Oct 31, 2020
कथामालिका

ऍक्सीडेन्ट मिस्ट्री, (भाग 4)

Read Later
ऍक्सीडेन्ट मिस्ट्री, (भाग 4)

समीर आणि मीरा आपापल्या घरी गेले.... 

आता समीर थोडा रिलॅक्स झाला होता.... त्याला त्याचे मन मोकळे झाल्यासारखे वाटत होते...

सायलीच्या अपघाताचा छडा लावायचा.... आता बास झाला टाईमपास... असं समीरने ठरवून टाकलं..... 

इन्स्पेक्टर इनामदाराना समीर ने फोन लावला.... 

समीर : सर मला तूमची थोडी मदत हवी होती.... 

इनामदार : बोला समीर साहेब... मी काय मदत 
करू शकतो?? 

समीर :मला सायलीचा फोन मिळू शकेल का?? 

इनामदार :सायलीचं सर्वच सामान कालच तीचे पोस्टमॉर्टम झाल्यावर तिच्या वडिलांकडे हॅन्डओव्हर केले आहे.... 
फोन सुद्धा 

समीर :ठीक आहे, धन्यवाद..... ठेवतो फोन 

असं म्हणून समीर लागलीच तयार झाला एव्हाना रात्रीचे आठ वाजले होते....वेळ न दवडता समीर सायलीच्या घरी गेला..... 

घरी गेल्यावर समीरने सायलीच्या फोनबद्दल विचारणा केली.... फोन समीरच्या वडिलांजवळ होता.... 
समीर :बाबा, मला सायलीचा फोन मिळेल का? 

सायलीचे बाबा :कश्यासाठी?? 

समीर :असंच तिची शेवटची आठवण म्हणून... आमचे काही फोटोस पण होते त्यात.... 

सायलीचे बाबा :आता त्याला काही अर्थ नाही.... फोन मी केव्हाच रीसेट केला आणि वाचमनला देऊन टाकला.... 

समीर :काय??....

समीरच्या मनात पहिल्यांदाच शंकेची पाल चूकचुकली.... 
वाटलं इतकी काय घाई होती फोन रीसेट करायची?? 

ह्या मध्ये सायलीचे बाबा तर..... नाही नाही आपण असा काय विचार करतोय.... 

पण सायलीच्या बाबांना सुरुवातीला आमचे लग्न बिलकुल मान्य नव्हते ना.... त्यांच्या दृष्टीने मी खालच्या जातीचा होतो.... म्हणून तर हे घडले नसावे ना?? .. 

आपण असा काय विचार करतोय.... त्यांना मारायचं असतंच तर मला मारलं असतं... स्वतःच्या मुलीला नाही....

 समीर रात्रभर विचार करत होता... आता सायलीचे फोन डिटेल्स त्याने काढून घेण्याचे ठरवले....

समीरला सायलीच्या बँकेचे पण डिटेल्स काढायचे होते....

 समीरचा एक स्वभाव होता की जर त्याला कुठल्याही एखाद्या वस्तूचा छडा लावायचा असेल तेव्हा तो सगळ्यात आधी त्या व्यक्तीच्या बँकेच्या transaction ची सगळी माहिती तो घेत असे... त्या आधारावरच त्याने आधीच्या बऱ्याचश्या ब्लॅकमेलिंग च्या गोष्टी उजेडात आणल्या होत्या... 

अल्पावधीतच समीरने बड्या बड्या लोकांना नाकी नऊ करून सोडले होते... आणि विशेष म्हणजे समीर त्याच्या कामाशी प्रामाणिक होता.... भ्रष्ट नव्हता... त्यांचं चॅनेलही नवीन होतं.. तेथे देखील भ्रष्टाचार होत नव्हता..... 

समीर सकाळी लवकरच उठला.... आजचा दिवस काहीतरी वेगळाच आहे असं त्याला सूर्योदयासोबत जाणवत होतं... सूर्याची कोवळी किरणं जणू समीरला प्रफुल्लित करून जात होती....

 एका सकारात्मक विचाराने आजचा समीरचा दिवस उजाडला होता..... 

ठरल्याप्रमाणे समीर बँकेत गेला... बँक मॅनेजर समीरच्या ओळखीचा होता... कारण समीरच्या transaction बघण्याच्या सवयी आता मॅनेजरला माहिती झाल्या होत्या आणि आधीच्या केसेस मध्ये बँकेचा मॅनेजर आयताच हिरो झाला होता.. 

मॅनेजरच्या परवानगीने समीर बँक कर्मचाऱ्याकडे गेला आणि सायलीच्या अकाउंट चे transaction चे फोटो त्याने स्वतःच्या मोबाईल मध्ये काढून घेतले....

©® डॉ.सुजाता कुटे

मीराचा फोन आला... 
समीर स्वतःशीच : अरे यार मीराला तर पूरता विसरून गेलो मी.. आज कुठे outing ला जायचं म्हणत होती.... 

समीर (फोन वर )आलो आलो.... कुठे यायचं ते सांग... 

मीरा आपल्या ऑफिसच्या बाजूला ये... एक छोटी बातमी पण कव्हर करायची आहे.... आपल्या शहराच्या बाहेर जो समुद्र आहे... तिथे चाचे येणार आहेत...आपल्याला व्हिडिओ कव्हर करायचा आहे..... 

समीर : ठीक आहे पंधरा मिनटात पोहोचतो असे म्हणत तो त्याच्या अल्टो गाडीने ऑफिसच्या दिशेने निघाला... 

समीर फक्त सायलीच्या अकॉउंट डिटेल्स बद्दलच विचार करत होता.... गरबडीत त्याला ते बघता नव्हते आले... याची खंत वाटत होती.... आज कितीही उशीर झाला तरी सायलीच्या अकाउंटचे डिटेल्स बघायचे हे त्याने मनोमन ठरवून टाकले होते.... 

तितक्यात समीर ऑफिस जवळ पोहोचला.... मीरा तिथेच उभी होती.... पटकन अल्टोमध्ये बसली आणि समीरला समुद्रीचाचांबद्दल माहिती देऊ लागली.... 

समीर : इतकं प्रॉम्प्ट काम.... तूला इतकी कशी माहीती मिळाली गं?? 

मीरा : तूझ्यासारखा गुरु मिळाल्यावर काय अवघड आहे?? 
आपला तो पोलिसांचा जुना खबरी आहेना त्याने फोन केला 

समीर : म्हणजे??  चाच्यांना पकडायला पोलीस देखील असतील ! मस्तच झालं हे.... आता live फायरिंग, फायटिंग, झटपट काय जे होईल ते शूट करता येईल.... समीर खूप खूष झाला.... 

मीरा देखील समीरला खूष बघून मनोमन खूष झाली.... 

अर्धा तास प्रवास केल्यावर मीरा आणि समीर समुद्राजवळ पोहोचले होते... 

अद्याप पोलीस आलेले नव्हते....  

समुद्राच्या किनाऱ्यावर खूप सारी नारळाची झाडी असल्यामुळे आणि मोठे दगड असल्यामुळे लपण्यासाठी भरपूर जागा होती.. जिथून व्यवस्थित शूटिंग देखील करता येत होती..... 

या सगळ्या वातावरणात समीर सायलीच्या मृत्यूचे दुःख थोडावेळ विसरला.... 

तितक्यात इन्स्पेक्टर इनामदार आपली पूर्ण फौज तिथे घेऊन आले.... दुरूनच त्यांनी समीरला ओळखले आता आपण करणाऱ्या अटक सत्राची छान ब्रेकिंग news होणार हे त्यांच्या लक्षात आलेले होते.... समीरला डिस्टर्ब न करता इनामदारांनी बाकीच्या ठिकाणी आपलं जाळं लावलं.... 

थोड्याच वेळात समुद्री चाचे आले.... 

त्यांच्या कडे भरपूर  ड्रग्ज आणि हत्यारे देखील होती....

 त्यांची जहाज बंदरावर आल्यावर समोर त्यांना अगदीच सगळं निर्मनुष्य दिसत होतं.... त्या मुळे उतरताना सगळे बिनधास्त उतरले आणि सामान प्रत्येका जवळ वाटून घेतले.... ते पाच जण होते...

 चाच्यांना पकडण्यासाठी पंचवीस पोलीस आली होती...

 समीर आणि मीरा एका कोपऱ्यातून छान शूटिंग करत होते.... 

तितक्यात एका चाच्याला समीर जिथे उभा होता तिथे हालचाल दिसली.... त्याने सगळ्या चाच्यांना खुणावले.... आता मात्र सगळेच सावध झाले होते....

 समीर आणि मिराच्या दिशेने ते चाचे येऊ लागले....

 आपण तर दिसलो पण मीरा आपल्या सोबत आहे हे कळू न देण्यासाठी समीर स्वतःहून समोर गेला.....

 सगळेच चाचे चवताळून समीरच्या दिशेने गेले.... 

एकंदर परिस्थितीचा अंदाज घेऊन इन्स्पेक्टर इनामदारांनी मागून चाचांवर हमला चढवला.... अश्या प्रकारे अचानक झालेल्या हल्ल्याला सगळेच घाबरून गेले.... सर्व पोलिसांनी त्यांना घेराव घातला आणि चाचे पोलिसांना शरण गेले.... एक विजय झाला... 

छोटी बातमी म्हणता म्हणता खूप मोठी ब्रेकिंग news झाली..... इन्स्पेक्टर इनामदार एकदम सेलिब्रिटी झाल्यासारखे झाले.... 

इकडे मीरा मात्र समीर वर खूप चिडली.... समीरला कारण समजेचना...

मग रागातच मीरा म्हणाली समीर असं कसं तू एकदम चाचाच्या समोर गेलास??  तूला तूझ्या जीवाची पर्वा नाही का?? तू विचार नाही केलास की तूला जर काही झाले तर माझं काय होईल.... रागारागात मीरा एकदम बोलून गेली..... 

समीर :अगं मीरा पण मी जर नसतो निघालो तर त्यांना तू देखील दिसली असतीस... मी हे कसं होऊ देऊ?? 

समीरने स्वतःचा जीव आपल्यासाठी धोक्यात घातला हे कळल्यावर मीरा मनातून खूप खूष झाली.... 
   क्रमश :
©®डॉ.सुजाता कुटे.

Circle Image

DR SUJATA KUTE

Medical officer

I am a doctor, working in govt hospital