आज भूषण भलताच खूष होता, तो घरी आला सगळ्यांसोबत जेवण करून तो रूम मध्ये आला आणि पुढे काय करायचे याचा विचार करू लागला. आता स्नेहाला कसे मनवायचे? ती तरी खूप हट्टी आहे, एकदा ठरवले की ती मागे फिरत नाही कायम दुसर्यांचा विचार करते पण चूक तर माझीच आहे, मी तिला समजून घ्यायला हवे होते, त्या दिवशी तिला उत्तर न देता आलो होतो, तिच्या मनाचा जराही विचार केला नाही, मनातून किती तुटली असणार ती.. हा सगळं विचार त्यांच्या मनात आला आणि त्याचे डोळे पाणावले.
त्याला स्नेहाशी बोलायची इच्छा झाली आणि लगेच त्याने तिचा नंबर डायल केला पण परत त्याने हा विचार झटकला, आज ती खूप हर्ट झाली असेल कॉल केला तर परत तिला त्रास होईल, तसेही तिला थोडा वेळ देऊ, ती थोडी शांत होईल....त्याने मनामध्ये काहीतरी ठरवले आणि स्नेहाची आठवण काढत झोपी गेला.
दुसऱ्या दिवशी त्याने विवेकला कॉल केला आणि भेटायला बोलावले, आणि काही गोष्टींची कल्पना दिली. तसा विवेक त्याला भेटायला रेस्टोरंट मध्ये आला. भूषण आधीच तिथे त्याची वाट पाहत होता आणि दोघांनी कॉफीची ऑर्डर दिली.
बोल भूषण कसे काय माझी आठवण काढली? काल जेंव्हा आपण भेटलो होतो तेंव्हा तर खाऊ की गिळू असे माझ्याकडे बघत होतास. विवेक हसत बोलला
सॉरी विवेक, अरे मलाच समजत नाही की मी इतका पोसेसिव्ह कसा झालो आहे, आणि माझ्या मनात तुझ्याबद्दल वेगळेच मत निर्माण झाले होते. भूषण बोलला
ठीक आहे मी फक्त मजाक करत होतो. तर बोल काय काम होते. विवेक
मला स्नेहा बद्दल तुझ्याशी थोडे बोलायचे आहे, तुला आमच्याबद्दल स्नेहाने सांगितलेच आहे आणि काल तर तुला समजले आहे की स्नेहा या लग्नासाठी मनापासून तयार नाही आहे आणि मी मान्य करतो की माझी चूक झाली आहे आणि मला ती सुधारायची आहे. मी कोणताही निर्णय तुझ्यावर लादणार नाही पण मला इतकेच म्हणायचे आहे की या लग्नानंतर तुम्ही दोघेही खूष राहू शकणार नाही म्हणून तू विचार कर. भूषण
मग काय करण्याचा विचार केला आहेस. जर स्नेहा तुला नाहीच बोलली तर आणि समज ती तयार झाली आणि तिच्या घरच्यांना तुमचे नाते मान्य झाले नाही तर? तुम्ही पळून वैगेरे.... विवेक
विवेक त्याच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत होता, भूषण शांतपणे ऐकत होता तो कधीच त्याचे मनातील भाव चेहऱ्यावर आणत नसे.
नाही पळून लग्न करण्याचा पर्याय माझ्याकडे नाही, स्नेहाला माझी बायको बनवून आणेन तेही अगदी मानाने सगळ्यांच्या समंतीने. भूषण
पण कसे, जर तुम्हाला घरून परवानगी मिळालीच नाही तर, विवेक
मी माझे 100% प्रयत्न करणार, आणि जर माझे प्रेम खरे असेल तर स्नेहा मला नक्की मिळेल, मला फक्त तुला इतकेच सांगायचे होते की जरी तू स्नेहाची योग्य असलास तर स्नेहाच्या मनाविरुद्ध लग्न होत असेल तर मी हे लग्न होऊ देणार नाही. भूषण एकदम आत्मविश्वासाने बोलत होता
हे ऐकून विवेकला पण बरे वाटले, इतका वेळ तो फक्त भूषणच्या मनात नक्की काय आहे, वेळ आल्यावर स्नेहा;ला एकटे तर सोडणार नाही ना हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता आणि भुषणचे जे काही बोलला त्यासाठी त्याला खूप आनंद झाला कारण त्याला खरंच त्यांना मिळवायचे होते कारण आपले प्रेम आपल्याला भेटले नाही तर किती दुःख होते ते विवेकला चांगलेच माहित होते.
विवेक भूषणला म्हणाला, तुमच्या प्रेमाला माझा पाठिंबा आहे फक्त स्नेहाला कसे मनवायचे तू बघ बाकी मी बघतो.
भूषणने त्याच्याकडे चमकून पहिले, विवेक असे काही बोलेल हे भूषणला अनपेक्षित होते
तुझे कुणावर तरी खूप प्रेम आहे ना? भूषण बोलला तसे विवेकच्या चेहऱ्यावर एक प्रकारची वेदना त्याला दिसली
तुला कसे माहित ? चेहरा निर्विकार ठेवून विवेक बोलला.
तू आम्हाला समजून घेतलास आणि असे तोच करू शकतो जो कुणावरतरी खूप प्रेम करतो.
मग विवेकने भूषणला त्याच्या आणि मायाबद्दल (माया म्हणजे विवेकची मैत्रीण) , त्यांच्या प्रेमाबद्दल आणि घरी असलेला विरोध हे सगळे सांगितले आणि हे ऐकून भूषणला वाईट वाटले पण तो बोलला आपण तुला मदत करणार, काळजी करू नको सगळे ठीक होईल, आपण टप्प्या टप्प्याने सगळे ठीक करूया.
अरे पहिला स्नेहाला मनवयाला हवे, यापासून सुरुवात केली पाहिजे. विवेक
भूषण बोलला, हो माझ्याकडे एक आयडिया आहे, स्नेहा काय माझ्याशी नीट बोलत नाही तर तू तिला रविवारी तुझ्यासोबत फिरायला घेऊन जा आणि ........ सगळा प्लॅन समजावून सांगितला, दोघेही या प्लॅनवर खूष झाले आणि कॉफी पिऊन निघून गेले.
सॉरी वाचकहो तुमच्या कंमेंट मला मिळाल्या पण हि माझी कथा लिहिण्याची पहिलीच वेळ आहे म्हणून खूप विचार करून मला प्रसंग लिहावे लागत आहेत यावेळी फक्त समजून घ्या, पुढचा ब्लॉग मोठा टाकेन.
तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा