अचुक भुमिका, नाते सून आणि सासर्यांचे

नाते सून आणि सासरे यांचे वडील मुलीचे

दोन मुले,सूना आणि नातवंड असा अगदी गोकूळ असल्यासारखा परिवार होता मानेकाकांचा पण दृष्ट लागावी म्हणतात तसे झाले अगदी धाकटी सून आल्यापासून नुसती भांडण,घर अगदी उदास झाले होते..
कारण तीने मोठ्या सूनबाईविरूद्ध नको नको ते खोटे उठवायला सुरुवात केली पण घरात शांतता हवी म्हणून सर्व तीला समजून घ्यायचा प्रयत्न करत होते.मोठी सून तशी शांत आणि समंजस होती.सासूबाई गेल्यावर सारं घर तिने छान सांभाळले होते,याची काकांना जाण होती..

मोठ्या सूनेने हे घर आपूलकीने एकत्र बांधले होते,आणि तिच्या शब्दाखातर ते गप्प होते,पण जेव्हा तिने मोठीच्या चारीत्र्यावर संशय घेतला तेव्हा मात्र काकांनी मोठीच्या बाबांची अचूक भुमिका बजावली आणि छोटीला खडे बोल सूनावले...

साहित्य चोरी हा गुन्हा आहे. 
सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे ह्याची नोंद घ्यावी. 
कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.

© अनुजा धारिया शेठ