Oct 31, 2020
कथामालिका

ऍक्सीडेन्ट मिस्ट्री (भाग 10)

Read Later
ऍक्सीडेन्ट मिस्ट्री (भाग 10)

समीर : पण सायली तर कधी असे मादक द्रव्य प्राशन करणं अशक्य.... ती सगळ्या अश्या पदार्थापासून चार हात दूरच राहात असे.... इनामदार साहेब, "आता तरी तूम्ही मला सायलीच्या फोन चे डिटेल्स काढून द्या ना, कदाचीत काही क्लू मिळेल.".. 

इनामदार : समीर तूम्ही सांगण्याच्या आधीच मी हे काम एकाला दिलं आहे... तासाभरात फोन डिटेल्स मिळतील... तो पर्यंत थोडं धीर धरा.... 

समीर : बरं झालं तूमचा फोन आला नाहीतर मला असे वाटत होते की मी हरलो.... माझी इतकी मेहनत वाया गेली.... 

शरद : पण साहेब मला खात्री होती तूम्ही जिंकणारच.... 

समीर प्रथमच शरदकडे पाहून खूष झाला.... त्याच्यावर चिडला नाही.... 

तितक्यात फोन डिटेल्स आले... समीरने ते बघितले की मटकन खाली बसला.... समीरने ते फोन डिटेल्स तीन ते चार वेळा तपासले...." मीरा !कसं  शक्य आहे? "असं मनात विचार करायला लागला... 

समीर मीराबद्दल विचारच करत होता की तितक्यात समीरचा फोन वाजला.... तो फोन मीराचाच होता... आता मात्र समीरची मीराकडे पाहण्याची नजर बदलली.... रागानेच समीरने फोन उचलला... 

मीरा : अरे समीर तूला आपल्या ऑफिसला यायचं नाही का? 

समीर :मी जरा कामात होतो... 

मीरा : बरं ते जाऊ दे.... संध्याकाळी फ्री आहेस का? मला थोडं महत्वाचे बोलायचे होते... 

समीर :हो, आहे मी फ्री... किती वाजता भेटू ते सांग?? 

मीरा : संध्याकाळी सहा वाजता.... मीराला समीर तुटकपणे बोलतोय हे थोडे जाणवले.... पण मीरा मात्र एक वेगळे स्वप्न रंगवत होती.... समीरला स्वतःच्या मनातलं सांगण्याचा विचार करत होती.... 

इकडे समीरला सायलीला मारण्याचा हेतू स्पष्ट होत नव्हता... काय स्वार्थ असेल मीराचा?? आणि ती तर माझी काळजी घेत होती ती अशीकशी वागली.... खरंच मीरा अशी वागू शकेल?? 

इनामदार : समीर साहेब काय झालं?? इतके अस्वस्थ का झालात?? 

समीर :हे डिटेल्स बघा.... अपघाताच्या दिवशी शेवटचा कॉल मीराचा आहे... मीरा सायलीला ओळखत होती हे देखील मला माहीती नाही.... आणि आज चक्क तिचं नाव दिसत आहे.

शरद : बघू बघू.... इनामदारसाहेब ही डिटेल्स लिस्ट मला द्याल?? 

इनामदार : हो, घे ना... अभ्यास कर याचा... 

समीरच्या शरीरात त्राण उरले नव्हते... तो खूप दुखावला गेला होता.... त्याने स्वप्नात देखील मीरा असं काही करेल असा विचार केला नव्हता....आता संध्याकाळी सहा वाजण्याची तो वाट पाहू लागला....

संध्याकाळी सहा वाजण्याच्या आधीच समीर ठरलेल्या ठिकाणी पोहोचला.... आणि मीरा येण्याची वाट बघत बसला... थोडया वेळात बरोबर सहा वाजता मीरा ठरलेल्या कॅफे मध्ये आली.... 

समीर थोडा रागातच मीरा कडे पाहू लागला... पण मीराच्या ते लक्षात आलं नाही.... 

