अडगळ

Feeling For Objects And Persons

*अडगळ*...
आपल्यासाठी अडगळ म्हणजे नको असलेल्या वस्तू.. काही वेळेस नंतर वापरू असे म्हणून तशाच राहून गेलेल्या तर कधीतरी वापरून वापरून खराब झालेल्या.. एक काळ होता कि अशा वस्तू ठेवण्यासाठी माळा असायचा. त्या माळ्यावर नंतर वापरता येतील म्हणून ठेवलेल्या अनेक गोष्टी असायच्या.. माझ्या माहेरी सुद्धा एक माळा होता.. ज्याची साफसफाई दिवाळीच्या आधी हमखास व्हायची.. त्यात आमचे काम म्हणजे ती भरमसाठ भांडी घासून पुसून कोरडी करून परत बांधून ठेवायची , काही शोकेस मध्ये मांडायची.. या अशाच सध्या न वापरण्याच्या भांड्यात एक दोन सुंदर नक्षीची भांडी होती.. एक कासवाच्या आकाराची पळी होती आणि दुसरे आठवत नाही.. आजीच्या रूखवतातले होते ते.. त्याच्यावर claim लावून ठेवला होता.. पण लावल्या लावल्या ती गायब झाली?
असो.. अशी अनेक भांडी तिथे अडगळीत पडलेली होती.. काही आजीची काही आईची.. कालांतराने जेव्हा ती भांडी देउन नवीन आणण्यात आली तेव्हा आजीपेक्षाही थोडे जास्त दुःख मला झाले.. कारण तशा तांब्यापितळ्याच्या कळशा, हांडे परत दिसतील न दिसतील... त्या स्वच्छ करायचा त्रास होत असला तरिही मनाला वाईट वाटलेच..
त्याच अडगळीत माझी एक जुनी बॅग होती.. त्यात शाळेत असताना जमा केलेले हम आपके है कौन चे बरेचसे फोटो होते..??? त्या वेळेस ५० पैशाला एक असा फोटो मिळायचे.. पिक्चर मध्ये न दाखवलेल्या सीनचे फोटो मिळवायला काय त्रास व्हायचा आमचे आम्हाला माहीत.. रोज मधल्या सुट्टीत डबा न खाता त्या दुकानात जायचे, गर्दी व्हायच्या आधीच ते फोटो शोधायचे.. रोज मिळणारा pocketmoney त्यावर खर्च करायचा.. नंतर ते फोटो दाखवून जिच्याकडे ते special फोटो नाहीत तिला जळवायचे , तिचे बघून आपण जळायचे.. बापरे... केवढी मोठी कहाणी आहे त्या पाठी.. पण कॉलेज सुरू झाल्यानंतर ते फोटोही अडगळीत गेले.. काही वर्ष नियमितपणे मोजून ते परत ठेवत होते.. लग्न झाल्यावर लगेच कसे ते सासरी आणणार म्हणून जपून ठेवले होते.. आज ती बॅग आहे पण त्यातले फोटो गायब???
असो...खरेतर अडगळीतच माझ्यासारख्यांच्या भावना गुंतलेल्या असाव्यात..
असो.. या लेखाचे खरे कारण आहे आमचे washing machine .. काल what\"s app status ला नवीन family member म्हणून टाकल्यावर बर्‍याच जणांना वाटले असेल कि आता हि अशा गोष्टीही टाकायला लागली कि काय.. पण खरे कारण आहे.. त्याच्या आधीचे मशीन माझ्या सासरी जवळ जवळ ३५ वर्षे होते.. म्हणजे माझ्यासोबत १८ वर्षे.. कोणतेही एवढे चाललेले मशीन मला तरी माहित नाही.. त्याचे सगळेच अवयव बदलून झाले होते.. तरिही ते चालू होते.. कितीही कपडे टाका ते धूत होते.. पण अचानक ते दुरुस्तीच्या पलिकडे गेले आणि आम्हाला ते बदलावे लागले.. पण नवीन मशीनमध्ये मात्र कपडे टाकताना आता विचार करतो हे कपडे जास्त नाही ना होणार??
माणसांचे पण असेच असते ना , गरज असेपर्यंत आपण त्याला वापरतो आणि गरज संपली कि अडगळीत टाकून देतो.. काल ज्याप्रकारे त्या delivery boy ने दोन मिनिटात जुने मशीन नेऊन नवीन लावले तसेच काही जण जुन्या लोकांना तोडून नवीन नाती बनवतात.. आणि आपण आधीच्या लोकांना कसे वागवले हे विसरून नवीन लोकांच्या मनाची काळजी घेतात.. अशा वेळेस त्या लोकांना पण आमच्या जुन्या मशीनसारखे वाईट वाटत असेल???
सारिका कंदलगांवकर
मुंबई