भूषण आणि विवेकने ठरविल्याप्रमाणे रविवारी सगळे फिरायला जाणार होते, विवेकने स्नेहाच्या आईबाबांची परवानगी घेतली आणि स्नेहाला सुद्धा त्याने मनवले.
रविवारी सकाळीच विवेक स्नेहाला घ्यायला आला आणि तशी स्नेहा आईबाबांचा निरोप घेऊन बाहेर पडली.
ते त्यांची कार घेऊन निघाले आणि स्नेहाला पण छान वाटत होते... बरेच दिवस असे मोकळे फिरायला ती गेली नव्हती. तिने विवेकाला विचारले, आपण कुठे चाललो आहे, मी कितीवेळा विचारले पण तू काही सांगतच नाहीस.
अरे थोडा वेळ थांब ना आपण पोहचणारच आहे तेंव्हा तुला कळेलच.. विवेक
थोड्याच वेळात ते एका गडाच्या पायथ्याशी पोहचले तसे स्नेहाचे एक्स्प्रेशन बदलले, तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता आणि विवेक ते पाहत होता.
आपण इथे गडावर.. स्नेहा
हो, आपण ट्रेकिंग करणार आहोत . विवेक
अरे मला गड आणि ट्रेकिंग खूपच आवडते. तू फिरण्यासाठी जागा मात्र छान निवडली आहेस.. स्नेहा
मग प्लॅन कुणाचा आहे, तुझ्या आवडी निवडी एकजण खूप मनापासून जपतो आहे आणि हे तुलाही लगेच जाणवेल, विवेक स्वतःशीच बोलत होता आणि स्नेहाने चुटकी मारून त्याची तंद्री भंग केली.
मग कसा वाटला प्लॅन, चला आपण जाऊ, तिथे ट्रेकिंगसाठी नाव नोंदवू म्हणजे आपल्याला सेफ्टीसाठी जे लागेल ते मिळून जाईल.
ते नाव नोंदवून आले आणि पंधरा मिनिटांनी ट्रेकिंग सुरु होणार होते, त्यासाठी लागणारी तयारी ते करून वाट पाहू लागले, स्नेहा आजूबाजूचा परिसर न्याहाळत होती आणि अचानक तीची नजर एका ठिकाणी थांबली, ती एकटक तिकडे पाहत होती, तिच्या डोळ्यामध्ये प्रेम, राग, जेलसी असे मिश्र भाव दिसत होते. विवेक तिला आवाज देत होता तरी तिचे लक्ष नव्हते म्हणून स्नेहा जून दिशेला एकटक पाहत होती त्यानेसुद्धा तिकडे पहिले आणि समोरून भूषण येत होता आणि त्याच्याबरोबर एक मुलगी सुद्धा होती.
आणि आता स्नेहाचे एक्स्प्रेशन पाहून विवेकाला सुद्धा हसू येत होते. पण तो स्वतःचे हसू दाबत म्हणाला, स्नेहा, काय झाले मी तुझ्याशी बोलतोय.
अरे सॉरी, बोल ना काय म्हणत होतास. ती स्वतःला सावरत बोलत होती.
तिचे लक्ष मात्र भूषणकडे होते, एरवी तिला काही वाटत नव्हते पण आज भूषणला दुसऱ्या मुलीसोबत पाहून तिला दुःख होत होते.
हाय विवेक, हाय स्नेहा, तूम्हीही इकडे फिरायला आलात, आणि फक्त फिरणार की ट्रेकिंग पण करणार? भूषण त्यांच्याकडे येत म्हणाला
हाय भूषण, आम्ही पण ट्रेकिंग करणार आहे. बरं झाले तुम्हीपण पण भेटला, आता सोबतच ट्रेकिंग करू म्हणजे मज्जा येईल... हो ना स्नेहा? विवेक
पण स्नेहा तर भूषणसोबत आलेल्या मुलीकडे खाऊ कि गिळू या अविर्भावात पाहत होती, तिला पाहून विवेकला तर हसू येत होते पण त्याने कसेबसे स्वतःला कंट्रोल केले होते.
