Oct 21, 2020
कथामालिका

ऍक्सीडेन्ट मिस्ट्री (भाग 1)

Read Later
ऍक्सीडेन्ट मिस्ट्री (भाग 1)

समीर खूप डिस्टर्ब झालेला होता... त्याला जगणे असह्य झाले होते.... 

त्याची सायली आता या जगात नाहीये हे त्याला पटतच नव्हतं.... 

समीर विचार करत होता.... कालच किती स्वप्ने रंगवली होती आम्ही....

 आमच्या दोघांच्याही घरी लग्नाला मान्यता मिळाली होती.... आणि आज हे....

 नाही हे मला पडलेलं एक वाईट स्वप्नच आहे.... हे खरं नाही असंच समीर स्वतःची समजूत घालत होता....
 
बॉडीचे पोस्ट मॉर्टम झाले आणि इन्स्पेक्टर इनामदारांनी सायलीचे शव सायलीच्या घरच्यांना घेऊन जायला सांगितले..... 

आक्रोश सुरु होताच पण आता तो जास्त वाढला...

  समीर भानावर आला.. आणि धाय मोकलून रडायला लागला.... म्हणायला लागला, अरे हे स्वप्न नाही सत्य आहे...  मी कसं मानू सायली तू या जगात नाहीयेस.... अशी कशी तू मला सोडून गेलीस... 

मी तरी आता का जगू म्हणत तिथेच दवाखान्यात हजर असलेली कैची त्याने उचलली.... 

तितक्याच शिताफीने इन्स्पेक्टर इनामदारांनी समीरचा हात पकडला... समीरची पकड ढिल्ली झाली आणि त्याच्या हातातील कैची खाली पडली.... 

इन्स्पेक्टर इनामदार :समीर भानावर ये... 

समीर :सर मी जगून काय करू?? किती स्वप्न बघितली होती काल, असं म्हणत त्याने हंबरडा फोडला ..... थोडया वेळाने स्वतःला सावरून पुन्हा समीर बोलला.... पण सर मला सविस्तर सांगाल का काय झालं होतं?? 

इन्स्पेक्टर इनामदार :अरे समीर बाजारातून कारमध्ये जात असताना जी एक दरी लागतेना तिथे सायलीच्या गाडीची स्पीड कंट्रोल मध्ये आली नाही आणि गाडी त्या दरीत कोसळली.... 

त्यातच सायलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.... हा पूर्णतः अपघाती मृत्यू आहे 

समीर : काय! अहो सर सायली त्या दरीच्या रस्त्याने कधीच घरी जात नाही.... नाही सर मला तर वाटतं काहीतरी काळं बेरं नक्कीच आहे.... हा अपघाती मृत्यू नाही... 

इन्स्पेक्टर इनामदार : एखाद्या वेळेस वाटलं असेल तीला या रस्त्याने जावं.... समीर तू खूप थकलेला दिसतोस.... घरी जाऊन आराम कर.... 

समीर :कसला आराम सर?  माझी सायली तर गेली.... आता अंतिम विधीत तर मला तिच्याजवळ जाऊद्या.... तिच्या घरच्यांना देखील मला थोडा मानसिक आधार द्यावा लागेल ना? ..... ठीक आहे येतो सर म्हणून समीर सायलीच्या घराकडे निघून गेला.... 

समीर आधल्या दिवसापासून घडलेला सगळा दिनक्रम आठवत होता.... ते आठवताना त्याला असं प्रकर्षाने जाणवत होतं की सायलीचा मृत्यू हा काही अपघाती मृत्यू नाहीये.... नक्कीच काहीतरी घातपात असावा.....

सायलीची ड्राइविंग इतकी परफेक्ट नव्हती की ती दरीच्या रस्त्याने गाडी चालवेल....

 तितक्यात समीरला आठवलं की सायलीने त्याला सांगितलं होतं की ड्राईव्हर सोबत असेल तरच ती निर्मनुष्य रस्त्यावर ड्राइव्हींग करत असे.... कारण ती नुकतीच ड्राईव्हींग शिकत होती.... 

आता मात्र विचार करून समीरला खात्रीच व्हायला लागली होती की हा अपघात नसून घातपात आहे.... 

इकडे अंतिम संस्काराची तयारी चालू होती.... तिथेच एका कोपऱ्यात सायलीचा भगवान ड्राईव्हर रडत उभा होता.... समीरने वेळ न दवडता ड्राईव्हर ला गाठले आणि विचारपूस करायला सुरुवात केली.... 

समीर : सायलीला परफेक्ट गाडी येत नव्हती मग तूम्ही सोबत कसं काय नाही गेले.... 

भगवान ड्राइव्हर : सर आहो मला फोन करून बोलावलं त्यांनी आणि घरी येऊन बघतो तर सायली ताई घरी नव्हत्या आणि कार पण..... 

समीर :पण इतकी गाडी एकटी घेऊन जाण्याची हिम्मत सायली ताई करतील का??? 

भगवान ड्राईव्हर : नाही साहेब,सायली ताई खूप घाबरायच्या.... मला हेच समजत नाहीये की काल संध्याकाळी त्यांच्यात इतकी हिम्मत कुठून आली?? मला साहेब हा मृत्यू अपघाती वाटत नाहीये..... 

हे ऐकून समीरचा विश्वास आता निर्ढावला... त्याला आता पक्की खात्री पटायला लागली की सायलीचा मृत्यू हा अपघाती नसून मर्डर आहे..... 
सायलीला साश्रूनयनांनी निरोप देत असतानाच समीर ने मनातल्या मनात शपथ घेतली.... 

तो जो कुणी आहे मी शोधून काढेल आणि त्याला शिक्षा झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही..... 

सगळे सोपस्कार झाल्यावर सायलीच्या आई बाबांना नमस्कार करून समीरने डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठलं.... 

इन्स्पेक्टर इनामदार तिथे आधीच हजर होते.....
समीर तडक त्यांच्या केबिन मध्ये गेला आणि म्हणाला सर सायलीचा मृत्यू हा अपघात नाही हो.... घातपात आहे.... 

इनामदार :काय पुरावा आहे?? आम्ही जागेचा व्यवस्थित पंचनामा केला... तिथे संशयास्पद असं काहीच नाहीये.... 
तो एक अपघातच होता आणि सायलीच्या मृत्यूची नोंद अकस्मात मृत्यू म्हणूनच झाली आहे..

समीर :अहो सर पण सायली कधीच स्वतः एकटी असताना ड्राइव्ह करत नसे.... हे संशयास्पद नाही का?? 

इनामदार :आमच्या दृष्टिकोनातून तर नाही आणि समीर तू घरी जाऊन आराम कर.... सायलीची फाईल केव्हाच क्लोज झाली आहे..... 

समीर  चिडून  :क्लोज?? हा तर अन्याय आहे.... ठीक आहे सर तूम्हाला पटत नाही ना माझे म्हणणे नको पटू देत... एक दिवस तूम्हाला नक्की खात्री होईल.... मी काय म्हणतोय ते पटेल.... भलेही तूमच्या दृष्टीने ही फाईल क्लोज झाली असेल माझ्या दृष्टीने ती जेव्हा सत्य काय ते कळेलच तेव्हा क्लोज होईल..... 

इतकं बोलून समीर तिथून निघून गेला..... 

का कुणास ठाऊक पण इनामदारांना देखील समीर सच्चा वाटत होता.... पण पुराव्या अभावी आणि सरकारी नियमांपुढे त्यांचे हात बांधले होते....जर समीर नी काहीतरी खरंच पुरावा आणला तर आपण नक्की त्याला मदत करू असा विचार करून इनामदार पुढच्या कामात व्यस्त झाले... 

इकडे समीर त्याच्या घरी गेला....घरी गेल्यावर आई वडिलांना पाहून त्याला अजूनच गलबलून आले.... तरीही स्वतःचा चेहरा झाकून तडक त्याच्या बेडरूमच्या बाथरूम मध्ये घुसला.... बाथरूम मध्ये शॉवर ऑन करून त्याने पून्हा अश्रूंना वाट मोकळी करून दिली... 

समीरचे आई वडील त्याची बेडरूम मधून बाहेर येण्याची वाट पहात होते.... 

तितक्यात समीर हॉल मध्ये आला.... सरळ जाऊन आईच्या कुशीत शिरला.... रडत रडत म्हणायला लागला.... काय होऊन बसल गं हे आई..... 

समीरची आई : त्याच्या मर्जी पुढे आपलं काय चालतंय समीर?? नको असा हतबल होऊस समीर.... आम्ही कुणाकडे बघायचं?? 

समीरचे वडील : समीर हे बघ तू आज खंबीर असणं गरजेचे आहे... नाहीतर आम्ही कोलमडून पडू.... 

समीर : बाबा तूम्हाला माहिती आहे का?? मला असं पक्क वाटत आहे की सायलीचा मृत्यू हा अपघाती नाही..... हा घातपात आहे..... 
समीरचे बाबा एकदम आश्चर्याने.... काय?? 

समीर :हो बाबा, जी कार ड्राईव्हींग मध्ये एक्स्पर्ट नाहीये ती एकटीच कार घेऊन जाते.... जो की तीचा नेहमीचा रस्ता नाहीये.... 

समीरचे बाबा : ह तूझी शंका खरी वाटते.... पण??? 

समीर : बाबा जाऊद्या खूप थकलोय आज..... उद्या बोलू.... मी जरा आराम करतो.... 

असं म्हणून समीर आपल्या बेडरूम कडे गेला.... 

क्रमश:
©® डॉ.सुजाता कुटे

Circle Image

DR SUJATA KUTE

Medical officer

I am a doctor, working in govt hospital