..... या प्रसंगाने आपल्याला बरंच काही शिकवलं आता शहाणे होऊ आणि अधिक खबरदारी घेऊ आपण!

"आणि खरं सांगू लीना....ते फार आधुनिक विचार..." माय बॉडी, माय चॉइस ..." वगैरे हे सगळं ना नुस्तं ऐकायला आणि लोकांच्या फेसबुक पोस्ट ला "लाईक" करण्या एवढंच बर असतं! ते काही अमलात आणून नसते त्रास ओढावून घ्या कशाला हव आहे ! आपण कपडे कसे घालतो, वावरतो कसे , हे येता जाता कित्येक जाणं पहात असतात. अगं आपल्या नकळत त्यांचं निरीक्षण चालू असत! असे काही विकृत प्रकार आपल्या बरोबर होतात, किंवा आपल्या मुलींना अश्या प्रसंगा ला तोंड द्यावं लागतं ना....तेव्हा मात्र पाया खालची जमीन निसटते!

" आणि लीना,आधी बदल तो डी. पी.!!"ह्या पुुढे उगाच कोणीही यावं आणि आपले फोटो बघत बसावं हे असलं चालणार नाही"

एवढं बोलून तन्वी आत किचन मध्ये कॉफी करायला गेली. लीना बाहेर हॉल मध्ये सोफ्यावर , पर्स मधून मोबाईल काढून वॉट्स अप मधला तिचा पर्सनल फोटो डी. पी./ स्टेटस बदलून त्या जागी लावण्या करता निसर्गाचे सुंदर चित्र शोधायला लागली.....!!

मैत्रिणींनो.....पण खरंच, विचार पूर्वक आपले डी.पी. किंवा स्टेटस ठेवत जा....आपले मोबाईल नंबर अनेक लोकांकडे असतात! स्वतः ची काळजी आणि सुरक्षा ही आपल्याच हातात असते... आपण आपल्या मुलींना योग्य अयोग्य गोष्टी शिकवू आणि स्वरक्षणाचे धडे देऊन त्यांना निडर बनवू शकतो!!

@तेजल मनिष ताम्हणे