स्नेहा एकदम बाजूला जाऊन थांबली, तिला भूषणची साथ हवीहवीशी वाटत होती पण ती तिच्या मनाला समजावत होती कि आता मागे नाही हटणार, मी भूषण शिवाय जगूच शकते, तिने एक सुस्कारा सोडला आणि विवेकची वाट पाहू लागली.
भूषणला स्नेहाची चलबिचल समजत होती, पण सध्या तिला काही समजावण्यात अर्थ नव्हता कारण ती जितकी भोळी, निरागस तितकीच हट्टी होती.
इकडे विवेक मायासोबत गड चढत होता, खूप दिवसांनी ते एकत्र होते त्यामुळे ते दोघेही खूप खुश होते, मनोमन विवेकाने भूषणचे आभार मानले.
सगळेजण मनसोक्त गडावर फिरले आणि सगळ्यांना आता भूक लागली होती, गडाच्या एका दिशेला तिथल्या गावकर्यांनी जेवणाची सोय केली होती, चुलीवरचे पिठले भाकर असा मस्त बेत होता, सगळ्यांनी मनसोक्त जेवण केले आणि थोडा वेळ आराम करून परत फिरायला निघून गेले.
माया आणि भूषण आपल्या विश्वात मस्त असल्यासारखे फिरत होते, असे ते भासवत होते पण भूषणचे लक्ष स्नेहाकडे होते, आणि त्यांना पाहून स्नेहाचा चेहरा रागाने लाल होत होता.
विवेक स्नेहाला म्हणाला, भूषण आणि माया छान दिसतात ना सोबत, तुला काय वाटते?
"हम्म" स्नेहा इतकेच बोलली, पण तिचे मन आज सैरभैर झाले होते, काय होत आहे मला, का मी भूषणला दुसऱ्या कोणासोबत पाहू शकत नाही, माझे चुकत आहे काय? मी विवेकच्या बाबतीत काही चुकीचे वागत नाही आहे ना? काय करू?
"हम्म" स्नेहा इतकेच बोलली, पण तिचे मन आज सैरभैर झाले होते, काय होत आहे मला, का मी भूषणला दुसऱ्या कोणासोबत पाहू शकत नाही, माझे चुकत आहे काय? मी विवेकच्या बाबतीत काही चुकीचे वागत नाही आहे ना? काय करू? .
मी जरा याठिकाणी बसते तुम्ही फिरून या. स्नेहा
बरं वाटत नाही आहे काय? काय झाले? विवेक
मी ठीक आहे, तुम्ही जा. स्नेहा
ओके, मी पण थांबतो तुझ्यासोबत. विवेक
अरे, फक्त एक तास राहिला आहे, तुम्ही फिरून या, मी इथे बसूनच निसर्गाचा आनंद घेईन. स्नेहा काहीतरी कारण सांगायचे म्हणून बोलली, खरंतर तिला थोडा एकांत हवा होता, तिला मनाला शांत करायचे होते.
ठीक आहे, पण इथून कुठेही जाऊ नको, आम्ही परत इथेच येतो त्यावेळी एकत्रच निघू , ठीक आहे? विवेक
"हम्म" स्नेहा.
ते सगळे निघून गेले, पण भूषण तिथेच थोड्या अंतरावर थांबला होता, त्याने विवेकाला सांगितले कि तू मायासोबत जा, मी इथे थांबतो.
स्नेहा दूरवर शून्यात नजर लावून बसली होती आणि तो एकटक स्नेहाकडे बघत उभा होता, तो मनातच बोलत होता, इतके सहज, सरळ जीवन होते आणि माझ्यामुळे इतके गुंतागुंतीचे होऊन बसले, मला माझी आधीची स्नेहा कधी भेटेल? त्याच्या डोळ्यामध्ये हलके अश्रू जमा झाले पण त्याने स्वतःला सावरले. आणि मनामध्ये निश्चय केला कि आता स्नेहाशी बोललेच पाहिजे.
हाय स्नेहा. भूषण
तू इथे, तू नाही गेलास का फिरायला? स्नेहाने हलकेच अश्रू पुसले आणि स्माईल करत म्हणाली
तू पण नाही गेलीस ना, भूषण
माया छान आहे. लकी गर्ल, तू नक्कीच तिला खुश ठेवशील. स्नेहा
पण मला लकी बॉय बनायचं आहे? भूषण
म्हणजे? तिने न समजून त्याला विचारले.
जर मला तू माझ्या जीवनात आलीस तर मी नक्कीच 'लकी बॉय' बनेन, भूषण
तिला काय बोलावे तेच समजत नव्हते, पण ती शब्द एकटवुन म्हणाली, आता ते शक्य नाही, मी आता माझ्या घरच्यांना आणि विवेकला दुखवू शकत नाही
अरे, तू का स्वतःला इतके त्रास देत आहेस, तुला माहित आहे अजूनही तुझे माझ्यावर प्रेम आहे, मग का हा अट्टहास, खरंतर तू विवेकाशी लग्न केलीस तरी तुम्ही दोघेही आनंदात राहाल का? तू स्वतःचा विचार कर ना? भूषण
मी स्वार्थी नाही बनू शकत? स्नेहाने त्याच्यापासून लांब जात म्हणाली
याला स्वार्थी म्हणत नाहीत स्नेहा. भूषणने पुढे जाऊन तिचा दंड पकडला आणि तिच्या डोळ्यात पाहत थोड्या चढ्या आवाजात म्हणाला.
मी तुला माझ्या प्रेमाबद्दल सांगितले होते तेंव्हा तुला मान्य नव्हते, स्नेहा
मी त्यासाठी तुझी क्षमा मागितली आहे, खरंच माझे चुकले पण यासाठी तू मला शिक्षा दे पण तू स्वतःला इतका त्रास नको करून घेऊ. भूषण
मी खुश आहे विवेकसोबत, तू नको काळजी करू, स्नेहा
ते मी इथं आल्यापासून पाहताच आहे, अजून किती खोटे बोलणार स्नेहा, तू स्वतःच्या मनाला विचार, तुला तुझे उत्तर मिळेल. भूषण
तू...... स्नेहा बोलतच होती कि तिच्या डोळ्यापुढे अंधारी आली आणि ती खाली कोसळणार इतक्यातच भूषणाने तिला पकडले आणि तिला सावरत खाली बसवले. आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागला.
स्नेहा, मला माफ कर, मी त्रास नाही देणार तुला, प्लिज उठ ना, असे म्हणत त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले, त्याने इकडे तिकडे पहिले तिच्या बॅग मधली पाण्याची बाटली घेतली आणि तिच्या चेहऱ्यावर पाणी मारले, तिने किलकिले करून डोळे उघडले, त्याने तिला पाणी प्यायला दिले आणि त्याने तिला घट्ट मिठीत घेतले, त्याच्याकाडून तिला सोडवतच नव्हते, स्नेहा सुद्धा त्याच्या मिठीत शांत होती, तिला खूप सेफ वाटत होते, थोड्यावेळासाठी ती सगळे विसरून गेली आणि त्याच्या मिठीत तिचे मन एकदम शांत वाटत होते.
भूषण अगदी काळजीने तिच्या डोक्यावरून हाथ फिरवत होता, थोड्यावेळाने स्नेहा त्याच्यापासून लांब झाली, भूषणने तिला उठवले आणि तिला आधार देऊन बसवले, आणि म्हणाला, काय झाले स्नेहा, तू स्वतःच्या तब्येतीकडे अजिबात लक्ष देत नाहीस, थांब आता तुला मीच भरवतो असे म्हणून त्याने त्याच्याकडे असलेले फ्रुट तिला भरवायला सुरुवात केली, आणि तिची काळजीपूर्वक विचारपूस करत होता, विचारपूस काय हक्काने रागावत होता आणि तिला सुद्धा हे हवंहवंस वाटत होते.
भूषण, मी ठीक आहे, तू प्लिज जा इथून, मला तुझ्याशी बोलायचे नाही. स्नेहा
ठीक आहे, जर मला भेटून तुला त्रास होणार असेल तर मी यापुढे तुला त्रास देणार नाही, कधीच तुझ्यासमोर येणार नाही पण तू खुश राहा.
भूषण बोलला पण तो आतून खूप तुटत होता,त्याला खूप बोलायचे होते पण त्याचे शब्द तोंडातून निघालेच नाहीत, स्नेहा स्नेहा कसे समजावू तुला, मी खूप प्रेम करतो तुझ्यावर, तू एकदा हो म्हण मग मी सगळे ठीक करेन, फक्त माझ्यासमोर तुझे मन मोकळे कर.
तू जा मी ठीक आहे, असे स्नेहा बोलली आणि तो एकदम भानावर आला
विवेक आला कि जाईन. भूषण निर्विकारपणे बोलला
तू जाणार नसशील तर मी जाते. स्नेहा
तुला बरं वाटत नाही आहे तू अराम कर थोडा वेळ, मी जातो. असे बोलून तो जाऊ लागला, भूषणला माहित होते स्नेहा आता ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.
स्नेहा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहू लागली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
तो पुढे चालत जात होता पण त्याचे लक्ष सगळे स्नेहाकडे होते, तो विचार करत करत पुढे जात होता, तो फक्त पाऊले टाकत होता पण लक्ष मात्र मागे होते,पुढे गडाच्या कडेला पुढे खोल दरी होती आणि निमुळता दगड होता तो त्याला दिसलाच नाही, तो आतून खूप तुटला होता त्यामुळे मागेपुढे न पाहता पाऊले उचलत होता, भूषण पुढे पाऊल टाकणार तोच....
"भूषण sssssss.." स्नेहा जोरात ओरडली म्हणजे बहुतेक किंचाळलीच
भूषण तिथेच थांबला आणि तो मागे वळला, स्नेहा पळतच आली आणि त्याला जाऊन बिलगली आणि खूप रडत होती, भूषण माझे खूप प्रेम आहे तुज्यावर, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय.... भूषणला तर समजतच नव्हते कि काय झाले.
ती खूप घाबरली होती, म्हणून तो तिला शांत करत होता, तिने घाबरतच समोर बोट केले, भूषणने पहिले तर पुढे थोड्या अंतरावर खोल दरी होती. ते पाहून भूषण पण शॉक झाला म्हणजे त्यालासुद्धा समजले नाही कि तो त्या दिशेला जात होता.
प्रिय वाचकहो, मला माहित आहे भाग टाकायला थोडा उशीर होतो आहे त्यासाठी खरंच सॉरी, आणि बाकी तुमच्या प्रतिक्रिया मला भेटल्या, तुम्ही दखल घेतल्याबद्दल धन्यवाद