भूषणला पण हसू येत होते, स्वतःला सावरत त्याने ओळख करून दिली, ही माया (आपल्या विवेकची गर्लफ्रेंड) माझी मैत्रीण.
स्नेहाला आतून दुःख होत होते कारण भूषण कुठल्याही मुलीला फिरायला घेऊन जात नसे आणि ज्याअर्थी त्याने मायाला इकडे आणले म्हणजे त्यांचे नाते फक्त मैत्रीचे बिलकुल नाही तिचे दुःख तिने चेहऱ्यावर दिसू दिले नाही, ती स्वतःला समजावत होती, जर भूषण त्याच्या आयुष्यात पुढे जात आहे तर बरे आहे ना, आपण त्याच्यासाठी खुश व्हायला हवे पण मला का वाईट वाटत आहे काय होतय मला...
भूषण तिचे हावभाव टिपत होता आणि त्याला पण स्नेहाची अवस्था पाहून वाईट वाटत होते. तो मनातच म्हणाला, स्नेहा तुला असे पाहून मला पण त्रास होतो आहे पण थोडा काळ मग आपण एकत्रच असू. मला पूर्ण विश्वास आहे माझ्या प्रेमावर, तुझ्यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहे.
विवेकने कुणाला दिसणार नाही पाहून हळूच मायाला सुंदर दिसत आहेस असे हाताने खुणावले तशी ती लाजली. मायाला पण त्यांनी त्यांच्या प्लॅन मध्ये सामील केले होते, कारण त्यांना प्रेमाची जाणीव होती आणि मनापासून त्यांना स्नेहा आणि भूषणला मदत करायची होती आणि भूषणचे प्रेम मिळवण्यासाठीची जिद्द पाहून त्यांना सुद्धा त्यांचे प्रेम मिळवण्याची प्रेरणा मिळाली होती.
ट्रेकिंगला साहाय्य करणाऱ्या गटाने आवाज दिला तसे सर्वजण ट्रेकिंग साठी निघून गेले. सगळे जण थोडावेळ गडाच्या एका ठिकाणापर्यंत पोहचले तिथून ते दोरीवरून चढून वरपर्यंत जाणार होते म्हणून थोड्या विश्रांतीसाठी 5 मिनिटासाठी थांबले होते, भूषण आणि माया काहीतरी जोक केल्यासारखे एकमेकांना टाळी देऊन हसत होते, त्यांना पाहून स्नेहाचा चेहरा एकदम लालबुंद झाला, तिने आपली नजर दुसरीकडे वळवली आणि ती विवेकडे गेली पण राहून राहून ती त्या दोघांनाच पाहत होती.
जसा ब्रेक संपला परत सगळेजण दोरीवरून गडाच्या वरच्या टोकाला पोहचणार होते, म्हणून पहिला भूषण दोरीवरून चढत वर गेला, विवेकने स्नेहाला जायला सांगितले ती चढत वर गेली ती तिथे पोहचली आणि भूषणाने तिच्यासाठी हात पुढे केला, तिने रागातच त्याला हात न देता वरती जाण्याचा प्रयत्न करू लागली, तिचा तो अट्टहास पाहून भूषणने नकारार्थी मान हलवली आणि तिच्याकडे पाहू लागला, ती प्रयत्न करत करत वर चढली पण एकदम तिचा तोल जाणार इतक्यात भूषणने तिचा हात पकडला आणि स्वतः जवळ खेचले, तशी ती त्याच्या मिठीत गेली आणि काही क्षण ती त्याच्यात हरवली आणि जसे लक्षात आले तशी ती भानावर अली आणि लगेच त्याच्यापासून दूर झाली.
आणि इकडे आपले विवेक आणि माया एकमेकांना सावरत गड चढत होते, ते एकमेकांची साथ एन्जॉय करत होते.
प्रिय वाचकहो, कथा लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे तरी काही सूचना असतील तर त्या मला नक्की कळवा, मी त्या सुधारण्याचा नक्की प्रयत्न करेन
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा