ऍक्सीडेन्ट मिस्ट्री (भाग 5)

Samir got information about bank account of sayli

समीर आणि मीराची news तर खूप छान कव्हर झाली होती.... त्याची क्लिप एडिट करून लागलीच समीरने आपल्या बॉसला पाठवली 

आता थोडंस रिलॅक्स होण्यासाठी म्हणून दोघेही जवळच्या रिसॉर्टवर जेवणासाठी गेले.... दोघेही रिसॉर्ट मधील swimming पूल साईडला जेवणासाठी बसले....तिथलं वातावरण अगदी आल्हाददायक होतं..... 

समीर : थँक्स," मीरा "

मीरा : थँक्स ! कश्यासाठी?? 

समीर : आजच्या news कव्हरमुळे मला एक वेगळंच सकारात्मक फील येत आहे.... आणि इथे जरा बरं वाटत आहे मागील दोन दिवसापासून आलेला ताण बऱ्यापैकी कमी झाला... आता मी पूर्ण ताकत लाऊन सायलीच्या अपघाता बद्दल माहिती काढू शकतो.... 

मीरा : समीर तूला खरंच असं वाटतं का की सायलीचा अपघाती मृत्यू नाही?? 

समीर : वाटतं??  मला तर खात्री आहे..... 

मीरा : अच्छा ?  मग माझी काही मदत लागली तर नक्कीच सांग.... मी हजर होईल 

समीर : हो गं....  मी एकटा काय करू शकणार आहे....मी आजपासून कामाला लागणार आहे.... बघतोच ते.... कोण आहे?? 

जेवण उरकून समीर पहिले मीराला सोडायला गेला आणि नंतर स्वतःच्या घरी गेला.... 

घरी गेल्या गेल्या फ्रेश होऊन समीरने त्याच्या फोनमध्ये असलेले बँक डिटेल्स काढले...... 

सुरुवातीला त्याला एकदम कमी transaction झालेले दिसले ते देखील नियमित होते... नेहमीसारखे होते.... 

 पण अलीकडे महिनाभरात दोन प्रकारचे transaction त्याला संशयास्पद दिसले... 

पहिलं transaction हे जवळ जवळ दोन लाखांचे होते तेही दोन वेळेस एकाच अकाउंटला जमा झालेले.... 

आणि दुसरे सायली जाण्याच्या जवळपास 10 दिवस आधीपासूनचे रोज दहाहजार रुपये ए. टी. एम.  मधून काढलेले दिसत होते.... 

समीरला आता आपण निवडलेला मार्ग योग्य वाटायला लागला होता......

ते अकाउंट कुणाचे आहेत याचा तपास तो दुसऱ्या दिवशी करणार होता.... 

इन्स्पेक्टर इनामदारांना फोन लाऊन समीरने विचारले : सर सायलीचा व्हिसेरा राखून ठेवला आहे का?? 

इनामदार : हो 

समीर :कृपया तो नष्ट करू नका.... आपल्याला एखाद्या वेळेस सायलीची फाईल पून्हा ओपन करावी लागेल... 

इनामदार :काही पुरावा मिळालाय का? 

समीर :सध्या तर नाही पण संशयास्पद लागलंय हाती.... पुरावा मिळालाकी लागलीच येतो घेऊन... 

इनामदार (स्वगत ):फोन ठेवून, हा समीर आता या केसचा पूरता फडशा पडणार.... 

खरंच जर सायलीला कुणी मारलं असेल तर आता त्या व्यक्तीचं काही खरं नाही.....असं म्हणत मंद स्मित केलं... 

समीर आता थोडा बिनधास्त झाला होता जणू सायलीच्या अपघाताची कडीच त्याला सापडली होती... आपली दिशा आता योग्य आहे असे त्याला पक्के वाटायला लागले होते..

असा विचार करत करत समीरला शांत झोप लागली.... सकाळी लवकरच उठून समीर नेहमीसारखा walk घेऊन आला... 

आल्यावर चहा नाश्ता करून त्याने त्याचा दिनक्रम आखला....

 फोनवरच त्याने ए.टि. एम. विषयी माहिती काढायला सांगितली.... 

जे मोठे transaction झाले त्यांची माहीती काढण्यासाठी आता तो बँकेत जायचे ठरवले... 

घराच्या बाहेर अल्टो मध्ये बसताच समीरला कुणीतरी लपून बघतंय असा भास झाला.... आता समीर थोडासा सावध झाला..... त्याने त्याची नजर हळुवार इकडे तिकडे फिरवली.... पण त्याला कुणी दिसले नाही...

मग त्याने अल्टो चालू केली आणि बँके कडे जाऊ लागला.... 

जाता जाता समीरला कुणीतरी मोटरसायकल वर आपला पाठलाग करत आहे असं जाणवलं.... समीरने अल्टोची स्पीड कमी केली.... मोटरसायकल स्वाराने त्याची दिशा बदलली..... 

 समीर पून्हा बिनधास्त झाला नी बँकेत पोहोचला....... 
 
बँकेच्या मॅनेजरला भेटून त्याने अकाउंटची माहीती काढली... 

चार लाख रुपये??  दुसरे तिसरे कुणी नाही सायलीच्या पप्पा च्या अकाउंटला जमा झाले होते.... 

ते बघून समीर एकदम गोंधळला.... काय??  सायलीचे पप्पा ! हा आता कळत आहे त्यांनी सायलीचा फोन रीसेट का केला ते?? 

पण ते आणि सायलीला???  कसं शक्य आहे?? का नाही त्यांना आमचे नाते मान्य नव्हते आधी... हे कारण असेल का?? पण मग त्यांनी सायलीपेक्षा मला ईजा पोहोचवली असती ना??  समीर विचाराने पूरता गोंधळून गेला.... 

काहीही असो आता मी सायलीच्या पप्पाना जाब
 विचारणार.... असं ठरवून समीर सायलीच्या घरी निघाला 

     क्रमश :
©®डॉ.सुजाता कुटे

🎭 Series Post

View all