Jan 27, 2021
प्रेरणादायक

आदरणीय लेखिका योगिता विजय टवलारे वाढदिवस शुभेच्छा

Read Later
आदरणीय लेखिका योगिता विजय टवलारे वाढदिवस शुभेच्छा

आदरणीय लेखिका सौ.योगिता विजय टवलारे वाढदिवस शुभेच्छा 

   ईरा व्यासपिठाला सोनेरी झळाळी देणारे व्यक्तिमत्त्व 

     शब्दांना झेलती ही तत्परता
     ईराला बळ देते योगिता
              ......................✍️

 

     लेखक लिहीत असतो मनापासून ...मनातील भावनांना शब्दांतून व्यक्त होताना नकळत वाचकांच्या मनाशी संवाद साधत असतो.कथा.कविता,चारोळी हे लेखनाचे सगळे प्रकार दाही दिशा उजळून टाकत असतात ..हेच शब्द भक्कम आधार शोधत असतात ... अशावेळी त्यांना आपल्या हक्काचे व्यासपिठ मिळते "  ईरा...!! " आदरणीय सौ.संजना इंगळे यांनी आपल्या मुलाप्रमाणे जपलेल्या या  "शब्दांच्या वैभवाची " निर्मिती अफलातून केली व लेखकवर्गांला हक्काचे व्यासपिठ मिळाले.तिथे शब्द बरसू लागले,सोनघचाफ्यासारखे ,पारिजातकासारखे दरवळून लागले व शब्दांची ख्याती जगभरात निनादू लागली, लेखकांच्या लेखणीची जादू तळपू लागली .व्यासपिठाला प्रचंड प्रतीसाद मिळू लागला महिला लेखिकांचा ओघ वाढू लागला मग हा डोलारा सांभाळण्यासाठी आदरणीय संजना मॕडम यांनीआपली मैत्रिण सौ.योगिता टवलारे यांच्याकडे ईरा व्यासपिठाची धुरा सोपवली. 

   मग सुरु झाली ईरा व्यासपिठाची समृद्धीच्या दिशेने वाटचाल ...!!अतिशय चाणाक्षपणे व्यासपिठ हाताळताना मॉम्सप्रेसोवर केलेले दर्जेदार लिखाण व लेखनकलेचे आपले कसब पणाला लावून हे व्यासपिठ लेखकवर्गांला आपलेसे करुन टाकले.अनेक तांत्रिक अडचणीवर मात करुन ईरा व्यासपिठात नवे सकारात्मक बदल करुन अद्यावत  व्यासपिठ तयार करण्यास जोर दिला.लेखकांना प्रोत्साहित करण्याबरोबर नवनव्या स्पर्धा भरवून योग्य निकषाव्दारे पारदर्शक निकाल लावण्यात योगिता मॕडम यांचा हातखंडा आहे.वारंवार प्रसिद्ध होणारे लेख तातडीने फेसबुक पेजवर प्रकाशीत करणे , कथानकाच्या  पुढील भागासाठी सतर्क करणे ,  वाचकांच्या समस्यां सोडविणे अशा अनेक गोष्टी वेळच्यावेळी केल्यामुळे ईरा व्यासपिठ रोज ताजे व टवटवीत असते हे कार्य योगिता मॕडम  आनंदपुर्वक व उत्साहाने करीत आहेत.अशा या कतृत्वान व प्रभावशाली स्री व्यक्तिमत्त्वाचा आज वाढदिवस ...!! येणारे प्रत्येकक्षण हे आनंददायी व सुखकारक असावेत.त्यांंचे जीवन आरोग्यसंपन्न  व निरोगी रहावे.त्यांंच्या कार्याने ईरा व्यासपिठाला सुवर्णदिन यावेत.लेखिका या नात्याने शब्दांनी अजरामर व्हावे ..!! अशा सर्व सुखमय क्षणांनी आयुष्य सदाबहार रहावे यासाठी या वाढदिवसाच्या परमोच्च क्षणाला सर्व लेखिका,लेखकवर्ग , वाचकवर्ग व तमाम मित्रपरिवारांकडून मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा ...!!

     ईरात लेखन करावे
    लेखणीने निर्धास्त व्हावे
    शब्दांनी जग बघावे
   आनंदाने मुक्त बागडावे

         
             ©®नामदेवपाटील ✍️