मीरा : समीर मला तुझ्याशी महत्वाचे बोलायचे आहे.... 

समीर : काय?? 
मीरा : समीर आपण कॉलेज मध्ये असल्या पासून माझे तूझ्यावर खूप प्रेम आहे.... फक्त मी आता पर्यंत व्यक्त नाही करू शकले... 

समीर :मग आज कसंकाय?? 

मीरा :माझ्या प्राचिताईला माझ्या लग्नाची घाई झाली आहे...आणि तूझ्याशिवाय मी दुसऱ्या कुणाचा विचार नाही करू शकत समीर... 

समीर :म्हणून तू माझ्या सायलीला मारलस?? आता कळला तूझा स्वार्थ.... 

मीरा : मी आणि सायलीला?? समीर तूझं डोकं बिकं  फिरलं की काय?? मी का मारीन सायलीला?? 

समीर :कारण मी आणि सायली लग्न करणार होतो म्हणून... 

मीरा : वाह समीर वाह, तू मला इतकंच ओळखतॊस इतक्या वर्षांपासून??  अरे समीर मी प्रेम केलं आहे तुझ्यावर.... आजवर तूझा आनंद हा माझा आनंद मानलाय मी.... जरी तूम्ही दोघे लग्न करणार होते तरी खूष मी होते.... का तर तू आनंदी आहेस म्हणून.... आणि किती सहज तू मला अपराधी केलंस.... 

समीर :हे बघ मी एवढा मोठा आरोप सहजासहजी नाही करत आहे तूझ्यावर, पुरावा आहे माझ्याकडे... 

मीरा : पुरावा, कसला पुरावा?? 

समीर :अपघाताच्या दिवशी तू सायलीला अपघाताच्या काही वेळा पूर्वी फोन केलेला आहे... आणि त्या नंतर तीचा अपघात झाला... 

मीरा :काहीही काय?? मीराने तीचा फोन काढला.... अपघाताच्या दिवशीचे डिटेल्स समीरला दाखवत मीरा म्हणाली बघ समीर कुठे आहे सायलीचा नंबर??

समीर : तूझ्या फोन मधून डिलीट करायला असा कितीसा वेळ लागतो.... समीर रागातच बोलला.... इन्स्पेक्टर इनामदार येतीलच इतक्यात आणि तूला घेऊन जातील.... 

मीरा :काय?? खरंच वाह समीर खूप मोठं गिफ्ट दिलंस मी तूझ्यावर मनापासून प्रेम केलं त्याचे.... तूझा माझ्यावरचा विश्वास.... वा.... म्हणजे मी इतकं निस्वार्थी हेतूने तूझ्यासाठी केलं... तूझ्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवली नाही.... आणि तू??? माझ्यावर आरोप करून मोकळा झालास.... काय तर म्हणे इन्स्पेक्टर इनामदार ताब्यात घेणार आहे??? मीरा खूप खूप दुःखी झाली..... तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वहात होते.... 

तितक्यात शरद आणि इनामदार दोघेही त्या कॅफे मध्ये आले.... 

समीरचे मीराला काही बाही बोलणे चालूच होते... आणि मीराचे रडणे.... 

शरद : थांब समीर, तू मीराला काही म्हणू नकोस....मीरा दोषी नाहीये..... 

तितक्यात मीराने शरदला पाहिले,  त्याच्याकडे धावत गेली.... त्याला बिलगली आणि रडायला लागली.... 

 Guessing game 
कथानक संपत आलेले आहे.... आता मर्डर करणाऱ्या व्यक्तीचं नाव तूम्हाला कळणार आहे.... तूम्ही guess करू शकता का?? कुणी मर्डर केला असेल आणि का?? तुमचे guess कॉमेंट मध्ये टाका.... बघूयात कोण करेक्ट निघतं ते? 

क्रमश :
©®डॉ सुजाता कुटे 

 

Circle Image

DR SUJATA KUTE

Medical officer

I am a doctor, working in govt hospital