Dec 05, 2021
प्रेरणादायक

आदरणीय धनश्री साळुंखे : वाचनातून समृद्धीकडे वाटचाल

Read Later
आदरणीय धनश्री साळुंखे : वाचनातून समृद्धीकडे वाटचाल

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

आदरणीय धनश्री साळुंखे : वाचनातून समृद्धीकडे वाटचाल 

       मनापासून तळमळीने लिहतो लेखक
       वाचकांच्यामुळे होते लेखणाचे सार्थक 
       वाचकच असतात लेखनाचे खरे शिलेदार 
        प्रेरणेने त्यांच्या लेखन होते नेहमी बहारदार 
        
                                              ............

           प्रसन्न पहाट उगवली होती.दवबिंदूची पखरण लक्ष वेधत होती.फुलांचे ताटवे आपले सौंदर्य बहाल करत होते.पाखरे  भिरभिरत्या पंखानी आपल्या घरट्यातून झेप घेत होती.भावगीताची मंजूळ धून मनाला भूरळ घालत  होती.सुर्यकिरणांचा कवडसा अंगणात डोकावत होता.आशा विलोभनिय वातावरणात हातात वाचण्यासाठी  वर्तमानपत्र अलगद आले.वाचता - वाचता वाचन प्रेरणा दिनाची आठवण झाली.वाचन किती महत्त्वाचे याची प्रचीती आली.वाचनाने माणुस केवळ समृद्ध होत नाही तर  विचारांने परिपक्व होतो.  वाचनामुळे बुद्धीला चालना , ताणतणांवापासून सुटका , शब्दसंपत्तीत वाढ , ज्ञानात भर , एकाग्रता आणि मनोरंजन सुद्धा होते म्हणून सतत वाचन करणारी व्यक्ती नावारुपाला येते या सगळ्या वाचनाच्या महत्वावरुन ईरा व्यासपीठावरील वाचकांची अलौकिक कामगिरी लक्षात आली आणि प्रकर्षाने नाव समोर आले आदरणीय धनश्री साळुंखे मॕडम यांचे ...!!

       ईरावर लेखनासाठी लेखकांची उपस्थिती लक्षणीय आहे.मार्मिकतेने डवरलेल्या कथातून लेखकांनी आतिशय प्रभावी लेखन केले आहे.वाचकांचा वाचनाचा कल पाहून केलेले लेखन वाचकांच्यासाठी मर्मबंधातील ठेव आहे.पण ईरावरील वाचक इतका सुज्ञ आहे की इथल्या लेखकांना पुर्ण प्रोत्साहीत करुन त्यांना लिहण्यासाठी नवी प्रेरणा देत असतो.यामध्ये धनश्री मॕडम नेहमी आघाडीवर आहेत.अनेक  लेखकांच्या कथा दररोज  व्यासपीठावर प्रकाशीत होत असतात पण प्रत्येक कथा वाचून त्यावर प्रतिक्रिया देण्यात धनश्री मॕडम वाकबगार आहेत.यामध्ये त्यांच्या प्रतिक्रिया इतक्या प्रेरणादायक असतात की त्यामुळेच लेखकांना लिहण्याची उर्जा मिळते.वाचकच हा लेखकांचा खरा मार्गदर्शक असतो हे त्यांच्या सततच्या वाचनामुळे जाणवते.

       ईरा व्यासपीठावरील सातत्यपूर्ण वाचनामुळे धनश्री मॕडम यांच्या व्यासंगी स्वभावाची लेखकांना ओळख झाली.दिलदार स्वभाव , संवाद साधण्याची उत्तम कला , रसितेचा ओढा , मराठी साहित्याबद्दल मनांत प्रचंड आपुलकी , लेखकांच्या बद्दल आदराची भावना , मिळून मिसळून वागण्याची कला यामुळे ईरा परिवाराला एक हक्काची वाचक सखी मिळाली आहे.या महान कार्याबद्दल त्यांचा ईरा व्यासपीठाने " उत्कृष्ट वाचक " म्हणून गौरव केलेला आहे. हा पुरस्कार त्यांच्यातील नियमित वाचनाचे महत्व अधोरेखित करतो.असेच वाचन त्यांच्याकडून अपेक्षित आहे.वाचता - वाचता  त्या लिहण्याचा प्रयत्नही करु लागल्या आहेत आणि हे प्रगल्भ लेखिकेचे लक्षण आहे ,  कारण लेखक हा वाचनातून घडत असतो.तुम्ही लिहण्यास सुरु करावे इथले लेखक तुम्हाला चांगले मार्गदर्शन करतील.आम्हाला आशा वाटते तुम्ही नव्या उमेदीने लेखणी हातात घ्यावी ,    ईराच्या तडफदार लेखिका व्हाव्यात हीच फार मोठी अपेक्षा आहे.

      अनेक दिवस धनश्री मॕडम यांच्यावर लेख लिहण्यास मी उत्सुक होतो पण तशी संधी येत नव्हती आज त्यांच्या वाढदिवसाची कुणकुण लागली आली आणि त्यांच्यावर लिहण्याची  सोनेरी संधी मिळाली आणि मन आनंदीत झाले.या  शुभक्षणी त्यांना उत्तम आरोग्य मिळावे , त्यांच्या आयुष्यात असेच सुवर्णसोहळे यावेत वाचनाचे कार्य असेच निरंतर चालू रहावे यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा ...!!

                ©®नामदेवपाटील 

      

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now