ऍक्सीडेन्ट मिस्ट्री (भाग 2)

Introduction of samir

समीर हाडाचा पत्रकार होता. एका news चॅनेल वर तो प्रेस रिपोर्टर म्हणून काम करायचा. पण त्याचे गुप्तहेरी डोके त्याला स्वस्थ बसू देत नसे.... 


त्या मुळे कुठलीही बातमी कव्हर करताना तो त्या बातमीच्या तळाशी जाऊन मगच ती  प्रसारीत करत असे....कशालाही भीत नसे....  


समीरला पत्रकारिता करून नुकतेच सहा महीने झाले होते.... 


पण समीरने त्याच्या news चॅनेल ची टी आर पी चार पटीने वाढवली होती.... 


अल्पावधीतच समीर फेमस प्रेस रिपोर्टर बनला होता.... समीरच्या बोलण्याने त्याच्या वागण्याने  आणि त्याच्या बातमी देण्याच्या पद्धतीने तो अधिकाधिक फेमस होत चालला होता..... 


समीरची पब्लिसिटी दिवसेंदिवस  वाढत चालली होती.... इतकंच काय इन्स्पेक्टर इनामदार देखील समीरचे फॅन झालेले होते...... 


समीरचे बॉस तर त्याच्यावर जाम खूष होते..... समीर देखील त्याच्या कर्तव्यात कुठलाच कसूर करत नसे... दिलेल्या वेळा देखील तो व्यवस्थित पाळत असे.... 


सुरुवातीला समीरची होणारी प्रगती बघून त्याचे सहकारी त्याच्यावर खूप जळत असत..... समीरने हे हेरले....


मग समीरने एक युक्ती शोधून काढली.... कुठल्याही बातमीच्या तळाशी जाताना त्याला एकट्याने काम जमत नसे.... अश्या वेळेस त्याचे विश्वासू सहकारी यांना तो त्याच्या बॉसच्या परवानगीने कामावर नेत असे..... साहजिकच वाढलेल्या टी आर पी चा फायदा सर्वाना मिळत असे.... 


समीरच्या या वागण्याने मात्र आता त्याच्या ऑफिसमध्ये दोन गट तयार झाले होते.... 

एक समीरचा सहकारी गट आणि एक समीरचा विरोधी गट.... 


तरी देखील समीर त्या विरोधी गटाला पुरून उरेल असा होता.... 


तो त्यांचा वापर भ्रष्ट किंवा राजकारणी मंडळीच्या बातम्या कव्हर करण्यासाठी घेत असे.... 


त्याला वाटायचं चोराच्या हातात जर आपण चावी दिली तर चोर चोरी करणार नाही.... 


या हेतूने तो त्यांना काम लावत असे.... त्या मुळे त्याचा तो फॉर्मुला पण यशस्वी झाला होता...


समीरच्या अश्या शैलीमुळे त्याचे बॉस देखील निश्चिन्त झाले होते..... ज्या लोकांकडून बॉसला देखील काम करून घेता येत नव्हतं त्या लोकांना देखील त्यांच्या कळत नकळत समीरने कामाला लावले होते... 


समीरचा आराम झाला.... त्याने ठरवले की आता जोपर्यंत सायलीच्या अपघाताचे रहस्य जो पर्यंत कळत नाही, तो पर्यंत सुट्टी टाकायची..... 


समीर बेडरूमच्या बाहेर आला...आईला चहा दे असं सांगून तो तयार व्हायला लागला.... 


समीरच्या आईवडिलांना तो नेहमीसारखा वाटल्याने आनंद झाला... त्यांनी मग सायलीचा विषय काढायचा टाळला... 


तयार होऊन समीर मग ऑफिसला निघून गेला.... 

समीरचे बॉस त्याची आतुरतेने वाट पहात होते.... 


समीर :सर मला दहा दिवसांची सुट्टी हवी आहे.... 


बॉस :सुट्टी?? असं म्हणून समीरचे बॉस शांत बसला .. आणि विचार करू लागला ... समीरची एकही दिवसाची सुट्टी आपल्या news चॅनेलला परवडणारी नाहीये....आताच तर कुठे आपला news चॅनेल फॉर्म मध्ये आलाय.... 

आणि समीरला म्हणाला "समीर "कशासाठी हवी आहे तूला सुट्टी?? 


समीर :माझं वयक्तिक काम आहे..... आणि सर सायलीच्या अचानक जाण्याने मी सध्यातरी काही काम करण्याच्या मानसिक स्थितीत नाहीये..... 


बॉस :समीर मी समजू शकतो.... पण खरं सांगू का तूझी आम्हाला आता खरी गरज आहे.... यात काही सुवर्णमध्य नाही साधता येणार का?? मी तूला कुठलीही गोष्ट कंपलसरी नाही करत.... पण तू पूर्णतः गैरहजरही राहू नकोस.... तरच आपलं चॅनेल मॅनेज होईल.... 


समीर :सर आता मी काय बोलू.... ठीक आहे जितकं जमेल तितकं मी काम करेल पण मला माझं थोडं वयक्तिक काम करायचं आहे.... त्या वेळेस मी कधीही इथून जाईल... खरंच ते काम देखील तितकेच महत्वाचे आहे म्हणून मला असे वागावे लागणार..... 


या अश्या पद्धतीने काम करण्याच्या अटींवर बॉसने समीरला ढील दिली होती... 


समीरवर जळणारे सहकारी मात्र अजूनच त्यांचा जळफळाट होत होता.... 

क्रमश :

©®डॉ सुजाता कुटे 


  

🎭 Series Post

View all