आदरणीय श्री.अमित मेढेकर : नव्या युगातील प्रेरणादायक युगपुरूष

ईरा : शब्दांचा उत्साही प्रवास

आदरणीय श्री.अमित मेढेकर : नव्या युगातील प्रेरणादायक  युगपुरूष 
   

         तुमचा सहवास
         दैवयोगच म्हणावा 
         तुमच्या सुंदर विचारांनी 
         उज्वल भारत घडावा 
    
       कांही व्यक्तिंचे भेटणे दैवयोगच म्हणावे लागेल.ईरा व्यासपीठाची निर्मिती झाली आणि अनेक नव्या गोष्टींचा सहवास लाभला.नवे विचार ,  आचार , संस्कार , प्रतिभासंपन्न लेखक , भारतिय संस्कृतीच्या शान असणाऱ्या स्री लेखिकांचे दर्जेदार लेखन आणि ईराचे वैविध्यपूर्ण उपक्रम यामुळे एका वेगळ्या जीवनशैलीचा प्रवास करण्याचा  अनुभवास मिळत आहे.हा प्रवास जीवनाची आनंदयात्रेचा क्षणोक्षणी प्रत्यय देत आहे.असेच ईरा व्यासपीठाने मा.श्री.अमित मेढेकरसरांच्या रुपात  सुंदर व्यक्तीमत्वाची भेट दिली.या महान व्यक्तीमत्वाला कोणती विशेषणे द्यायची व कोणती अलंकारीक भाषा वापरायची हा प्रश्न सतावत होता.पण आज लेखणीने त्यांना समृद्ध करायचे ठरविले.

         सतत हसतमुख चेहरा , शांत , प्रेमळ स्वभाव , चमकदार व सकारात्मक विचार , दुस-यांना  मदतीची भावना , स्रीयांच्याविषयी आदर , बोलण्यात सतत नम्रता ठासून भरलेली  असे हे दिलखुलास व दिलदार व्यक्तीमत्व म्हणजे आदरणीय अमित मेढेकरसर ...!! ट्रेनर , माईंड कोच , सर्टीफाईड काऊन्सेलर , उत्तम समुपदेशक , कार्पोरेट आयटी , एज्युकेशन  विभागात वर्कशॉप  , सेमिनार द्वारे मार्गदर्शन , अनेक नामांकित कंपन्यांमध्ये स्टाफ तसेच मॕनेजमेंट लोकांच्या कार्यशाळा , हेल्दी माईंड कनस्लटंसी द्वारे प्रबोधन तसेच ते प्रगल्भ लेखक व ब्लॉगरसुद्धा आहेत. या सगळ्या कतृत्वावरुन त्यांची महानता  दिसून येते.स्पष्ट उच्चार , भारदस्त आवाज , कमालीची नम्रता , मार्गदर्शन करण्याची दर्जेदार पद्धत , संवाद साधण्याची कला यामुळे त्यांचे प्रत्येक  सेशन हवेहवेसे वाटते.

      जीवनात छोट्या -  मोठ्या गोष्टीमुळे आपल्यात ताणतणाव येत असतात यामुळे आपण  संवादच हरवून बसतो परिणामी निराश झाल्यामुळे   जीवनातील आनंदच गमावतो.पण एखाद्या व्यक्तीत  इतकी सकारात्मकता असते की , या सर्वावर आपल्या प्रभावी विचारांने मात करता येते ,  जीवन सुंदर जगता येते हे अमितसरांनी वेगवेगळ्या माध्यमांतून दाखवून दिले आहे.पती पत्नीतील होणारे विसंंगवाद , त्यांची दुभंगलेली मनं  त्यांच्या सलोख्याने पुन्हा जोडले गेली आहेत , ध्येयवेड्या तरुणांना त्यांच्या मार्गदर्शनाने अफलातून यश मिळाले आहे. अनेक कंपन्यांमध्ये अनेक कार्यशाळा घेऊन त्यांचे मनोबल वाढविले आहे.ईरासारख्या व्यासपीठावर विविध विषयावर सेशन घेऊन लेखकांना व वाचकांना आपल्या सकारात्मक विचारांची मेजवानी दिली आहे. हे सगळे कार्य करित असतानासुद्धा लेखक या नात्याने लेखनकार्य सुरु आहे.अत्यंत ओघवती भाषा , विषयांचा नवा दृष्टिकोन , समर्पक संदेश , कथेतून सकारात्मक विचार प्रदान ,  लेखनातील  अशा  खाशीयतमुळे त्यांचे लेखन वाचकांना आवडते. आपल्या विचारांचे स्तोत्र सर्वांना मिळावे , वाचकांना आपल्या प्रेरणादायक कथा वाचण्यास मिळाव्या या शुद्ध हेतुने सध्याच त्यांचा "  आविरतता "  हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे.सतत कार्याशी प्रामाणिक राहून चांगले कार्यही  करता येते हाच उदात्त हेतू त्यांच्या या कथासंग्रहातून स्पष्ट होतो.सर्वात मिळून मिसळून वागण्याची त्यांची कला फार आवडते.ईरा व्यासपीठाने आयोजित केलेल्या चॕम्पियन ट्राॕफी स्पर्धेत इतक्या सा-या व्यापातून त्यांचा सहभागाने नवलेखकांना प्रेरणा तर मिळालीच पण त्यांच्या मोठ्या मनाचा प्रत्यय आला. या सर्व कार्यात आदरणीय निधी मॕडम यांची साथ  मोलाची आहे.विखुरलेल्या मनाला जोडणारे , दांपत्य जीवन सुखी करणारे , सतत प्रोत्साहन देणारे , विविध भाषेवर प्रभूत्व असणारे ,  सदा आनंदी व  हसतमुख असणारे आमचे प्रेरणास्तोत्र आदरणीय अमित मेढेकरसर यांच्या आज प्रकटदिनाचे औचित्य साधून त्यांच्या सोनेरी क्षणाला सजविलेला शब्दांचा हा साज  मनाला वेगळाच आनंद देत आहे.

       आपले जीवन असेच सोनेरी क्षणांनी बहरावे , आपणास उत्तम आरोग्य व कौटुंबिक सुख मिळावे , आपले हे समाजप्रबोधनात्मक कार्य सतत चालू रहावे , आपल्याकडून अशीच संस्कारक्षम पिढी निर्माण व्हावी , तुमचा सहवास निरंतर मिळावा यासाठी तुम्हाला भरपूर उर्जा मिळावी हीच परमेश्वर चरणी प्रार्थना...!


विचारामुळे तुमच्या येते स्फुर्ती 
दुरवर पसरावी कार्याची किर्ती 
तुमच्यामुळे मिळते अमाप प्रेरणा 
आरोग्यसंपन्न आयुष्य लाभावे ही मनोकामना 

           ©®नामदेवपाटील