ऍक्सीडेन्ट मिस्ट्री (भाग 6)

Samir met with sayli's father

समीरने त्याची अल्टो काढली आणि बँकेतून तडक सायलीच्या घरी निघाला...

पण हे काय रस्त्यात पून्हा त्याला तो मोटरसायकल वाला पाठलाग करत आहे अशी चाहूल लागली....

समीरने थोडी अल्टोची स्पीड कमी केली...  

पण पाठलाग करणारा हूशार होता त्याने लागलीच बाजूच्या गल्लीतून रस्ता बदलला.... 

समीरला आता एक गोष्ट समजली होती की आपल्यावर कुणीतरी पाळत ठेवत आहे.... आणि याला जर पकडला तर नक्की आपण सायलीच्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचू....

पण आता सायलीच्या पप्पाना भेटने जरुरी आहे... असा विचार करत समीर सायलीच्या घरी गेला... 

समीरचे वडील बागेतच झाडांना पाणी घालत होते.... 

सायलीचे वडील समीरला पाहून : कसं काय येणं केलं समीर... 

समीर : मला तुमच्याशी काही बोलायचं आहे.... 

सायलीचे पप्पा :चल घरात बसून बोलू.... 

समीर : नाही, मला खाजगीत बोलायचं आहे.... सायली बद्दल... 

सायलीचे पप्पा : काय? 

समीरने आपला मोबाईल काढला आणि बँकेच्या transaction चा फोटो दाखवला.. आणि विचारलं... याचा काय अर्थ आहे??  इतके मोठे transaction आणि ते ही याच महिन्यातले.... आणि मला खात्री आहे की सायली सोबत घातपात झाला आहे... 

सायलीचे पप्पा : म्हणजे तूला काय म्हणायचे आहे समीर?? मी सायलीला??  अरे माझी मुलगी होती ती.... तिच्याबद्दल मी असं करेन का?? 

समीर :पण तूम्हाला आधी आमचे लग्न मान्य नव्हते ना... म्हणून वाटलं... 

सायलीचे पप्पा : आता कसं बरोबर बोललास तू.... तूला सायलीने काहीच सांगितले नाही का?? अरे मी तुमच्या नात्याला का नाही म्हणत होतो 

समीर : काय माहीती?? या महिनाभरात आम्ही बरोबर भेटलो तरी कुठे??  या शेवटच्या दहा दिवसात तर ती मला देखील नीट भेटली नाही.... 

सायलीचे पप्पा : अरे मी नाही म्हणत होतो कारण सायलीचे लग्न मी माझ्या मित्राच्या मुलाबरोबर ठरवले होते.... 

समीर : हा ते माहीती होते.... 

सायलीचे पप्पा : पण माझी एक चूक झाली की मी पर्सनल आणि प्रोफेशनल रिलेशन एकत्र केले.... पैश्यांचा व्यवहार झाला... बिझिनेससाठी मी माझ्या मित्राकडून वसंताकडून पन्नास लाख रुपये बिन व्याजी कर्ज म्हणून घेतले होते... पण सायलीला वसंताचा मुलगा अजित सोबत लग्न करायचे नव्हते.... तुझ्यासोबतच करायचे होते.... म्हणून मग मी माझी आवडती शेतजमीन विकली आणि पन्नास लाख रुपये आले....

 पण ह्या सगळ्यामध्ये वसंताचा अहंकार दुखावला गेला आणि त्यांनी दोन दिवसात चार लाख रुपये व्याज म्हणून पूर्तता कर अशी अट घातली.... ना इलाजाने मला सायलीला माझा व्यवहार सांगावा लागला आणि मग सायलीने ते पैसे माझ्या अकाउंटला जमा केले....

 अरे समीर उलट मी इतकी मोठी पाऊले उचलली आणि तू म्हणतोस की मी??  सायलीच्या पप्पाना एकदम रडू कोसळले....... 


समीर : मला माफ करा पप्पा, सायलीच्या जाण्याने मी पूरता बिथरलोय... काहीही विचार करू लागलोय.... पण एक सांगू का?  सायलीचा अपघाती मृत्यू नाही... तीचा खून केलाय कुणीतरी??  

मग त्याने पाठलाग करणाऱ्या व्यक्तीबद्दल सायलीच्या पप्पाला सांगितले...

सायलीचे पप्पा : समीर खरंच जर तसं असेल तर आपण दोघे मिळून शोध लाऊ..... फक्त हिला आताच काही कळायला नको.... सायलीच्या जाण्याने हातपायच गाळून बसली आहे.... आणि तिच्यासाठी मला मात्र कणखर व्हावं लागलं.... 

समीर : हो पप्पा खरंच पून्हा एकदा सॉरी.... तूम्ही माझा आणि सायलीचा विचार केला.... आणि मीच तूमच्याविरुद्ध..... 

सायलीचे पप्पा : जाऊदे समीर तू हे सगळं माझ्या सायली साठी करत आहेस ना म्हणून सर्व गुन्हे माफ.... 

समीर : पप्पा तूम्हाला सायलीच्या या transaction बद्दल काही माहीती आहे का??  तिने ए टी एम मधून दहा वेळेस जवळ जवळ रोज दहा हजार रुपये काढले आहेत.... 

सायलीचे पप्पा : नाही बेटा... मी कधी सायलीच्या कमाई आणि खर्चाचा व्यवहार बघत नसे.... ती काय करते, कुठे खर्च करते वगैरे वगैरे.... 

सायलीला देखील आवश्यक वस्तूंपेक्षा जास्त खर्च करण्याची सवय नव्हती.... 

पण एक गोष्ट मला थोडी खटकली ती अशी की या दहा दिवसात ती पुरती बदलली होती.... रात्री उशीरा घरी येत असे... उलट उत्तर देत असे.... 

सकाळी विचारलं की कामाचा खूप ताण आहे असं सांगत असे.... मग मलाही ते खरं वाटलं.... 

समीर : हो पप्पा... ह्या दहा दिवसात सायली मला भेटलीच नाही... सतत काही बहाणा करून मला टाळत होती.... मला देखील कामाच्या ताणाचे कारण सांगून नीट बोलत नव्हती...फक्त फोन वर बोलायची.... 

मीही जरा news स्टोरी कव्हर करण्यात busy होतो म्हणून तिच्या चिडचिडकडे दुर्लक्ष केले.... पण सायली अचानक मला सोडून गेली.... डोळे पूसत.... येतो पप्पा म्हणून समीर तिथून निघाला.... 

क्रमश :
©®डॉ सुजाता कुटे

🎭 Series Post

View all