विवेकला पाहून भूषणला मनातून खूप दुःख झाले, पण ते चेहऱ्यावर दिसू दिले नाही. पण स्नेहा ठीक आहे हे पाहून त्याला समाधान वाटले आणि त्याला समजले स्नेहाने खोटे सांगितले होते कि तिची तब्येत बरी नाही. स्नेहाने दोघांनाही घरामध्ये घेतले आणि विवेक आणि भूषणची ओळख करून दिली. भूषण निर्विकारपणे विवेकला ग्रीट केले, विवेकने भूषणला पहिले आणि हळूच स्नेहाला म्हणाला, छान चॉईस आहे तुझी पण मला का असा रागाने पाहत आहे, असे वाटते मला हा आताच खाऊन टाकेल, हे ऐकून स्नेहाने हळूच त्याला खोपर मारली, सगळे आत आले तसे स्नेहाचे आई बाबा तयार होऊन बाहेर आले, विवेकला आणि भूषणला पहिले आणि आनंदाने त्यांची विचारपूस केली पण ते बाहेर मित्राकडे पूजेसाठी चालले होते.
स्नेहाची आई बोलली, तुम्ही येणार हे आम्हाला माहित नव्हते आणि स्नेहा पण काही बोलली नाही, जर आधी माहित असता तर आम्ही आमचा प्लॅन रद्द केला असता.
तेवढ्यात भूषण बोलला, "काकी तुम्ही जा पूजेला आम्ही पण निघणारच आहोत, फक्त स्नेहाच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो.
स्नेहाची आई बोलली, अरे पण स्नेहा पण पूजेसाठी येत नाही बोलली, ती आहे इथेच तुम्ही गप्पा मारा आम्ही येऊ एक तासभरात, आणि मग सगळे इथेच जेवण करू.
विवेक बोलला, मामी जेवणासाठी आणि कधीतरी येऊ तुम्ही या निवांत आम्ही थोड्यावेळात निघणारच आहे, घरी सगळे वाट पाहत असतील,
स्नेहाची आई बोलली, ठीक आहे तर आम्ही निघतो, स्नेहा चहा नाश्ता कर त्यांच्यासाठी.
असे म्हणून ते निघून गेले.
असे म्हणून ते निघून गेले, स्नेहाने दोघांसाठी चहा नाश्ता घेऊन आली, तोपर्यंत भूषण आणि विवेकमध्ये नॉर्मलच बोलणे सुरु होते, भूषणला माहित नव्हते कि स्नेहाने त्यांच्याविषयी त्याला सांगितले आहे, सगळे चहा नाश्ता घेत होते पण स्नेहा भूषणकडे पाहणे टाळत होती पण भूषण तिच्याकडेच पाहत होता आणि तिच्या मनाचा अंदाज घेत होता. ती या नात्याला खरोखरच तयार आहे का, तिचे माझ्यावर प्रेम नाही का?
तो या विचारातच होता कि विवेकने भूषणला विचारले, तुला स्नेहाशी काही बोलायचे असेल ना, हे ऐकून भूषणने चमकून विवेकडे पाहिलेतसे विवेकने त्याला सर्व हकीकत सांगितली. हे ऐकून त्याला विवेकचे कौतुक वाटले, जर त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर तो गैरसमज घेऊन स्नेहाला दोषी ठरवून मोकळा झाला असता.
विवेक स्नेहाला म्हणाला तुला तुझ्या मनाप्रमाणे आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे, तू भूषणचे ऐकून तर घे.
स्नेहा निर्विकारपणे म्हणाली, माझा निर्णय आधीच झालाय आता माझा कोणताही निर्णय बदलणार नाही.
भूषण बोलला, ठीक आहे पण मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे. त्याचे समाधानकारक ऊत्तर मिळाले कि तुझ्या आयुष्यातून कायमचे निघून जाईन.
हे ऐकून स्नेहा एकदम उठली, आणि म्हणाली मला कोणतेही उत्तर द्यायचे नाही आहे, असे म्हणत ती पाठमोरी उभी राहिली कारण तिला तिचे अश्रू लपवायचे होते.
विवेक तिला समजावत बोलला, फक्त एकदा तू भूषणचे ऐकून घे, मी इथे गार्डन मध्ये आहे फक्त 5 मिनिट त्याचे ऐकून घे.
भूषणने विवेकला थांबवले आणि म्हणाला, तुला कुठेही जायची गरज नाही. मी फक्त एक प्रश्न विचारणार आहे आणि तो बोलू लागला, स्नेहा इकडे बघ, प्लिज एकदा. आणि हलकेच तिने अश्रू पुसले आणि स्वतःला सावरत ती भूषणकडे पाहू लागली, तिला पाहून त्याने विचारले,
तू या लग्नासाठी मनापासून तयार आहेस का?
स्नेहा एकदम शांत झाली,भूषण तिच्यावर नझर रोखून बघत होता, विवेक पण एकदा स्नेहाकडे आणि एकदा भूषणकडे पाहत होता.
स्नेहाने आपला उजवा हात हळूच मागे केला, तर्जनी आणि मधले बोट एकमेकात अडकवले (फिंगर क्रॉस). आणि भूषणकडे बघत बोलली.
हो, मी या लग्नाला मनापासून तयार आहे. मिळाले तुझे उत्तर आता परत मला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस. असे म्हणून ती आत निघून गेली. विवेक शॉक झाला आणि त्याने भूषणकडे पहिले पण, त्याच्या चेहऱ्यावर तर सामील होती, तो खुश दिसत होता.
विवेकला तर काही समजताच नव्हते, त्याने विचारले, अरे भूषण ती नाही बोलली तुला आणि हसतो आहेस?
भूषण त्याला बोलला, ती खोटे बोलत होती, स्नेहा बोलत होती त्यावेळी ती विसरली कि तिच्या मागच्या शो कबर्डमध्ये जे डाँसिन्ग डॉलचे शो पीस आहे त्याला मोठा आरसा आहे, आणि ज्यावेळी ती बोलत होती तिने फिंगर क्रॉस केले होते, आणि तिला जेंव्हा नाईलाजाने खोटे बोलावे लागते तेंव्हा ती असेच फिंगर क्रॉस करते..
भूषणला त्याचे उत्तर मिळाले होते आणि विवेकाला सुद्धा त्यांना मदत करायची होती पण स्नेहाला त्याच्या घरच्यांना दुखवायचे नव्हते म्हणून ती सध्या भूषणचे प्रेम स्वीकारत नव्हती, आता पुढे पाहू भूषण काय करेल.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा